वर्तूळ

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
13 May 2010 - 8:29 pm

वर्तूळ

घाटदार घाट रस्ता नागमोडी
चढावा कोणी

हिरकंच जंगलात जाई पायवाट
बारीकशी त्यात

उत्तूंग मंदिराचा डेरेदार कळस
जाई नभात

नभात निळ्या जलद सावळा
एकटा भटका

आरसपानी तलावात न्याहळे स्व:ताला
पुर्ण करी एका वर्तूळाला

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१३/०५/२०१०

शांतरसकविता

प्रतिक्रिया

sur_nair's picture

14 May 2010 - 4:11 am | sur_nair

वा, क्या बात है. नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या वळणाची आहे ही तुमची कविता. मनापासून आवडली.

अक्षय पुर्णपात्रे's picture

14 May 2010 - 7:04 am | अक्षय पुर्णपात्रे

पाषाणभेद, कविता आवडली. थोडी ठोकठाक करण्याचे मनावर घ्यावे आणि काही खूपणारे शब्द बदलावे ही नम्र विनंती.