हस्ताक्षरावरून स्वभाव! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
26 Sep 2007 - 5:38 pm
गाभा: 

राम राम मंडळी,

हस्ताक्षरावरून स्वभाव ओळखण्याचे एक शास्त्र आहे. मी या शास्त्राचा अभ्यास गेली अनेक वर्ष करत आहे. या कालावधीत आत्तापर्यंत अनेकांचे हस्ताक्षर बघायला मिळाले, अभ्यासायला मिळाले.

मंडळी, माणसाचा स्वभाव हे एक अजब रसायन आहे. त्याचा संपूर्ण थांग आजपर्यंत कुणालाही लागलेला नाही हे मलाही मान्य. परंतु समजा मी एखाद्या माणसाला प्रत्यक्ष ओळखत असेन, त्याचा स्वभाव मला चांगला माहीत असेल, तरीही त्याचे हस्ताक्षर तपासल्यावर खूप काही नवीन गोष्टी कळू शकतात, कळतात!

'साधारणपणे माणसाचा स्वभाव जसा असतो त्याच पद्धतीने त्याच्या हाताचे वळण असते' या सिद्धांतावर हे शास्त्र उभे आहे. सहसा माणसाचे अक्षर खोटे बोलत नाही असा माझा अनुभव आहे. आजपर्यंत या शास्त्राच्या केलेल्या अभ्यासामुळे काही काही हस्ताक्षरं तर माझ्याशी थेट बोलतात आणि त्या माणसाचा स्वभाव भराभरा माझ्यासमोर उलगडतो असाही अनुभव आहे. अर्थात, मी वर म्हटल्याप्रमाणे मनुष्य स्वभाव (खास करून स्त्रियांचा स्वभाव) हे एक अजब रसायन आहे, त्यामुळे एखाद्याच्या हस्ताक्षराचे एनालिसिस जमत नाही किंवा चुकूही शकते. एक गोष्ट मात्र निश्चित की काही काही वेळेला हस्ताक्षराच्या एनालिसिसमुळे आपल्याच स्वभावातील काही सूप्त गुणदोष आपल्याला कळू शकतात. कदाचित ते कळल्यावर त्याचा आपल्याला त्याचा फायदाही होऊ शकतो!

तर मंडळी, हे सगळं इथे लिहिण्याचं कारण असं की आता आपण इथे एक गंमतीशीर प्रयोग करणार आहोत. ज्यांना आपल्या हस्ताक्षराचे एनालिसिस माझ्याकडून करवून घ्यायचे असेल त्यांनी आपली इंग्रजी किंवा मराठी सही एका स्वच्छ कागदावर करून स्कॅन करून ते सँपल मला visoba_khechar@yahoo.com या पत्त्यावर पाठवावे. सहीखाली कंसात आपला मिसळपावचा आयडी लिहिण्यास विसरू नये. आपण बँकेतून पैसे काढताना किंवा क्रेडिट कार्डाच्या मागे जी सही करता ती सही मला कृपया पाठवू नये!! :))

एखादी नवी सही करा आणि ती मला पाठवा. जी सही आपल्या स्वभावानुसार आपल्याला सहज करायला जमेल तशी करा आणि ती मला पाठवा. मी आलेल्या सह्या इथे प्रसिद्ध करून त्याचं जाहीर एनालिसिस इथे लिहीन! :)

कळू देत तरी एकमेकांना एकमेकांचे स्वभाव! :)

तसे इथे साधारणपणे लिखाणावरून स्वभावाने कोण कसं आहे याचा अंदाज आपल्याला आहेच, तरीही काही गोष्टी नव्याने कळतील! :)

आणि हो, एका बाबतीत मात्र निश्चिंत रहा, की केवळ एक गंमत म्हणून हा खेळ आपण इथे खेळत आहोत. एखाद्याच्या स्वभावात मला जर काही वेगळेपणा दिसला, जेणेकरून येथील वातावरण गंभीर होऊ शकेल असं काही आढळलं तर ते मी इथे अर्थातच लिहिणार नाही. ती गोष्ट मी संबंधित सभासदाला व्य नि ने कळवीन आणि त्याबाबत कुठेही वाच्यता करणार नाही एवढा विश्वास असू द्या! आणि अहो शेवटी मी तरी देव थोडाच आहे की मला अगदी सगळ्या गोष्टी इन ऍन्ड आऊट कळाव्यात? :)

असो, तर मंडळी लागा कमाला. एखाद्या छानश्या कागदावर आपली मराठी किंवा विंग्रजी सही ठोका, त्याखाली आपला आयडी लिहा आणि द्या पाठवून मला!

मग सांगतो इथे बरोब्बर कोण कसा आहे नी कोण कसा! :)

आपला,
(ग्राफालॉजिस्ट) तात्या अभ्यंकर.

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

26 Sep 2007 - 5:47 pm | प्रियाली

गेल्या काही वर्षांत संगणकाचा कळफलक बडवून माझे अक्षर अत्यंत सुमार झाले आहे. (मराठी तर साफ गळपटले आहे. मध्यंतरी काही कारणास्तव मराठी लिहित होते तर हे काय घाणेरडे अक्षर असे स्वतःलाच ४-५ वेळा म्हणून घेतले.) बाकी, हा खेळ धमाल आहे. सुवाच्य अक्षरात सही पाठवता येते का पाहते. म्हणजे ती माझीच आहे इतपत ओळखू यावी. ;-) नाहीतर माझ्या स्वभावधर्मावर वर्णी दुसर्‍याच कोणाचीतरी लागावी.

बेसनलाडू's picture

28 Sep 2007 - 2:21 am | बेसनलाडू

बडवून माझे अक्षर अगेल्या काही वर्षांत संगणकाचा कळफलक त्यंत सुमार झाले आहे. (मराठी तर साफ गळपटले आहे. मध्यंतरी काही कारणास्तव मराठी लिहित होते तर हे काय घाणेरडे अक्षर असे स्वतःलाच ४-५ वेळा म्हणून घेतले.)
हेच आज स्वाक्षरी करताना आणि त्याखाली नाव लिहिताना मलाही जाणवले.
बाकी, हा खेळ धमाल आहे.
सहमत. स्वाक्षरी पाठविली आहे. निकालाच्या प्रतीक्षेत आहे.
(विद्यार्थी)बेसनलाडू

प्रियाली's picture

29 Sep 2007 - 8:09 am | प्रियाली

घेऊन कुठेतरी गायब झालेले दिसतात.

