सध्या सतत कोकणात भटकतेय. गठ्ठ्याने फोटु मारतेय. अर्थात बरेचसे लोकेशन रिसर्च चे असल्याने इथे टाकता येत नाहीत पण त्यात नसलेले काही असंच सहज म्हणून टाकतेय.
फोटोंच्या क्रमाला महत्व नाही.
नदीकाठी उभा असलेला माझा विचारमग्न दिग्दर्शक. माहौलच असा की परत प्रेमात पडल्याशिवाय पर्याय नव्हता.
इथून सूर्यास्त पण अप्रतिम दिसतो पण पोचायला उशीर झाला. आणि जे मिळालं ते असं. नदी, धरण, डोंगर, झाडी हळूहळू सगळे आकार वितळून एकमेकात शिरत असताना पाह्यले.
सुंदर खाडी, होडी, झाडी, डोंगर आणि थोडासा निवांत वेळ आणि नुकता नुकता घेतलेला कॅनन पॉवरशॉट SX 120 IS
आरोंद्याच्या किरणपाणी खाडीवरचा आरोंदा-पेडणे ब्रिज. अजून काम चालू आहे
तिलारीच्या कालव्यांमधूनचे रस्ते. नागमोडी राखाडी वाट बाजूला जर्द लाल माती, मधेच कुठे हिरवाई, वर विस्तीर्ण निळं आकाश. कॅमेरा बाहेर आला नाही तरच नवल.
उगवला नारायण
लाल शेंदराच्या खापा
फुले अंगणात चाफा ||
उगवले नारायण
सारी उजळे दुनिया
किती लावाव्या समया ||
वरचा कुठलाही फोटो फोटोशॉपमधे रंग बदलून टाकलेला नाही. जसे रंग दिसले तसेच फोटोत मिळाले आहेत सुदैवाने. कॅमेर्याला धन्स! सर्व फोटो कोकणातलेच आहेत. थोडं अपरिचित असलेल्या कोकणातले पण कोकणच. जागांची नावं टाकली नाहीत कारण त्यांना इथे महत्व नाही.
- नी
प्रतिक्रिया
8 Jun 2010 - 10:17 am | किल्लेदार
वा वा पहिला फोटो मला थेट कोकणात घेउन गेला....
9 Jun 2010 - 10:12 am | टारझन
वॉटरमार्क ने स्सगळं पाणी फिरवलं बघा ....
8 Jun 2010 - 10:20 am | प्रमोद देव
नि:शब्द!
8 Jun 2010 - 10:24 am | श्रावण मोडक
ओ, इनो एजंट आहात का? :)
8 Jun 2010 - 10:28 am | नीधप
??
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
8 Jun 2010 - 10:39 am | श्रावण मोडक
चक्क तुला प्रश्न पडावा?
असे सुंदर फोटो म्हणजे जळवाजळव (ती इथं काही जणांना खूप छान जमते हे आजच्या एका दिवसाच चारदा समजावं इतकं दुर्भाग्य आहे). माझी जळजळ झाल्यावर मी इनो घेणार... इनोचा खप वाढणार... कंपनीचा फायदा होणार... त्यात तुला काही वाटा मिळतो का? :)
8 Jun 2010 - 10:33 am | शिल्पा ब
अप्रतिम!!!
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
8 Jun 2010 - 10:33 am | वेताळ
फोटो पण आवडले. :D
वेताळ
8 Jun 2010 - 10:36 am | प्रचेतस
नीरजाताई,
वॉटरमार्क थोडा लहान करून एका कोपर्यात टाका ना. मधोमध असलेल्या मोठ्या वॉटरमार्कमुळे फोटोंचे सौंदर्य थोडे कमी होतेय.
8 Jun 2010 - 12:23 pm | सहज
हेच म्हणतो. अजुन थोडे मोठे आकाराचे फोटो असते तर अजुन छान वाटले असते.
9 Jun 2010 - 12:41 am | भडकमकर मास्तर
फोटो आवडले..
