बिपिन आणि अन्य नाडी उत्सुक मित्र हो,

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
13 Mar 2010 - 11:20 am

आधीच्या नाडीग्रंथांवरील अदभूत कथनाच्या धाग्यावरील माझा प्रतिसाद इतका खोल गेला की त्या मुळे दुर्लक्ष होऊन मी प्रतिसादाला उत्तर दिले नाही असा संशय येऊ नये. म्हणून येथे नवा धागा टाकत आहे. राग नसावा.

ओकसाहेब, मी आणि मिपावरील अजून एक सदस्या, हे नाडी प्रकरण काय आहे हे पडताळून बघण्यासाठी उत्सुक आहोत. तरी त्यासाठी काय करावे लागेल ते सांगावे.

पुण्यात कुठे जावे लागेल?
किती खर्च येईल?
नाडी बघण्याआधी स्वतःची काय आणि किती वैयक्तिक माहिती द्यावी लागेल?
नाडी वाचनाला किती दिवस लागतील?
फक्त भूतकाळच सांगितला जातो की भविष्यकाळही सांगितला जाईल?
किती तपशीलात जाऊन सांगितले जाईल?
नाडीवाचन खरे ठरले नाही तर पैसे परत मिळतील का?

कृपया, कळवणे. वाट बघत आहोत.

बिपिन आणि अन्य नाडी उत्सुक मित्र हो,

आपणाला नाडी केंद्रांचे पत्ते द्यायला मला शक्य आहे पण ते या ठिकाणी दिले तर जाहिरात बाजीचा आरोप होईल असे वाटून मी असे सुचवतो की आपण नाडी ग्रंथ भविष्य पुस्तक वाचावे. नितीन प्रकाशन, अप्पा बळवंत चौक, पुणे. किं ५०.
त्यात पुण्याच्या केंद्रांचे पत्ते व अन्य माहिती आहे.

आपण पुण्यात आहात तर आपण प्रत्यक्ष जाऊन पाहिले तर बरे. मी आपणांला किंवा कोणाला अमुक केंद्रात जा असे सुचवत नाही. आपणाला सोईचे वाटेल तसे पहावे.
फीज ३०ते ६२५ च्या मधे विविध केंद्रांत आहे. ती तशी का वा अन्य आपल्या विचारणा आपण त्यांच्या कडून समजून घेतलेल्या बऱ्या. तमिळजाणकाराला बरोबर न्यावे. म्हणजे नाडी पट्टीतील नावे शोधायला मदत होईल. केंद्राला फोटो काढून देण्यास विनंती करावी. त्याची कॉपी नंतर उपयोगाला येईल.वही देणार का विचारावे. काही कारणांनी ते देत नसतील तर देणाऱ्या केंद्रात जावे. काही कारणानी पट्टी सापडत नसेल तर दुसऱ्या केंद्रात जाऊन सापडेपर्यंत शोध घ्यावा.

आपणांस आणखी एक विनंती आहे की नाडी केंद्रात पट्टीचा शोध होण्या आधी महर्षींना प्रार्थना करावी आम्ही आपली परीक्षा घ्यायला आलेलो नाही. आपले आशीर्वाद मिळावेत यासाठी व पुढील आयुष्यासाठी काही मार्गदर्शन मिळावे म्हणून आलो आहे. कृपा करावी.

हार व फुले घालता आली व दीप दर्शवता आला तर चांगले. आपला अनुभव कळवावा. आपण केंद्रात असताना प्रत्यक्ष भेटता आले तर आवडेल.

धोरणप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Mar 2010 - 11:52 am | बिपिन कार्यकर्ते

आपणाला नाडी केंद्रांचे पत्ते द्यायला मला शक्य आहे पण ते या ठिकाणी दिले तर जाहिरात बाजीचा आरोप होईल

मी स्वतःहून मार्गदर्शन मागितले आहे तेव्हा जाहिरातबाजीचा आरोप वृथा ठरेल.

असे वाटून मी असे सुचवतो की आपण नाडी ग्रंथ भविष्य पुस्तक वाचावे. नितीन प्रकाशन, अप्पा बळवंत चौक, पुणे. किं ५०. त्यात पुण्याच्या केंद्रांचे पत्ते व अन्य माहिती आहे.

ठीक. पण आपण काही सुचवले तर ते अधिक उत्तम ठरले असते.

आपण पुण्यात आहात तर आपण प्रत्यक्ष जाऊन पाहिले तर बरे. मी आपणांला किंवा कोणाला अमुक केंद्रात जा असे सुचवत नाही. आपणाला सोईचे वाटेल तसे पहावे.

ठीक. पण आपण काही सुचवले तर ते अधिक उत्तम ठरले असते.

फीज ३०ते ६२५ च्या मधे विविध केंद्रांत आहे. ती तशी का वा अन्य आपल्या विचारणा आपण त्यांच्या कडून समजून घेतलेल्या बऱ्या.

हे ही ठीक.

तमिळजाणकाराला बरोबर न्यावे.

र्‍होऽऽऽम्ब प्राब्लेम!!!