ते जर स्वभाव विश्लेषण करणार नसतील तर 'उल्लासनगर डिटेक्टीव एजन्सी'मध्ये असलेल्या फायलींतून लोकांचे प्रोफाईल्स लावावे काय? - ह. घ्या.

जुना अभिजित's picture

26 Sep 2007 - 6:19 pm | जुना अभिजित

आज कर्म धर्म संयोगाने(खरंतर कर्मधर्मसंयोगाने) कॅमेरा हाताशी होता आणि इंटरनेट पण.

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

विसोबा खेचर's picture

26 Sep 2007 - 6:20 pm | विसोबा खेचर

मंडळी,

इथे अशी अनेक मंडळी आहेत (माझ्यासकट!) जी टोपणनांवानी वावरतात. जर त्यांनी माझ्या प्रयोगात भाग घेऊन सही पाठवायची म्हटली तर त्यांना त्यांच्या खर्‍या नावाने सही करायला लागेल. हे कदाचित काही सदस्यांना रुचणार नाही. तरीही काळजी नको. त्यांनी त्यांचे टोपणनांव जरी सही करून मला पाठवले तरी चालेल! :)

टोपणनांवाची सही! कशी आहे आईडिया? :))

उदा, आमचा मिलिंद भांडारकर इथे 'सर्कीट' या नावाने वावरतो. त्याने सर्कीट या नावानेच सही करून पाठवली तरी चालेल.

काही कारणांमुळे जर एखाद्या सभासदाला आपले खरे नांव इथे उघड व्हावे असे वाटत नसेल (आणि त्यात गैर काहीच नाही,) त्यांच्याकरता ही विशेष सवलत ठेवत आहे! त्याने/तिने, तो/ती, ज्या आयडीने इथे वावरतो/वावरते, त्याच आयडीची सही करून मला पाठवावी!:)

सगळ्यांनी या खेळात/प्रयोगात अवश्य भाग घ्यावा, जेणेकरून हे सदर अधिक रुचकर होईल, ही इच्छा! :)

आपलाच,
तात्या.

सर्किट's picture

27 Sep 2007 - 11:57 am | सर्किट (not verified)

तात्या,

इथले सदस्य तुम्हाला ह्या स्थळाचे चालक म्हणून ओळखतात. आपण जरी चालकत्व पाच जणांच्या समितीला दिले असले तरी. माझ्यासारख्या एजुकेटेड सदस्याला ते माहिती आहे, पण आपल्यावर होणारे हल्ले बघितलेत, तर सर्वसाधारण सदस्याला ते माहिती नाही असेच दिसून येते. असे असताना:

उदा, आमचा मिलिंद भांडारकर इथे 'सर्कीट' या नावाने वावरतो. त्याने सर्कीट या नावानेच सही करून पाठवली तरी चालेल.

असे एखादे आपल्याकडून येणारे वाक्य सद्स्यांच्या मनात अनेक कुशंका निर्माण करू शकते.याचा अर्थ सर्वसाधारण सदस्यांच्या मनात असा होतो:

माझे खरे नाव जाहीर करण्यास सदर संकेतस्थळाच्या चालकांना अजीबात संकोच वाटत नाही.

असे झाल्यास सदस्यांचा ह्या स्थळाविषयी विश्वास नाहीसा होईल. हेच जर कुणी साधारण सदस्याने लिहिले असते, तर त्यात फारसे काही नाही. पण आपल्याला सदर स्थळाचे सदस्य ह्या स्थळाचे चालक समजतात, आणि तसे नसले तरी मालक तर आहातच. खरे ना ?

अशी चूक पुन्हा आपल्याकडून होऊ नये, ही अपेक्षा.

- सर्किट

विसोबा खेचर's picture

27 Sep 2007 - 12:09 pm | विसोबा खेचर

पण आपल्यावर होणारे हल्ले बघितलेत, तर सर्वसाधारण सदस्याला ते माहिती नाही असेच दिसून येते. असे असताना:

हा हा हा! :)

असे झाल्यास सदस्यांचा ह्या स्थळाविषयी विश्वास नाहीसा होईल. हेच जर कुणी साधारण सदस्याने लिहिले असते, तर त्यात फारसे काही नाही. पण आपल्याला सदर स्थळाचे सदस्य ह्या स्थळाचे चालक समजतात, आणि तसे नसले तरी मालक तर आहातच. खरे ना ?

अरे नाही रे बाबा! मिसळपावची मालकी आता मी दुसर्‍याच एका अज्ञात व्यक्तिच्या नांवे केली आहे! मी आता इथे एक सर्वसाधारण सभासद आहे! :))

असो, तुझा प्वाईंट आमच्या ध्यानात आला आहे. पुन्हा अशी चूक होणार नाही! बाय द वे, तात्या ह्या संकेतस्थळाचा मालक आहे ही गोष्ट जशी अनेकाना ठाऊक आहे तसीच सर्कीट हा मिलिंद भांडारकर आहे ही गोष्टही अनेकाना ठाऊक आहे! :)

असो, आमचं चुकलं एवढं मात्र खरं..:)

आपला,
(खजील!) तात्या.

सर्किट's picture

27 Sep 2007 - 12:25 pm | सर्किट (not verified)

बघ तात्या,

संकेतस्थळाच्या मालकालाही आपण योग्य शब्दात प्रतिसाद लिहिल्यास हाणू शकतो, हा विश्वास सदस्यांत निर्माण केला की नाहि ? हे "तिकडे" शक्य होते का, बोल ?

- (सर्वसाधारण सदस्य) सर्किट

विसोबा खेचर's picture

27 Sep 2007 - 1:10 pm | विसोबा खेचर

हे "तिकडे" शक्य होते का, बोल ?

चान्सच नाही बॉस!

तात्या.