वरच्यांशी सहमत
8 Jun 2010 - 10:36 am | मनिष
पहिल्या हिरव्यागार फोटोने डोळे निवले! :)
8 Jun 2010 - 11:21 am | समंजस
व्वा!! सुंदर!!! अप्रतिम!!!
सर्वच छायाचित्रे वेड लावणारी [कि संपुर्ण कोकणच वेड लावणारं :? ]
8 Jun 2010 - 2:05 pm | मेघवेडा
कंसाबाहेरील वाक्य हे कंसातील वाक्याचा उपसिद्धांत आहे! :)
फोटोज मस्तच!! :)
8 Jun 2010 - 11:30 am | रम्या
छान फोटो,
आवडले.
मला सुद्धा अश्याच कोकणात फिरायला जायचे आहे.
आम्ही येथे पडीक असतो!
8 Jun 2010 - 2:54 pm | अवलिया
चांगल्या फोटोंचा स्वतःचं नाव लिहुन विचका कसा करावा याची शिकवणी देणारा धागा.
--अवलिया
8 Jun 2010 - 5:21 pm | नीधप
चांगले फोटो ढापायला भरपूर मंडळी असतातच तयार. त्यांना ढापता येऊ नये म्हणून हे केलंय.
फोटो मी काढलेत तेव्हा विचका मीच केलेला बरा कुणी स्वतःच्या नावाने खपवण्यापेक्षा.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
8 Jun 2010 - 6:00 pm | अवलिया
विचका न करता स्वतःचे नाव फोटोवर लावता येते. शिकाल ह्ळु हळु...
--अवलिया
8 Jun 2010 - 2:57 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त फोटो. सगळेच आवडले. इनो घेतोय. :)
बिपिन कार्यकर्ते
8 Jun 2010 - 5:25 pm | अनामिक
सगळेच फोटो जबरदस्तं!
-अनामिक
8 Jun 2010 - 5:58 pm | रेवती
सगळे फोटो सुंदरच!
अंगावर शहारा आला.
रेवती
8 Jun 2010 - 6:43 pm | प्रभो
मस्तच....तो वॉटरमार्क थोडा छोटा करा की.... :)
8 Jun 2010 - 6:55 pm | मदनबाण
फोटो छान आहेत्,पण वॉटरमार्क खटकतो...
तशीही वॉटरमार्क काढुन टाकणारी सॉफ्टवेअरस जालावर उपलब्ध आहेत... ;)
मदनबाण.....
"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget
8 Jun 2010 - 6:58 pm | अवलिया
वॉटरमार्क काढुन टाकणारी सॉफ्टवेअरस जालावर उपलब्ध आहेत
छ्या ! अरे कशाला भ्रमाचे भोपळे फोडतोस... वॉटरमार्क केले की कुणी कॉपी करत नाही येवढं पण समजत नाहि तुला ;)
--अवलिया
8 Jun 2010 - 8:37 pm | प्राजु
केवळ अफाट!!!! जबरदस्त!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
8 Jun 2010 - 10:19 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मस्तच आहेत फोटो.
8 Jun 2010 - 10:24 pm | संदीप चित्रे
पुन्हा पुन्हा कोकणात जाऊन यावंसं वाटतंय
9 Jun 2010 - 12:00 am | बेसनलाडू
(प्रेक्षक)बेसनलाडू
9 Jun 2010 - 12:12 am | आशिष सुर्वे
शाळेच्या दिवसातील उन्हाळी सुट्ट्या आठवल्या ताई!
दर उन्हाळी सुट्टीत चांगला महिनाभर गावी जायचो.. तेच आठवले..
धन्यवाद..
======================
कोकणी फणस
आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/
9 Jun 2010 - 8:20 am | युयुत्सु
Watermark मुळे फोटोंची मजा कमी झाली.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
9 Jun 2010 - 8:22 am | युयुत्सु
प्रेमात पण कुणाच्या? :)
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
9 Jun 2010 - 8:29 am | नीधप
नदीकाठी उभा असलेला माझा विचारमग्न दिग्दर्शक. माहौलच असा की परत प्रेमात पडल्याशिवाय पर्याय नव्हता.
