राम राम मंडळी,
हस्ताक्षरावरून स्वभाव ओळखण्याचे एक शास्त्र आहे. मी या शास्त्राचा अभ्यास गेली अनेक वर्ष करत आहे. या कालावधीत आत्तापर्यंत अनेकांचे हस्ताक्षर बघायला मिळाले, अभ्यासायला मिळाले.
मंडळी, माणसाचा स्वभाव हे एक अजब रसायन आहे. त्याचा संपूर्ण थांग आजपर्यंत कुणालाही लागलेला नाही हे मलाही मान्य. परंतु समजा मी एखाद्या माणसाला प्रत्यक्ष ओळखत असेन, त्याचा स्वभाव मला चांगला माहीत असेल, तरीही त्याचे हस्ताक्षर तपासल्यावर खूप काही नवीन गोष्टी कळू शकतात, कळतात!
'साधारणपणे माणसाचा स्वभाव जसा असतो त्याच पद्धतीने त्याच्या हाताचे वळण असते' या सिद्धांतावर हे शास्त्र उभे आहे. सहसा माणसाचे अक्षर खोटे बोलत नाही असा माझा अनुभव आहे. आजपर्यंत या शास्त्राच्या केलेल्या अभ्यासामुळे काही काही हस्ताक्षरं तर माझ्याशी थेट बोलतात आणि त्या माणसाचा स्वभाव भराभरा माझ्यासमोर उलगडतो असाही अनुभव आहे. अर्थात, मी वर म्हटल्याप्रमाणे मनुष्य स्वभाव (खास करून स्त्रियांचा स्वभाव) हे एक अजब रसायन आहे, त्यामुळे एखाद्याच्या हस्ताक्षराचे एनालिसिस जमत नाही किंवा चुकूही शकते. एक गोष्ट मात्र निश्चित की काही काही वेळेला हस्ताक्षराच्या एनालिसिसमुळे आपल्याच स्वभावातील काही सूप्त गुणदोष आपल्याला कळू शकतात. कदाचित ते कळल्यावर त्याचा आपल्याला त्याचा फायदाही होऊ शकतो!
तर मंडळी, हे सगळं इथे लिहिण्याचं कारण असं की आता आपण इथे एक गंमतीशीर प्रयोग करणार आहोत. ज्यांना आपल्या हस्ताक्षराचे एनालिसिस माझ्याकडून करवून घ्यायचे असेल त्यांनी आपली इंग्रजी किंवा मराठी सही एका स्वच्छ कागदावर करून स्कॅन करून ते सँपल मला visoba_khechar@yahoo.com या पत्त्यावर पाठवावे. सहीखाली कंसात आपला मिसळपावचा आयडी लिहिण्यास विसरू नये. आपण बँकेतून पैसे काढताना किंवा क्रेडिट कार्डाच्या मागे जी सही करता ती सही मला कृपया पाठवू नये!! :))
एखादी नवी सही करा आणि ती मला पाठवा. जी सही आपल्या स्वभावानुसार आपल्याला सहज करायला जमेल तशी करा आणि ती मला पाठवा. मी आलेल्या सह्या इथे प्रसिद्ध करून त्याचं जाहीर एनालिसिस इथे लिहीन! :)
कळू देत तरी एकमेकांना एकमेकांचे स्वभाव! :)
तसे इथे साधारणपणे लिखाणावरून स्वभावाने कोण कसं आहे याचा अंदाज आपल्याला आहेच, तरीही काही गोष्टी नव्याने कळतील! :)
आणि हो, एका बाबतीत मात्र निश्चिंत रहा, की केवळ एक गंमत म्हणून हा खेळ आपण इथे खेळत आहोत. एखाद्याच्या स्वभावात मला जर काही वेगळेपणा दिसला, जेणेकरून येथील वातावरण गंभीर होऊ शकेल असं काही आढळलं तर ते मी इथे अर्थातच लिहिणार नाही. ती गोष्ट मी संबंधित सभासदाला व्य नि ने कळवीन आणि त्याबाबत कुठेही वाच्यता करणार नाही एवढा विश्वास असू द्या! आणि अहो शेवटी मी तरी देव थोडाच आहे की मला अगदी सगळ्या गोष्टी इन ऍन्ड आऊट कळाव्यात? :)
असो, तर मंडळी लागा कमाला. एखाद्या छानश्या कागदावर आपली मराठी किंवा विंग्रजी सही ठोका, त्याखाली आपला आयडी लिहा आणि द्या पाठवून मला!
मग सांगतो इथे बरोब्बर कोण कसा आहे नी कोण कसा! :)
आपला,
(ग्राफालॉजिस्ट) तात्या अभ्यंकर.
वाचने
64949
प्रतिक्रिया
70
मिसळपाव
प्रतिक्रिया
बिघडलेले अक्षर
हेच म्हणतो
In reply to बिघडलेले अक्षर by प्रियाली
तात्या, सर्वांच्या सह्या
In reply to बिघडलेले अक्षर by प्रियाली
पाठवली
टोपणनांवाची सही चालेल! :)
विनवणी
In reply to टोपणनांवाची सही चालेल! :) by विसोबा खेचर
चुकलं बुवा! :)
In reply to विनवणी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
कसा हाणला !