गुंडोपंत's picture

29 Sep 2007 - 4:52 am | गुंडोपंत

म्हणून तर आम्ही इतके प्रेमात आहोत मिसळीच्या!
म्हणजे दर वेळी जाऊन शिव्याच द्यायच्या आहेत असे नाही... पण त्या द्यायला जागा आहे याचे समाधान! ;)))

आपला
गुंडोपंत

सहज's picture

26 Sep 2007 - 6:28 pm | सहज

चला एकेकाचे स्वभाव सांगायला लागा. म्हणजे लवकरच पाठवीन किंवा नाही. ;-)

लिखाळ's picture

26 Sep 2007 - 6:30 pm | लिखाळ

वा, तात्या,
तुमचे डो़के अफलातून आहे. फार मजा येईल. मी लवकरच माझी स्वाक्षरी पाठवतो.
(मी सुद्धा काही वर्षांपूर्वी मधुसूदन घाणेकरांची हस्ताक्षरावरुन स्वभाव विश्लेषणाची पूस्तके वाचली होती त्याची आठवण झाली.)

इथे तर सर्वांचे हस्ताक्षर 'गमभन' कारांशी मिळते जूळते दिसते. :)

मनोगतावर तुम्ही लडवांचे निकाल लावले होतेत ते अजूनही आठवत आहेत.
-- (मोतिचूराचा लाडू आवडणारा) लिखाळ.

तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

विसोबा खेचर's picture

27 Sep 2007 - 12:25 am | विसोबा खेचर

मनोगतावर तुम्ही लडवांचे निकाल लावले होतेत ते अजूनही आठवत आहेत.

क्या बात है लिखाळराव! आपनेभी क्या याद दिलाई!

त्या काळात आपण साला मनोगतावर एकदम फॉर्मात होतो! :)

असो, हा वाचा त्या लाडवांच्या स्पर्धेचा निकाल! जवळजवळ पंचावन्न मंडळींनी त्यात भाग घेतला होता! :)

आपला,
(लाडूप्रेमी) तात्या.

विसोबा खेचर's picture

26 Sep 2007 - 6:32 pm | विसोबा खेचर

आत्ताच अभिजितने त्याची सही इथे पाठवली आहे. खूपच सुंदर सही आहे. सध्या जरा गडबडीत आहे, (आज बुधवार आहे ना!) त्यामुळे अभिजितच्या सहीचं एनालिसिस इथे सवडीने लिहितो! :)

ही पाहा अभिजितची किती सुरेख सही आहे! :)

प्रियाली's picture

26 Sep 2007 - 7:19 pm | प्रियाली

अभिजितची सही खरंच सुंदर आहे. भविष्यात लोकांना द्यावी लागेल म्हणून तयारी करून ठेवली आहे का काय? ;-)

माझ्या टुकार अक्षरात पेन्सिलीने नाव खरडून पाठवले आहे. त्याला सही म्हणणे सही नाही! वयोमानानुसार ;-) अक्षर बिघडल्याने मला प्रत्येक चांगल्या ठीकाणी (म्हणजे चांगलं काही सापडलं तर) ५ मार्क अधिक द्यावेत आणि ते टुकार अक्षर इथे प्रसिद्ध करू नये... त्यापेक्षा प्रियालीचा स्वभाव खत्रुड आहे - असे प्रसिद्ध केलेले परवडले.

माझाही कॅमेरा संगणकाशेजारीच होता. उठून पेन हातात धरण्याचे कष्टही केलेले नाहीत... पहिला स्वभावगुण - आळशी स्वभाव. :)))

सहज's picture

26 Sep 2007 - 7:30 pm | सहज

अक्षर न बघता थोडेफार सांगतो.

चिकाटी हा गूण आहे :- (एक लिहिलेली पोस्ट कमीत कमी ३ वेळा एडीट करणार)
श्रम घेणे :- जो पर्यंत मनासारखे होत नाही तोवर झटणार (कदाचीत जवळच्यांना पण सतवणार, छोटीला विचारले पाहीजे :-))
चांगली पूर्वतयारी करणे :- हस्ताक्षरावरून कोणी खत्रुड , आळशी , वयस्कर असे म्हणण्यापेक्षा आपणच म्हणून मोकळे होणे

असो वरील तीन गुणांमुळे आयुष्यात यशस्वी पण जरा असंतुष्ट :-)

--------------------------------------------------------------------------------------------------
आमचे भविष्य खरे असते असा आमचा दावा नाही. विश्वास ठेवावा अथवा नाही ही संपूर्ण तूमची जबाबदारी राहील. करमणूकीची हमखास गॅरंटी, तुम्ही नाही तर आम्ही तरी नक्कीच खूश असू.

प्रियाली's picture

26 Sep 2007 - 7:57 pm | प्रियाली

ज्योतिषविशारद सहजराव,

सगळं खरं हो! फक्त

चांगली पूर्वतयारी करणे :- हस्ताक्षरावरून कोणी खत्रुड , आळशी , वयस्कर असे म्हणण्यापेक्षा आपणच म्हणून मोकळे होणे

हे सोडून. यातील दोन दुर्गुण तर नक्की आहेत. पुष्टी द्यायला खूपजण येतील. ;-) चांगली पूर्वतयारी मात्र करायला आवडते.

पूर्वतयारी:

  • साधी बाहेर जाण्याची तयारी = १०-१५ मि.
  • एखाद्या बर्‍या ठिकाणी (रेस्टॉरंट, मॉल) = २० ते ३० मि.
  • लग्न/ समारंभ इ. इ. = दिड ते २ तास. (खरं म्हणजे ३-४ दिवस)

:))))))))

प्रतिसाद पुन्हा एडिट केला. ;-)

चित्रा's picture

26 Sep 2007 - 10:12 pm | चित्रा

मला वाटले एखाद्या माहितीपूर्ण लेखाची म्हणत असशील. हे तर नेहमीचेच निघाले :-;

विसोबा खेचर's picture

27 Sep 2007 - 12:06 am | विसोबा खेचर

प्रिय अभिजित,

अरे यार तुझी सही छानच आहे रे. पण मला तरी यात काही विशेष मालमसाला सापडला नाही! छ्या बुवा, एकदमच सरळमार्गी स्वभाव आहे तुझा!:)

