माझी पण कोकण भ्रंमंती... थोड्या अपरिचित कोकणात...
सध्या सतत कोकणात भटकतेय. गठ्ठ्याने फोटु मारतेय. अर्थात बरेचसे लोकेशन रिसर्च चे असल्याने इथे टाकता येत नाहीत पण त्यात नसलेले काही असंच सहज म्हणून टाकतेय.
फोटोंच्या क्रमाला महत्व नाही.
असाच एक मॅजिकल मॉन्सून...
भातशेती.
नदीकाठी उभा असलेला माझा विचारमग्न दिग्दर्शक. माहौलच असा की परत प्रेमात पडल्याशिवाय पर्याय नव्हता.
इथून सूर्यास्त पण अप्रतिम दिसतो पण पोचायला उशीर झाला. आणि जे मिळालं ते असं. नदी, धरण, डोंगर, झाडी हळूहळू सगळे आकार वितळून एकमेकात शिरत असताना पाह्यले.
सुंदर खाडी, होडी, झाडी, डोंगर आणि थोडासा निवांत वेळ आणि नुकता नुकता घेतलेला कॅनन पॉवरशॉट SX 120 IS
आरोंद्याच्या किरणपाणी खाडीवरचा आरोंदा-पेडणे ब्रिज. अजून काम चालू आहे
तिलारीच्या कालव्यांमधूनचे रस्ते. नागमोडी राखाडी वाट बाजूला जर्द लाल माती, मधेच कुठे हिरवाई, वर विस्तीर्ण निळं आकाश. कॅमेरा बाहेर आला नाही तरच नवल.
उगवला नारायण
लाल शेंदराच्या खापा
फुले अंगणात चाफा ||
उगवले नारायण
सारी उजळे दुनिया
किती लावाव्या समया ||
वरचा कुठलाही फोटो फोटोशॉपमधे रंग बदलून टाकलेला नाही. जसे रंग दिसले तसेच फोटोत मिळाले आहेत सुदैवाने. कॅमेर्याला धन्स! सर्व फोटो कोकणातलेच आहेत. थोडं अपरिचित असलेल्या कोकणातले पण कोकणच. जागांची नावं टाकली नाहीत कारण त्यांना इथे महत्व नाही.
- नी

वर्गीकरण
प्रतिक्रिया
वा वा
वॉटरमार्क
अप्रतिम!
इनो
?? -
अर्रे...
अप्रतिम!!! ****
फोटोवर नाव मस्त लिहलय....
फोटो सुंदरच पण
+१
फोटो
पहिल्या
व्वा!!
कंसाबाहेर
छान
चांगल्या
चांगले
विचका न
मस्त फोटो.
सगळेच फोटो
सगळे फोटो
मस्तच....तो
फोटो छान
वॉटरमार्क
केवळ
मस्तच आहेत
सुरेख फोटू नी
सगळी प्रकाशचित्रे आवडली
कोकण
Watermark मुळे
माहौलच असा
नदीकाठी
उगवले
मिपा
फोटोंचे
सर्व
जूनच्या
हे सगळे
१.