वीकान्त

स्पंदना's picture
स्पंदना in जनातलं, मनातलं
4 Apr 2010 - 5:42 pm

प्रत्येक वीकान्ताला मे आकान्त करते अस माझा नवरा मला म्हणतो.
थोड्या अन्शी ते खर हि आहे. पण अस म्हणायला त्याचे काय जाते अस माझ ही म्हणन आहे.
आता तुम्हि म्हणाल काय झाल या बाइला एकदम वीकान्ता वर का उठ्ली? तर साग॑तेच. .ऐका.

"आज शनिवार उद्या रवीवार" अशी घोषणा देत आमचे धनि जागे होतात. "अग शनिवार तर आहे. कशाला उठतेस?" अस खट्याळ पणे म्हणत मला परत अन्थरुणात ओढल जात.
सलामिलाच आम्ही चीत. मग् रेन्गाळत आळोखे पिळःओखे देत तो तासाभरान आरामात उठतो. आता यात दुख: कशात आहे अस विचाराल तर त्याचा खट्याळ पणा सम्पला कि मला उठुन चहा करावा लागतो. आणि उठल्या उठल्या चहा मिळाला नाही तर तो अतिशय दुखी: चेहर् याने अर्धा दिवस काढतो. बर या घरट्यात आम्हि दोघेच नाहि, आंमची दोन चिमणी पण एथे प्रचन्ड चिवचिवाट करत असतात.

आठवडा भर तस वेगळ गणित असत. रोज सकाळि ऊठुन पहिला शाळा, ऑफिस गाठायच ध्येय समोर असल्याने कुणीही विशेष माझ्या आज्ञेबाहेर नसते. एखद्या कसबी रिंग-मास्तर प्रमाणे मी माझ्या कुटुंबाचा गाडा हाकत असते. पण शुक्रवार संध्याकाळ मला बंडाची सुरवात असल्याची जाणीव करून देते. "उद्या सुट्टी ना पपा?" अस त्याच्या लाडात येऊन माझ्याकडे कडवट कटाक्ष टाकले जातात. हा लाडका पपा गेले पाच दिवस एखाद्या लढवय्या सारखा फक्त ऑफिस आणि ऑफिस करीत होता हे सोयीस्कर रित्या विसरलं जाते. तो हि आरामात त्या दोघांना अंगावर खेळवत सोफ्यावर पडून राहतो. मग उद्या उठायचं नाही म्हणून रात्री वेळ पर्यंत TV पहिला जातो. अंगावर माकडासारखी पोर घेवून तोहि तिथेच आडवा होतो. हे सार बिऱ्हाड आपापल्या अंथरुणात पोहोचवायच काम मग मला कराव लागत.
"मुलं झोपली?" आता तो जागा होतो. " चल; नोटबुक वर मी एक चांगला पिक्चर डाउनलोड केलाय. राहू दे ना काम; उद्या करू." हे उद्या करायचं काम मग वीकांत संपला तरी तसंच राहिलेलं असत.
दुसरा दिवस मी वर उल्लेखलेलाच आहे.
देवाच्या कृपेने एक कन्यारत्न आणि एक बाळकृष्ण पदरात असलेली मी मग पाहिलांदा कन्यारत्नाच्या मागे हात धुवून (अस त्यांना वाटत) लागते. एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल की इथे दोन गट पडलेले आहेत. मी अर्थातच शत्रुपक्ष. तर माझ्या मातृत्वाला आठवड्यातून एकदा तिला तेल लावून न्हाऊ माखू घालाव हे कर्तव्य वाटत. मुलीची जात आहे माझ्याशिवाय कोण करील तीच? अस हि वाटत. पण आमच्या कन्यारत्नाला तो छळवाद वाटतो. "पपा बघाना! किती तेल लावते! मला नको. तू घसा घसा घासतेस. माझे केस दुखतात." मग पपा "राहूदे ग " अस TV कड बघत म्हणतो.
मला एक कळत नाही तो भिंतीला टांगलेला T V जरा नजर फिरली तर कुठे पळून जातो का? तर त्याच तिच्याकड विशेष लक्ष नसल्याने हि चकमक मी जिंकते. एव्हाना बारा वाजत आलेले असतात. सकाळचा चहा, दुध पोटातून गायब झालेले असतात. आमच्या बालकृष्णाच घर भर हुंदडून झालेलं असत. "आई भूक लागली" तो लाडिक पणे गळ्यात पडतो. अंह गैरसमज नको. दर पंधरवड्याला मी याचे केस कापते. भारताच्याबाहेर दर पंधरवड्याची केश कर्तनाची चैन कुणालाही परवडत नाही. तेंव्हा मी शत्रुपक्षच ! मग शनिवार म्हणून आधी तयारी करून ठेवलेलं काही तरी खास शाकाहारी मी भर भर बनवते. विकांताला उठवायचे, भरवायचे, हलवायचे असे सारे काम मला करावे लागते. जणू आठवडा भर थकून यांचे आठवड्याच्या शेवटी पुतळे होतात.

(भाग पहिला)

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

4 Apr 2010 - 5:54 pm | पर्नल नेने मराठे

मस्त लिहिलेय :D
चुचु

चक्रमकैलास's picture

4 Apr 2010 - 6:23 pm | चक्रमकैलास

----"अग शनिवार तर आहे. कशाला उठतेस?" अस खट्याळ पणे म्हणत मला परत अन्थरुणात ओढल जात.---

व्वा..!! मजा आहे बुवा..!! ;)
पण छान लिहिले आहेस..

--नसूनही असलेला चक्रम कैलास...!!

अरुंधती's picture

4 Apr 2010 - 6:30 pm | अरुंधती

छान! पुढील भागाच्या प्रतीक्षेत! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मजा आली वाचुन अजुन येउद्यात. पुढील लिखणास शुभेच्छा

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

भाग्यश्री कुलकर्णी's picture

4 Apr 2010 - 10:25 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त लिहीले आहेस.

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Apr 2010 - 11:40 pm | बिपिन कार्यकर्ते

एकदम जबरी... दुसरा पॅरा एकदम 'प्यारा' झालाय. :D

पुढच्या भागाची वाट बघतोय. लवकर लिहा...

बिपिन कार्यकर्ते

शुचि's picture

4 Apr 2010 - 11:53 pm | शुचि

>>"आज शनिवार उद्या रवीवार" अशी घोषणा देत आमचे धनि जागे होता>> =))
लेख आवडला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I fly when you persue me, But when you shy I woo thee
Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.

चटोरी वैशू's picture

5 Apr 2010 - 8:07 am | चटोरी वैशू

मस्तच असतो कि तुमचा विकांत.... सुरवातच एकदम रोमांचक ("अग शनिवार तर आहे. कशाला उठतेस?" अस खट्याळ पणे म्हणत मला परत अन्थरुणात ओढल जात.)

"मुलं झोपली?" आता तो जागा होतो. : )

....

आवडला आपल्याला तुमचा विकांत...

अस्मी's picture

5 Apr 2010 - 11:20 am | अस्मी

छान लिहिलंय..:)
पुढचा भाग लवकर टाका

- अस्मिता

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.

Pain's picture

5 Apr 2010 - 1:46 pm | Pain

हेहे ! आवडले !