..विश्वामित्र..

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जे न देखे रवी...
28 Mar 2010 - 8:35 pm

...विश्वामित्र....

नको वाळवुस तु असे..
केस ओलेचिंब उन्हात..
वणवा पेटतो गं माझ्या.
हळव्या नाजुक मनात..

लगबगीने जाशी तु..
केस ओले आवरीत..
ओला पदर सावरीत..
उतरावया दुधाचे भांडे ते उष्ण..
मी पुजेत दंग..पडे सारखा सारखा..लंगडा तो बाळकृष्ण..

हलक्यानेच पुसशी तु..
अंगावरुन ओघळते मोती..
वाटे..सारे देव देव्हार्यातले
तुला वळुन वळुन पाहती..

माझ्या नावाचे ते कुंकु..
तु लावशी ठसठशीत..
दिसशी रुपवान अप्सरा..
मी मंत्र पुटपुटे अडखळीत..

गंध..सुवासिक लावुनि..
कशी फिरशी तु घरभर..
पुजा उरे उपचार
मन माझे सैरभैर...

बांधीशी तु गाठ अशी...
बघुन पाठमोरी आरश्यात..
आरती चाले कशीबशी
माझे लक्ष लागेना कशात..

रोज रोज सकाळी..माझा तपोभंग..चालु राही हे सत्र..
तु भासशी मेनका ..कसे टाळावे रोज...मी न बनणे विश्वामित्र...

--- योगेश

शृंगारकविता

प्रतिक्रिया

शुचि's picture

28 Mar 2010 - 9:02 pm | शुचि

आई शप्पत ...... काय रसिक आहात योगेश साहेब. मला सर्वात आवडलेली ही कविता. मार डाला!!!!!!!!
सु-प-र्ब!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

चित्रगुप्त's picture

10 Apr 2010 - 12:22 pm | चित्रगुप्त

राजेश घासकडवी's picture

29 Mar 2010 - 12:04 am | राजेश घासकडवी

तु भासशी मेनका ..कसे टाळावे रोज...मी न बनणे विश्वामित्र...

कसे टाळावे रोज... मी बनणे विश्वामित्र
म्हणायचं आहे का? कारण विश्वामित्र न बनणं हे टाळणं सोपं आहे असं एकंदरीत वर्णनावरून वाटलं... :-)

राजेश

कानडाऊ योगेशु's picture

29 Mar 2010 - 12:51 pm | कानडाऊ योगेशु

धन्यवाद शुचिताई आणि राजेश.

@राजेश
कसे टाळावे रोज... मी बनणे विश्वामित्र
तुम्ही बरोबर लिहिलेत.
विश्वामित्र बनणे टाळायचे फार अवघड आहे. ;)

(तपोभंगीत)योगेश

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

धनंजय's picture

9 Apr 2010 - 5:28 pm | धनंजय

रातराणी/पारिजात कविता वाचून मागल्या कविता शोधल्या. ही कल्पक आहे, आणि बरीच अकृत्रिम आहे.

ही आवडली.

मदनबाण's picture

9 Apr 2010 - 5:29 pm | मदनबाण

च्यामारी वणवा पेटला ना हिथ !!! ;)
लयं भारी !!! :)
मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

पक्या's picture

9 Apr 2010 - 9:26 pm | पक्या

लय भारी.
मस्त जमलीये कविता.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

बेसनलाडू's picture

10 Apr 2010 - 12:06 am | बेसनलाडू

फारच आवडली.
(ब्रह्मचारी)बेसनलाडू

मुळात म्हणजे कवितेत कोणताही दांभिकपणा नाही. अगदी पूजेच्या वेळीही मन कामोद्दीपित (?) झाले आहे, हे मान्य करण्याचा सच्चेपणा महत्त्वाचा!
(प्रामाणिक)बेसनलाडू

गुलजारांची एक त्रिवेणी - शांताबाई शेळक्यांनी अनुवाद केलेली - आठवली:

कितीतरी आणखी सूर्य उडाले आकाशात
मी आकाशाचे गूढ उकलत होतो

ती टॉवेलने केस झटकत होती...