परंतु एक गोष्ट तुला नक्की सांगू शकेन, की तू स्वप्न रंगवणं जरा कमी कर. इथे मला 'स्वप्न रंगवणं' हे फक्त प्रेयसीच्या बाबतीतच नव्हे तर जरा व्यापक अर्थाने म्हणायचं आहे. अरे तुझ्या दृष्टीने पाहता हे जग खूप छान आणि सुंदर आहे रे! पण प्रत्यक्षात ते तसं नाहीये. तुझं नक्की वय काय आहे हे मला माहीत नाही, परंतु सहीवरून तरी तू स्वप्न रंगवण्याच्याच वयाचा वाटतोस! :)

ते ठीकच आहे. तारुण्यसुलभ अवस्थेत स्वप्न रंगवणं काहीच वाईट नाही. किंबहुना साहजिकच आहे. परंतु तुझ्या सहीनुसार तू फक्त स्वप्नच रंगवत असतोस असे दिसते. 'आपण चांगलं की सगळं जग चांगलं' हे फक्त लिहायला, वाचायला ठीक आहे, पण तू तेच खरं मानून चालला आहेस असं दिसतं! काही काही लहानसहान गोष्टी तू उगीच मनाला लावून घेतोस असंही दिसतं. तुझा स्वभाव बर्‍यापैकी भोळा वाटतो, सरळमार्गी वाटतो. तुझं लग्न झालेलं आहे किंवा नाही हे मला माहिती नाही, परंतु तुझ्यासारख्या स्वभावाच्या माणसांची बायको खूप म्हणजे खूपच समजूतदार असावी लागते. तरच तुम्हा लोकांचा बेडा पार होतो. परंतु पत्नीची बाजू, स्त्रीप्रेमाची बाजू जर तुझ्यासारख्या मंडळींना चांगली आणि समजूतदार मिळाली नाही तर मात्र तुम्ही मंडळी कालांतराने डिप्रेशन मध्ये जायची भिती असते!

बाजूच्या काढलेल्या चित्रावरून तुझा स्वभाव आर्टिस्टिक आहे हे तर कळतंच आहे. पण त्याच सोबत तुझा स्वभाव खूप उदारमतवादी आहे. मोठ्या मनाचा आहेस तू खूप आणि तेवढाच गोड आणि लाघवी! :)

असो, तुझ्या सहीवरून मला जे दिसलं ते लिहिलं आहे. तुला किंवा इतर कुणाला तुझी मी उगीच स्तुती करतो आहे अस वाटू शकेल पण मला जे दिसलं तेच मी लिहिलं आहे. अधिक काही माहितीकरता व्य नि ने संपर्क कर!

तुझा,
तात्या.

जुना अभिजित's picture

27 Sep 2007 - 10:44 am | जुना अभिजित

काही काही लहानसहान गोष्टी तू उगीच मनाला लावून घेतोस असंही दिसतं. ह्या अनुमानाशी १००% सहमत. पण मी हळूहळू स्वतःला बदलतोय. आणि बथ्थड बनायचा प्रयत्न करतोय. :-))

स्वप्न रंगवणे आणि प्रत्यक्षात आणण्याच्या वयात आहे. ;-) सोबतच चित्र मी काढलेलं नाही पण त्या चित्रा शेजारी सही करण्याची शक्कल अस्मादिकांचीच.

बायको कशी असावी हे सांगितल्या बद्दल धन्यवाद. शोधताना योग्य ती काळजी घेतली जाईल. :-))

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

ॐकार's picture

26 Sep 2007 - 7:48 pm | ॐकार

कधीकाळी आमचे हस्ताक्षर खराब होते परंतु आम्ही काही ते सुधारले नाही. ( ऐकावे जनाचे करावे मनाचे!)
युनिकोड पाहून पाहून आता मराठीत वळणदार अक्षरे काढतो. तरी आमची स्वाक्षरी मात्र विंग्रजीत आहे आणि तीही वेडीवाकडी. सवडीने पाठवतोच. तुमची परीक्षा घ्यावी असे म्हणतो ;)

राजे's picture

26 Sep 2007 - 8:41 pm | राजे (not verified)

सही पाठवलेली आहे, वाट पाहतो आहे एनालिसिस ची. मोबाईल वरुन पाठवला आहे १००८ नंबर येईल शेवटी.

राजे
(*हेच राज जैन आहेत)

धोंडोपंत's picture

26 Sep 2007 - 10:04 pm | धोंडोपंत

तात्या,
तुझा उपक्रम सुत्य आहे. त्यास आमच्या शुभेच्छा. हा खेळ चांगलाच रंगेल असे दिसताय.

आपला,
(प्रेक्षक) धोंडोपंत

वेलणकरची सही मागवं. म्हणजे महाखत्रूड माणूस कसा सही करतो हे लोकांना समजेल.

आपला,
(सूचक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

आजानुकर्ण's picture

26 Sep 2007 - 10:21 pm | आजानुकर्ण

मधुरा वेलणकर की प्रदीप वेलणकर?

मधुरा वेलणकर मस्तच हं. खत्रूड नाही वाटत. मात्र प्रदीप वेलणकर वाटतो... "या लाजिरवाण्या घरात" मध्ये तर अगदी डोक्यात जातो.

विसोबा खेचर's picture

26 Sep 2007 - 11:25 pm | विसोबा खेचर

>>वेलणकरची सही मागवं. म्हणजे महाखत्रूड माणूस कसा सही करतो हे लोकांना समजेल.

अरे जाऊ दे रे धोंड्या! कशाला उगाच आमच्या शक्तिवेलूच्या मागे लागतोस...

साला कसाही असला तरी तात्याचा लाडका आहे तो! :)

बेसिकली काय आहे माहित्ये का धोंड्या, काही माणसं ती ज्या डबक्यात राहतात ना, त्यालाच समूद्र समजून बसतात! आपल्या आणि आपल्या परीघाबाहेर खूप काही आहे याची त्यांना कल्पनाच नसते! संस्कृती, सभ्यपणाचा कोष स्वतःभोवती घट्ट लपेटून बसतात ही मंडळी! आणि याच गोष्टींना ही मंडळी आयूष्यभर जोंबाळत बसतात. तिच्यायला तुमची ती संस्कृती आणि सभ्यपणा वगैरे वगैरे हा तात्या कोळून प्यायलाय रे! सालं आता दुसरं काहीतरी बोला! :)

असो! ह्या चर्चाप्रस्तावाचा हा विषय नाही! तेव्हा विषयांतराकरता क्षमस्व!