वाक्य पूर्ण वाचा हो. :)
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
9 Jun 2010 - 8:42 am | युयुत्सु
ही कविता घासकडवींच्या कार्यशाळेत केली का?
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
9 Jun 2010 - 9:12 am | नीधप
मिपा म्हणजे जग नव्हे.
ही एक पारंपारीक ओवी आहे.
"शेवंतीचं बन" या कार्यक्रमात पहाटेच्या ओव्यांमधे वरच्या दोन्ही ओव्या गायल्या जातात.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
9 Jun 2010 - 10:44 am | युयुत्सु
फोटोंचे श्रेय कुणी ढापणार नाही याची काळजी घेतलीत पण ओवीचे श्रेय द्यायला विसरलात...
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
9 Jun 2010 - 8:45 am | प्रकाश घाटपांडे
सर्व प्रकाशचित्रे आवडली. दिग्दर्शक विशेष आवडले. वॉटर मार्क छोटा केला असता तर अधिक बहार आली असती.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
9 Jun 2010 - 8:49 am | दिनेश५७
जूनच्या पहिल्याच आठवड्यात, पावसाळा सुरू व्हायच्या आधीच, हे इतकं हिरवंगार कोकण आणि हिरवागार मान्सून कुठला बरं?
10 Jun 2010 - 9:15 am | नीधप
हे सगळे गेल्या वर्षभरात काढलेले फोटो आहेत वेगवेगळ्या वेळचे.
आणि हे कोकण तसं इतरांना अपरिचित असलेलं आहे.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
10 Jun 2010 - 9:08 am | नीधप
१. वॉटरमार्क संदर्भात - तो दिल्याने आणि मधोमध दिल्याने काही प्रमाणात तरी सरळ सरळ ढापणे अशक्य होते. तसंही वरच्यापैकी काहीच फोटोत तो मधोमध दिलेला आहे.
पण तरीही ढापणे जमत नाहीये म्हणून ही चिडचिड आहे का अशी शंका आल्यावाचून रहात नाही.
बाकी तंत्रज्ञानातल्या या संदर्भातल्या गोष्टींबद्दल तिरकं बोलण्यापेक्षा अजून माहिती दिली असतीत तर म्हणणार्यांच्या म्हणण्याला अर्थ तरी राह्यला असता.
२. पारंपारीक ओव्यांमधील ओळी वापरल्याने कुठल्याही कॉपीराइट कायद्याचा भंग होत नाही. कुणाच्याही अधिकारांचे व्हायोलेशन होत नाही. कारण मुळात त्या कुणी रचल्या याचा पत्ता नसतो. ते सर्व साहित्य सर्वांसाठी खुले असते. आणि या पारंपारीक ओव्या आहेत हे समजणे अजिबात अवघड नाहीये. भारतीय संस्कृतीबद्दल ट्रक भरून बडबड करणार्याला हे पण समजत नाही हे गमतीशीर आहे.
३. किल्लेदार यांच्याच धाग्यावर ही चित्रे टाकावीत. वेगळा धागा काढल्याने तिथे टाकण्यात मला कमीपणा वाटतो इत्यादी मूर्ख आरोप इतरत्र वाचले. त्याकडे लक्ष द्यायची वेळ आली कारण माझ्यासाठी महत्वाचे असलेल्यांनीही कोकणावरचे २-२, ३-३ धागे बघून वीट आला अशी कुठेतरी प्रतिक्रिया दिली.
किल्लेदार यांच्याच धाग्यात हे सारे फोटो टाकले तर त्यांच्या फोटोंवर अन्याय केल्यासारखे होते. त्यामुळे मला तरी ते वेगळे टाकणेच योग्य वाटते.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/