(स्मरणशील)बेसनलाडू

टारझन's picture

10 Apr 2010 - 2:29 am | टारझन

काणडाऊ योगेशु ... :) चालु दे भो @@
सगळेच देव वळुन वळुन पाहातात ..

बाकी खर्‍या देवीची पुजा करायची सोडुन देव्हार्‍यातल्या मुर्तीमंत देवांची पुजा करायची ... ह्या सारखा दुसरा करंटेपणा कुठला ? :)

-( ऐच्छिक पुजारी) कॅनायडु पुजेशु

स्पंदना's picture

10 Apr 2010 - 7:55 am | स्पंदना

द्रुष्ट लागेल ग! द्रुष्ट लागेल ग!
मान वेळावुनि............

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

चित्रगुप्त's picture

10 Apr 2010 - 11:45 am | चित्रगुप्त

छान..............

केस ओले आवरीत..
ओला पदर सावरीत..

माझ्या नावाचे ते कुंकु..
तु लावशी ठसठशीत..
दिसशी रुपवान अप्सरा..

....रोज रोज सकाळी..माझा तपोभंग..चालु राही हे सत्र..
तु भासशी मेनका... .


नको वाळवुस तु असे..
केस ओलेचिंब उन्हात..

चित्रगुप्त's picture

10 Apr 2010 - 12:00 pm | चित्रगुप्त

बांधीशी तु गाठ अशी...
बघुन पाठमोरी आरश्यात..

पाषाणभेद's picture

10 Apr 2010 - 12:49 pm | पाषाणभेद

आमच्या दिपकजींची आठवण झाली फोटो पाहून.

बाकी योगेशू काय जबरदस्त लिहीलेस रे बाबा तू. मरून गेलो मी.

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

चित्रगुप्त's picture

10 Apr 2010 - 3:49 pm | चित्रगुप्त

हे दीपकजीं आणि त्यांचे कोणते फोटो .....वगैरे कळवा....

कानडाऊ योगेशु's picture

17 Apr 2010 - 1:17 pm | कानडाऊ योगेशु

चित्रगुप्तकाका,
फोटुचा अँगल चुकला आहे.
कवितेतील कडव्यानुसार ,आरशाकडे पाठ करुन ती आरशात पाहुन गाठ बांधत आहे.
(पुन्हा एकदा चित्रगुप्तकाकांना फोटु शूट करावे लागणार. :& )

(परफेक्शनिस्ट) योगेश.
विस्तार : कवितेला दिलेले चित्ररूप आवडले.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

चित्रगुप्त's picture

17 Apr 2010 - 6:26 pm | चित्रगुप्त

......फोटुचा अँगल चुकला आहे. कवितेतील कडव्यानुसार ,आरशाकडे पाठ करुन ती आरशात पाहुन गाठ बांधत आहे.......

अहो, आम्हाला अभिप्रेत असलेली गाठ जरा वेगळ्या प्रकारची आहे..... बघा जरा लक्ष देऊन पुन्हा एकदा...

शशिकांत ओक's picture

10 Apr 2010 - 4:27 pm | शशिकांत ओक

चित्रगुप्त राव,
समस्त नारी लोकातील इतकी मस्त मस्त, भन्नाट मॉडेल्स एकत्र आणून त्या लावण्यकवितेत मादकता इतकी आली की लोक विसरले की कोण गुप्तपणे चित्रे काढतोय ते. इतकी बारीक नजर नारी जगतावर, छुप्या कॅमेऱ्यांचे अनोखे एन्गल्स, तो तंबोरा, ती मुरली यांचा हेवा वाटावा.

"नारी"ग्रंथावरील अधिक माहितीसाठी
संपर्क - यमराज सदन, पिछाडीचा बोळ,
चित्रगुप्त
शशिकांत