तात्या.

मनिष's picture

27 Sep 2007 - 12:16 am | मनिष

सही पाठवली आहे.
- मनिष

प्राजु's picture

27 Sep 2007 - 1:14 am | प्राजु

पाठवेन सही... मलाही सांगा.

- प्राजु.

बेसनलाडू's picture

27 Sep 2007 - 2:28 am | बेसनलाडू

स्वाक्षरी कम्पल्सरी आहे काय? स्वाक्षरीच्य ऐवजी स्वतःच्या हस्ताक्षरातील एखादी अख्खी कविता किंवा लेख स्क्यान करून पाठवल्यास चालेल काय? म्हणजे स्वभावाच्या विश्लेषणात आणखी सोपे पडेल ;-) बाकी अजमावायचा मुद्दा हा आहे की आवडत्या लाडवांवरून तुम्ही ओळखलेला स्वभाव आणि हस्ताक्षरावरूनओळखलेला स्वभाव यांत साम्य/भेद किती ;)
कळावे. म्हणजे त्यानुसार अख्खे लेखन किंवा फक्त स्वाक्षरी धाडतो.
या अभिनव उपक्रमासाठी शुभेच्छा.
(शुभेच्छुक)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

27 Sep 2007 - 11:01 am | विसोबा खेचर

स्वाक्षरी कम्पल्सरी आहे काय? स्वाक्षरीच्य ऐवजी स्वतःच्या हस्ताक्षरातील एखादी अख्खी कविता किंवा लेख स्क्यान करून पाठवल्यास चालेल काय?

शक्यतोवर स्वाक्षरी पाठवल्यास अधिक बरे होईल. कारण स्वाक्षरी ही नेहमी माणसाला सर्वात जास्त रीप्रेझेंट करते. अर्थात, स्वाक्षरी सोबतच आपण इतरही हस्तलिखित पाठवलंत तरी चालेल, मला त्याचाही फायदा होईल..

तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

27 Sep 2007 - 7:45 am | प्रकाश घाटपांडे

काही लोक ( अपवादात्मक ) दोन्ही हाताने लिहू शकतात, त्यांच्या कुठल्या हाताचे अक्षर डिफॉल्ट मानायचे?
खालील बाबी असणारच
१) हस्ताक्षर हे सहज प्रेरणेतून आले असावे
२) ज्योतिषाला फसवायचे ही भावना असल्यास भाकित चुकते.
३) लिहितेवेळी तुमच्या मनाच्या अवस्थेचे तरंग नकळत त्यात उमटत असतात.
प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर's picture

27 Sep 2007 - 9:24 am | विसोबा खेचर

काही लोक ( अपवादात्मक ) दोन्ही हाताने लिहू शकतात, त्यांच्या कुठल्या हाताचे अक्षर डिफॉल्ट मानायचे?

जे 'बाय डिफॉल्ट' असेल तेच मानायचे! :)

खालील बाबी असणारच
१) हस्ताक्षर हे सहज प्रेरणेतून आले असावे

अर्थातच!

२) ज्योतिषाला फसवायचे ही भावना असल्यास भाकित चुकते.

खरं आहे. इथे 'बघा कसा गंडवतो तात्याला' असा विचार करून मुद्दामून जर कुणी unnatural किंवा चुकीची सही केली तर काळजी नसावी, तात्या त्याच्याहून पोचलेला आहे! 'माझं एनालिसिस चुकलं. आपल्याला ग्राफालॉजी या विषयातलं शाटमारी काळी कळत नाही' हे उघडपणे कबूल करून तो मोकळा होईल! :))

३) लिहितेवेळी तुमच्या मनाच्या अवस्थेचे तरंग नकळत त्यात उमटत असतात.

क्या बात है! नक्कीच उमटतात!

तात्या.

विसोबा खेचर's picture

27 Sep 2007 - 9:16 am | विसोबा खेचर

हा माझ्याकरता एक धक्का आहे! वैयक्तिकरित्या बोलायचं तर बिरुटेसाहेब माझे फॅन आहेत, हितचिंतक आहेत, क्वचितप्रसंगी मी चुकीचा वागलो तरी मला सांभाळून घेणारे आहेत. या वरून बिरुटेसाहेबांच्या स्वभावाबद्दल एक अंदाज मी माझ्या मनाशी बांधला होता. पंण त्यांच्या सहीने मला कोड्यातच टाकले आहे! :)

हा माणूस खूप आतल्या गाठीचा आहे असं सहीवरून दिसतं. मंडळी, एखादा माणूस खूप गप्पीष्ट असला, बोलका असला तरीही तो आतल्या गाठीचाही असू शकतो याचं बिरुटेसाहेब हे उत्तम उदाहरण आहे! अर्थात, आतल्या गाठीचं असणं हे वाईट थोडंच असतं!? :)

परंतु साधारणपणे अबोल, मितभाषी मंडळी ही अधिक आतल्या गाठीची असतात.

या माणसाकडे अजून एक मोठा गूण आहे. जर एखादा मनुष्य काही अडचणीत सापडला, त्याच्यासमोर जर काही मोठी समस्या उभी राहिली तर त्याने अगदी विश्वासाने बिरुटेसाहेबांकडे जावं. जे घडलं आहे त्यावर उगाच काहितरी वायफळ चर्चा न करता त्या समस्येवर लवकरात लवकर एखादा तोडगा कसा काढता येईल, त्यातून बाहेर कसं पडता येईल हे बिरुटेसाहेब अतिशय उत्तमरित्या सांगू शकतील. आपल्यासमोर बर्‍याचदा 'जे झालं ते झालं, पण आता यावर सोल्युशन काय?' असा प्रश्न पडतो. I think Mr Birute is the Best person for this kind of advise!