In reply to चुकलं बुवा! :) by विसोबा खेचर
:)
In reply to कसा हाणला ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
म्हणून तर!
In reply to :) by विसोबा खेचर
छान आयडीया
वा वा
लाडवांचा निकाल! :)
In reply to वा वा by लिखाळ
एक सुंदर सही मिळाली आहे! :)
खरंच सुंदर!
In reply to एक सुंदर सही मिळाली आहे! :) by विसोबा खेचर
मी सांगतो
In reply to खरंच सुंदर! by प्रियाली
वा!वा!
In reply to मी सांगतो by सहज
- साधी बाहेर जाण्याची तयारी = १०-१५ मि.
- एखाद्या बर्या ठिकाणी (रेस्टॉरंट, मॉल) = २० ते ३० मि.
- लग्न/ समारंभ इ. इ. = दिड ते २ तास. (खरं म्हणजे ३-४ दिवस)
:)))))))) प्रतिसाद पुन्हा एडिट केला. ;-)पूर्वतयारी
In reply to वा!वा! by प्रियाली
अभिजितच्या सहीचे एनालिसिस..:)
In reply to एक सुंदर सही मिळाली आहे! :) by विसोबा खेचर
बर्यापैकी सहमत
In reply to अभिजितच्या सहीचे एनालिसिस..:) by विसोबा खेचर
हस्ताक्षर, स्वाक्षरी
सही
तात्या
वेलणकर कोण?
In reply to तात्या by धोंडोपंत
अरे जाऊ दे रे!
In reply to तात्या by धोंडोपंत
मलाही सांगा...
मी ही..
स्वाक्षरी
लाडूसाहेब,
In reply to स्वाक्षरी by बेसनलाडू
दोन्ही हाताने लिखाण
घाटपांडेसाहेब,
In reply to दोन्ही हाताने लिखाण by प्रकाश घाटपांडे
बिरुटेसाहेबांची सही..:)
आम्ही
In reply to बिरुटेसाहेबांची सही..:) by विसोबा खेचर
आम्ही बिरूटे साहेबांचे फॅन आहोत,
In reply to आम्ही by राजे (verified= न पडताळणी केलेला)
सहजराव,
In reply to आम्ही बिरूटे साहेबांचे फॅन आहोत, by सहज
चांगला प्रयत्न !
In reply to सहजराव, by विसोबा खेचर
आम्हांस वाटले नव्हते आमची सही इतक्या आतल्या गाठीची असेल म्हणून, खरे तर तिच्यामुळेच आमच्या स्वभावाला हे विशेषण लागले असावे ;) बाय द वे , आपण केलेले विश्लेषण आणि आमचा स्वभाव कुठेच मिळता जुळता नाही, आणि जे काही वाटते (प्रेमळ,दयाळू वगैरे ) ते मात्र सामान्य ठोकताळे आहेत हे सांगण्यास अधिक आनंद होत आहे.( आवडले नाही म्हणून आम्ही असे म्हणत नाही !)
एकंदरीत खूपच इंटरेस्टिंग सही आहे ही. परंतु मला ती संगणकाच्या पडद्यावर बघायला मिळाली त्यामुळे हाताचा दबाव कसा आहे हे समजत नाही. यांची प्रत्यक्ष कागदावर केलेली सही बघायला मिळाल्यास जास्त मजा येईल आणि अजून काही गोष्टींचा उलगडा होईल!
झाले ते आणि केलेल्या विश्लेषणामुळे ;) आम्ही पुर्णपणे समाधानी असून, आमचे (नसलेले) अधिक गुण मित्रपरिवारासमोर आणण्याची आमची आता तरी इच्छा नाही ;)
एक विनंती
मी पण वाट पहात आहे...
नाना फडणवीस
व्वा! व्वा!
In reply to नाना फडणवीस by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मांडवगणे !
In reply to व्वा! व्वा! by बेसनलाडू
पन
In reply to मांडवगणे ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
डायवर सारखा वाग तरी!
In reply to पन by बेसनलाडू
अग्गोबाईईईई!!!!!
In reply to डायवर सारखा वाग तरी! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
ढग्गोबाईईईईई !!!
In reply to अग्गोबाईईईई!!!!! by बेसनलाडू
हवालदार
In reply to मांडवगणे ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
चूक
In reply to हवालदार by सहज
लायसन?
कुणी सांगावे
In reply to लायसन? by प्रमोद देव
तात्या, मी
मिसळपावला हार्दिक शुभेच्छा!
वाह!!
लवकरच लिहितो..
हस्ताक्षरावरून स्वभाव! :)
थोडं थांबा,
२ ऑक्टोबर... ही घ्या सही
मोहनदास
In reply to २ ऑक्टोबर... ही घ्या सही by विसुनाना
द. अफ्रीकेत
In reply to मोहनदास by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
ठीक आहे! :)
In reply to द. अफ्रीकेत by सहज
हस्तांतरित
सही पाठवली
सही पाठवली आहे
सही पाठवत आहे.
का हो तात्या
हस्ताक्ष्रर न पहाता तात्याचा स्वभाव
मनिषराव,
In reply to हस्ताक्ष्रर न पहाता तात्याचा स्वभाव by मनिष
हस्ताक्षर
अवश्य..
In reply to हस्ताक्षर by आर्य चाणक्य
मी पण माझी
सही पाठवली ......