...विश्वामित्र....
नको वाळवुस तु असे..
केस ओलेचिंब उन्हात..
वणवा पेटतो गं माझ्या.
हळव्या नाजुक मनात..
लगबगीने जाशी तु..
केस ओले आवरीत..
ओला पदर सावरीत..
उतरावया दुधाचे भांडे ते उष्ण..
मी पुजेत दंग..पडे सारखा सारखा..लंगडा तो बाळकृष्ण..
हलक्यानेच पुसशी तु..
अंगावरुन ओघळते मोती..
वाटे..सारे देव देव्हार्यातले
तुला वळुन वळुन पाहती..
माझ्या नावाचे ते कुंकु..
तु लावशी ठसठशीत..
दिसशी रुपवान अप्सरा..
मी मंत्र पुटपुटे अडखळीत..
गंध..सुवासिक लावुनि..
कशी फिरशी तु घरभर..
पुजा उरे उपचार
मन माझे सैरभैर...
बांधीशी तु गाठ अशी...
बघुन पाठमोरी आरश्यात..
आरती चाले कशीबशी
माझे लक्ष लागेना कशात..
रोज रोज सकाळी..माझा तपोभंग..चालु राही हे सत्र..
तु भासशी मेनका ..कसे टाळावे रोज...मी न बनणे विश्वामित्र...
--- योगेश
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5086
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
आई शप्पत
केस ओले आवरीत.. ओला पदर सावरीत..
In reply to आई शप्पत by शुचि
दोन नकार
धन्यवाद!
हे आवडले
च्यामारी
लय
अप्रतिम कविता
काणडाऊ
द्रुष्ट
केस ओले आवरीत.. ओला पदर सावरीत..
पाठमोरी आरश्यात..
आमच्या
In reply to पाठमोरी आरश्यात.. by चित्रगुप्त
दीपकजींचे फोटो कोणते.....वगैरे
In reply to आमच्या by पाषाणभेद
चित्रगुप्
In reply to पाठमोरी आरश्यात.. by चित्रगुप्त
... गाठ
In reply to चित्रगुप् by कानडाऊ योगेशु
पुजा उरे उपचार