आपल्या म्हणण्यावर अतिशय ठाम असणे हाही स्वभाव यांच्या सहीतून दिसतो. खूप पॉझिटीव्ह माईंन्डेडही वाटतात. आत्मविश्वास आहे. स्वभावाने अतिशय प्रेमळ आणि दयाळू आहेत. हा माणूस प्रेमापोटी किंवा अर्थातच रागापोटीही (!) जे काम करेल त्याचा खूप अधिक काळ परिणाम राहील! यांचा राग आणि लोभ या दोन्ही गोष्टी अतिशय तिखट आहेत. वेळप्रसंगी हा मनुष्य अतिशय एक्स्ट्रीम रागावू शकतो हा यांच्या स्वभावातील एक दोष म्हणता येईल. मला त्यांच्या सभावाची जी आंतरजालीय ओळख आहे त्यावरून ते कधी फारसे रागावत नसावेत असेच वाटते. आणि तसं असेल तर उत्तमच आहे. परंतु वेळप्रसंगी हा माणूस भयानक संतापू शकतो हेच त्यांच्या सहीवरून मला तरी जाणवते. आणि जी मंडळी सहसा कधीच रागावत नाहीत ती जेव्हा रागावतात तेव्हा कठीण काम होऊन बसतं!

असो, एकंदरीत खूपच इटरेस्टींग सही आहे ही. परंतु मला ती संगणकाच्या पडद्यावर बघायला मिळाली त्यामुळे हाताचा दबाव कसा आहे हे समजत नाही. यांची प्रत्यक्ष कागदावर केलेली सही बघायला मिळाल्यास जास्त मजा येईल आणि अजून काही गोष्टींचा उलगडा होईल!

तात्या.

राजे's picture

27 Sep 2007 - 9:23 am | राजे (not verified)

आम्ही बिरूटे साहेबांचे फॅन आहोत,
स्वभावाने अतिशय प्रेमळ आणि दयाळू आहेत व आपुलकीने वागणारे आहेत हे मात्र पक्के.

राजे
(*हेच राज जैन आहेत)

आम्ही बिरूटे साहेबांचे फॅन आहोत,

आम्हाला ते आवडतात ब्बस अजून काही नको. आमच्या आवडत्या दैवतावर हल्ले झालेले पचणार नाहीत.त्यामूळे कृपया नको तात्या. आमचे मास्तर चिडले तरी आमच्यावरच्या आपूलकीने. तुम्ही थोरामोठ्यांचे विश्लेषण थांबवा राव.

निदान आमचे हस्ताक्षर पाठवायची योजना बारगळली. आम्ही आहोत असे आहोत, त्याची जाहीर वाच्यता झालीच पाहीजे का?
तुम्हाला __ ___ व्हायचा सराव आहे आम्हाला निदान नवीन आतले कपडे आणू देत मग तुम्ही फेडा. :-)

त्यापेक्षा असे करूया का येथील एकेका व्यक्तीला (आय. डी. ) घेऊन दोन दिवस इतर लोक त्यांची त्या व्यक्तिबद्दल (त्या व्यक्तिच्या लिखाणावरून) काय मते आहेत म्हणजे वय, काम, शिक्षण, स्वभाव, इ.

काय वाटते?

----------------------------------------------------------------------------------------------
हळूहळू सगळेच बंच ऑफ लूजर्स येथे टवाळकी करत बसले आहेत असे वाटायला नको. जरा परत सारवासारव होइपर्यंत "अलिकडे" चष्मा लावून बसावे कसे? हॉटेलातून ग्रंथालयात कूच..

विसोबा खेचर's picture

27 Sep 2007 - 10:53 am | विसोबा खेचर

निदान आमचे हस्ताक्षर पाठवायची योजना बारगळली. आम्ही आहोत असे आहोत, त्याची जाहीर वाच्यता झालीच पाहीजे का?

ठीक आहे, तुम्ही नका पाठवू सही. आम्ही आग्रह करणार नाही! :)

तुम्हाला __ ___ व्हायचा सराव आहे आम्हाला निदान नवीन आतले कपडे आणू देत मग तुम्ही फेडा. :-)

हरकत नाही! तसं करू..:)

त्यापेक्षा असे करूया का येथील एकेका व्यक्तीला (आय. डी. ) घेऊन दोन दिवस इतर लोक त्यांची त्या व्यक्तिबद्दल (त्या व्यक्तिच्या लिखाणावरून) काय मते आहेत म्हणजे वय, काम, शिक्षण, स्वभाव, इ.
काय वाटते?

ठीक आहे. आईडिया वाईट नाही. तुम्हीच हे सदर सुरू करा..

तात्या.

--
मिसळपावचे सभासद हीच मिसळपावची शोभा आहे. ते आहेत म्हणूनच मिसळपावही आहे अशीच मिसळपावची भावना आहे. त्यांच्याबद्दलची चर्चा ही मिसळपावच्या इतर साहित्यासोबत मुख्य प्रवाहातच राहील. त्यांना 'आपापसात'च्या नावाखाली गावाच्या वेशीबाहेर धाडले जाणार नाही!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Sep 2007 - 6:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्हांस वाटले नव्हते आमची सही इतक्या आतल्या गाठीची असेल म्हणून, खरे तर तिच्यामुळेच आमच्या स्वभावाला हे विशेषण लागले असावे ;)  बाय द वे  , आपण केलेले विश्लेषण आणि आमचा स्वभाव कुठेच मिळता जुळता नाही, आणि जे काही वाटते (प्रेमळ,दयाळू वगैरे ) ते मात्र सामान्य ठोकताळे आहेत हे सांगण्यास अधिक आनंद होत आहे.( आवडले नाही म्हणून आम्ही असे म्हणत नाही !)
एकंदरीत खूपच इंटरेस्टिंग सही आहे ही. परंतु मला ती संगणकाच्या पडद्यावर बघायला मिळाली त्यामुळे हाताचा दबाव कसा आहे हे समजत नाही. यांची प्रत्यक्ष कागदावर केलेली सही बघायला मिळाल्यास जास्त मजा येईल आणि अजून काही गोष्टींचा उलगडा होईल!
झाले ते आणि केलेल्या विश्लेषणामुळे ;) आम्ही पुर्णपणे समाधानी असून, आमचे (नसलेले) अधिक गुण मित्रपरिवारासमोर आणण्याची आमची आता तरी इच्छा नाही ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(तात्याचा फॅन)

जुना अभिजित's picture

27 Sep 2007 - 10:38 am | जुना अभिजित

म्हणजे अगदी हट्ट नाही पण जमलं तर सह्यांची चित्रे मिसळपाव वर टाकताना कृपया ब्लॉगर किंवा पिकासा.गूगल वर अपलोड करून त्या लिंक द्याव्या.

फ्लिकर वगैरे तत्सम संकेतस्थळे कंपनी मध्ये उघडत नाहीत. :-(

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

मनिष's picture

27 Sep 2007 - 11:17 am | मनिष

कृपादृष्टी असावी. :)

सर्किट's picture

27 Sep 2007 - 12:00 pm | सर्किट (not verified)

अशी सही केली बगुनाना !!!

- (घाशीराम) सर्किट

बेसनलाडू's picture

27 Sep 2007 - 12:16 pm | बेसनलाडू

बसल्याजागी खाली पडून, हसून हसून मुरकुंडी वळली आहे. व्वा सर्किटराव! एका सहीत अख्खी म्हैस जिवंत केलीत!!!
(दूधवाला)बेसनलाडू मांडवकर!!

सर्किट's picture

27 Sep 2007 - 12:29 pm | सर्किट (not verified)

आम्ही: ए, बेसनलाडू, नाव काय ?
बेला (सांझ की, सुखद सुहावन इ. इ. ): ते काय तिथेच लायसन वर लिहिलं आहे.
आम्ही: जास्त शानपना दाखवू नगस. लायसन वर काय नाव लिवलय?

- (हवालदार) सर्किट

बेसनलाडू's picture

27 Sep 2007 - 12:32 pm | बेसनलाडू

त्या अदुगर तारवटल्या डोल्यानी भक्कम पिक टाकूनशा 'डायवर कोन हे' इचारायला इसरलात काय सर्किटभौ?! ;)
(आर्डर्ली)बेसनलाडू

सर्किट's picture

27 Sep 2007 - 1:02 pm | सर्किट (not verified)

बेला,

तू ड्रायवर सारखा प्रोऍक्टिव्ह वागलास, तर तुलाही डायवर म्हणीन.
पण तू तर कंडक्टर सारखा फॉलोवर आहेस, जर लीडरशिप दाखव !

- (डायवर) सर्किट

बेसनलाडू's picture

27 Sep 2007 - 1:11 pm | बेसनलाडू

डीएमवी मध्ये ड्रायवर-कंडक्टरसाठीचं पार्टटाइम/फुलटाइम ट्रेनिंग चालू केलंय की काय? की कम्युनिटी सर्विस? ;)
(दुचाकीस्वार)बेला

सर्किट's picture

27 Sep 2007 - 1:30 pm | सर्किट (not verified)

चतुर आहेस बेला !!
कम्युनिटी सर्विस, फक्त तुम्हा लोकांसाठी !!

= सर्किट

सहज's picture

27 Sep 2007 - 12:33 pm | सहज

आम्हाला तरी ह्या हवालदारची (डोळे एकदम लाल) काल रात्री जरा कमी (झोप) किंवा आज रात्री जरा जास्त (??) झाल्यासारखी वाटतीय खरी

सर्किट's picture

27 Sep 2007 - 1:00 pm | सर्किट (not verified)

स्टीरियोटाईप्स वर जगणारे लोक बथ्थड असतात, हे सिद्ध करताय आपण..
= (एस्टीरियोटिपिकल) सर्किट

प्रमोद देव's picture

27 Sep 2007 - 12:33 pm | प्रमोद देव

म्हशीच्या मालकाला पण लायसन लागते?(अमेरिकेत असेलही! कुणी सांगावे!)

सर्किट's picture

27 Sep 2007 - 2:17 pm | सर्किट (not verified)

म्हैस जर जास्त दूध देणारी असेल, तर लायसन लागू शकते.
सगळे मिळणार्‍या पैशांवर अवलंबून, मग म्हैस असो किंवा रौशनी (आजच वाचले, एक बिलियन डॉलर्सचा बिझिनेस म्हणून हंगेरीने प्रॉस्टिट्यूशन लीगल केले.)

(म्हशीवरून हंगेरीतल्या वेश्यांवर विषयंतर करण्याअचे सामर्थ्य असलेला एकमेव मानव) - सर्किट

माझी दुनिया's picture

27 Sep 2007 - 4:24 pm | माझी दुनिया

तात्या,

मी पण सही पाठवली आहे, उत्तराची वाट पहात आहे.

चित्तरंजन भट's picture

29 Sep 2007 - 4:59 am | चित्तरंजन भट

प्राजु's picture

29 Sep 2007 - 6:10 am | प्राजु

चित्तर साहेब....
सही झक्कास आहे बरं आपली!... एकदम आवडली...
- प्राजु.

विसोबा खेचर's picture

29 Sep 2007 - 8:47 am | विसोबा खेचर

सह्यांचं एनालिसिस लवकरच लिहितो..

सध्या कामाचा व्याप वाढलाय, त्यामुळे सवडच नाही. विलंबाबद्दल क्षमस्व...

तात्या.

महेन्द्र's picture

1 Oct 2007 - 12:56 pm | महेन्द्र

साहेब जर आमच्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे नव्ह्ते तर सह्यांचे नमुने कशाला मागविल्या

कृपया उत्तर देण्याचे प्रयत्न करता आले तर बघा

एक साधारण सदस्य

विसोबा खेचर's picture

2 Oct 2007 - 7:54 am | विसोबा खेचर

सध्या जरा कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. सवडीने सगळ्यांचे रिपोर्टस लिहितो. सध्या जरा एखाद दोन लेख हातावेगळे करत आहे, त्या गडबडीत आहे. कृपया थोडं थांबा! :)

तात्या.

विसुनाना's picture

2 Oct 2007 - 12:06 pm | विसुनाना

Sign of Mahatma

या व्यक्तीची स्वभाववैशिष्ट्ये ओळखा पाहू... तात्या!
आणि अक्षरातील कोणत्या बारकाव्यांवरून तुम्हाला ती कळली तेही सांगा बरं का!

सर्किट's picture

2 Oct 2007 - 12:12 pm | सर्किट (not verified)

वकिली चालली नाही, म्हणून घातला पंचा आणि झाला महात्मा !!!

- सर्किट करमचंद गांधी

सहज's picture

2 Oct 2007 - 12:21 pm | सहज

द. अफ्रीकेत वकिलीत बर्‍यापैकी जम बसला होता. मी त्यांची वकीली करत नाही पण उगाच इतके पण हलके, कसेही नाही बोलायचे राव.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे काहीही योगदान नाही की त्यांना जर देखील मान द्यावासा वाटत नाही?

निदान आजच्या दिवशीतरी.....

विसोबा खेचर's picture

2 Oct 2007 - 12:42 pm | विसोबा खेचर

निदान आजच्या दिवशीतरी.....

ठीक आहे. तुम्ही म्हणता म्हणून निदान आजच्या दिवशी तरी आम्ही त्याना मान देऊ. पण सहजराव, मान असा कधी कुणाकडे मागून मिळत नसतो. तो कोलू पिसून मिळवावा लागतो! उपास करून आणि साजूक तुपात तळलेले बदाम खजूर खाऊन मान नाही मिळत!!

तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

2 Oct 2007 - 12:21 pm | प्रकाश घाटपांडे

हस्तरेषांवरुन स्वभाव, हस्ताक्षरावरुन स्वभाव ठीक आहे. पण " अपना हात जगन्नाथ" वाल्यांच्या कुठल्या रेषा वा कुठले अक्षर घेणार? तात्या. खॆ खॆ खॆ खॆ....
प्रकाश घाटपांडे

लबाड बोका's picture

2 Oct 2007 - 6:08 pm | लबाड बोका

तात्या

लवकर उत्तर द्या

सुमीत's picture

3 Oct 2007 - 6:52 pm | सुमीत

उत्तराची वाट पाहात आहे.

लिखाळ's picture

3 Oct 2007 - 9:11 pm | लिखाळ

नमस्कार तात्या,
सही पाठवत आहे. लवकर विश्लेषण लिहा.

शुभेच्छा ! (तुम्हाला आणि मला सुद्धा :)
--लिखाळ.

लबाड बोका's picture

5 Oct 2007 - 5:34 pm | लबाड बोका

का हो तात्या लहान पाहुन येड्यात काढ्ता व्हय?
अजुन उत्तर का मुन नाही देत?
आमी लइ वाट पातो हाय.

दुर्मु़खलेला बोका

काही निरीक्षणे, काही अनुमाने (थोडी गंमत आहे. कृपया lightly घ्यावे.) -

(१) हरहुन्नरी पण आळशी
(२) आरंभशूर, पण काम पुर्ण करण्याचा कंटाळा
(३) एक ना धड, भाराभर चिंध्या - कुठल्याही क्षेत्रात नाव मिळवता येईल, पण चंचल स्वभावामुळे पाठपुरावा नाही.
(४) लोकप्रियतेची आवड आणि लोकांमधे रमायला आवडत पण फटकळपणामुळे लोक दुरावतात.
(५) उमदा आणि मनमिळावू स्वभाव पण अत्यंत अभिमानी व फटकळ.

तात्या, कितपत बरोबर आहे? ;)

विसोबा खेचर's picture

6 Oct 2007 - 5:33 pm | विसोबा खेचर

मानलं तुम्हाला! तुम्ही माझ्यातले गुणदोष अगदी बरोब्बर दाखवून दिले आहेत... :)

(१) हरहुन्नरी पण आळशी
(२) आरंभशूर, पण काम पुर्ण करण्याचा कंटाळा

अगदी खरं! हस्ताक्षरं मागवली खरी पण आता मला प्रत्येकाचे हस्ताक्षर निरखून पाहून त्याचं विश्लेषण करायचा अचानक कंटळा आला आहे. च्यामारी आपण कुठून ही टूम काढली असंच आता मला वाटू लागलं आहे हे कबूल करतो... तरीही मी आज ना उद्या माझं प्रॉमिस नक्की पुरं करीन. अजून थोडासा वेळ द्या प्लीज. कामांच्या गदारोळात सध्या निवांतपणाच मिळत नाहीये. तसंच संगीतावरचा एक लेख पूर्ण करायच्या मागे आहे व रौशनीचा पुढचा भागही सध्या लिहून पूर्ण करायच्या मागे आहे. असं असतांना मी हे हस्ताक्षराचं नवीन प्रकरण काढायला नको होतं असं वाटतं. च्यामारी, चुकलंच माझ! :)

आपला,
(अपराधी) तात्या.

आर्य चाणक्य's picture

8 Oct 2007 - 8:00 am | आर्य चाणक्य

तात्या इथल्या लोकांच्या प्रतिक्रीया पाहून सही पाठवायची का नाही हे आम्ही विचाराधीन ठेवले आहे. तुम्हीच सांगा आम्ही नक्की काय करायचे ते.
-चाणक्य

विसोबा खेचर's picture

8 Oct 2007 - 8:21 am | विसोबा खेचर

चाणक्यराव,

हस्ताक्षराचा नमुना अवश्य पाठवा, पण जरा सवडीने! सध्या आम्ही काही इतर लेखनात जरा व्यग्र आहोत, तसेच कामधंद्याच्या व्यापापायी हवा तसा निवांतपणाही मिळत नाही. सबब आम्ही हस्ताक्षराच्या विश्लेषणाचे काम आम्ही काही काळाकरता स्थगित केले आहे..

असो..

तात्या.

सखाराम_गटणे™'s picture

11 Jan 2009 - 8:14 pm | सखाराम_गटणे™

मी पण माझी सही पाठवतो आहे, १-२ दिवसांत

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

sanjubaba's picture

12 Jan 2009 - 10:07 am | sanjubaba

तात्या,

मी पण सही पाठवली आहे, उत्तराची वाट पहात आहे.

सन्जुबाबा.......