म्हणजे नाडी पट्टीतील नावे शोधायला मदत होईल. केंद्राला फोटो काढून देण्यास विनंती करावी. त्याची कॉपी नंतर उपयोगाला येईल.वही देणार का विचारावे. काही कारणांनी ते देत नसतील तर देणाऱ्या केंद्रात जावे. काही कारणानी पट्टी सापडत नसेल तर दुसऱ्या केंद्रात जाऊन सापडेपर्यंत शोध घ्यावा.

ही केंद्रं एकमेकांशी निगडीत आहेत का? असतील तर त्यांच्या धोरणांमधे फरक का? नसतील तर त्यांच्या कडे उपलब्ध असलेल्या नाडीपट्ट्यांमधे संमिश्रता कशी?

आपणांस आणखी एक विनंती आहे की नाडी केंद्रात पट्टीचा शोध होण्या आधी महर्षींना प्रार्थना करावी आम्ही आपली परीक्षा घ्यायला आलेलो नाही. आपले आशीर्वाद मिळावेत यासाठी व पुढील आयुष्यासाठी काही मार्गदर्शन मिळावे म्हणून आलो आहे. कृपा करावी.

प्रयत्न करू. तसाही हा एकदा स्वतः अनुभव घ्यावा असे वाटले म्हणूनच हा खटाटोप आहे. पण परीक्षा घेऊ नये हे मात्र पटत नाही. फार मोठ मोठ्या संतांनीही गुरू आणि शिष्य परिक्षा केल्याशिवाय केले नाहीत. तरीही प्रयत्न करू.

हार व फुले घालता आली व दीप दर्शवता आला तर चांगले.

बहुतेक जमणार नाही. प्रामाणिकपणे सांगतो.

आपला अनुभव कळवावा.

प्रश्नच नाही.

आपण केंद्रात असताना प्रत्यक्ष भेटता आले तर आवडेल.

असं झालं तर सोन्याहून पिवळं.

ओकसाहेब, गोळाबेरिज, आत्तापर्यंतची, एवढीच... तुमच्याकडून फारसे काही मार्गदर्शन झाले नाही. तुम्ही तुमच्या माहितीतल्या पुण्यातल्या सगळ्यात चांगल्या अथवा विश्वासार्ह केंद्राची माहिती कळवावी अशी परत एकदा विनंति.

बिपिन कार्यकर्ते

Nile's picture

13 Mar 2010 - 11:56 am | Nile

शेवटी बोललो तेव्हा बरे होतात की हो तुम्ही! असे अचानक??

शशिकांत ओक's picture

13 Mar 2010 - 12:07 pm | शशिकांत ओक

आग्रह करत आहात म्हणून सुचवतो की आपण कोथरूड - डहाणूकर कॉलनी, आठवी गल्ली, वैष्णवी अपार्टमेंट मधील ११ए या ठिकाणी गेलात तर गावातील लोकांना व भाषांतराच्या सोईचे म्हणून सांगता येईल.
सध्या मी इतकेच मार्गदर्शन करू इच्छितो.

नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत

शशिकांत ओक's picture

13 Mar 2010 - 12:13 pm | शशिकांत ओक

अनवधानाने प्रतिक्रियेची पुरावृत्ती झाली. शक्य असेल तर संपादकांकडून खोडली जावी.
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत

नितिन थत्ते's picture

13 Mar 2010 - 12:22 pm | नितिन थत्ते

>>मी आपणांला किंवा कोणाला अमुक केंद्रात जा असे सुचवत नाही. आपणाला सोईचे वाटेल तसे पहावे.
फीज ३०ते ६२५ च्या मधे विविध केंद्रांत आहे.

आयचा घो. हे नवीनच लफडं निघालं. म्हणजे एकट्या पुण्यातच अनेक नाडी केंद्रं आहेत? आणि त्या प्रत्येकाकडे बिपिनभौंची नाडी असणार?

महर्षींनी नाड्या तरी किती लिहिल्यात? (नक्की आमच्या पूर्वजांना मास प्रॉडक्शन माहिती होते. ;) )

नितिन थत्ते

प्रकाश घाटपांडे's picture

13 Mar 2010 - 2:20 pm | प्रकाश घाटपांडे

नवीन कुठय जुनच हाय की. आता तुमीच आस म्हनाव राव?
मिपावरील नवीन वाचकांसाठी
नाडी इतिहास मोठा आहे बरका एक झलक
http://www.misalpav.com/node/9218
http://www.misalpav.com/node/9219
http://www.misalpav.com/node/9231
http://www.misalpav.com/node/3607
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

अनामिक's picture

13 Mar 2010 - 1:37 pm | अनामिक

ह्म्म्म... बिकांचे पहिले दोन प्रश्न सोडले तर उरलेले प्रश्न अजुनही अनुत्तरीतच! मग मागच्याच धाग्यात प्रतिसाद देण्या ऐवजी नवीन धागा का काढला असावा या विचारात....

-अनामिक

विसोबा खेचर's picture

13 Mar 2010 - 3:04 pm | विसोबा खेचर

नाडी उत्सुक मित्र

हे शब्द आवडले ओकसाहेब,

आपला,
(माडी उत्सुक!) तात्या :)

आनंदयात्री's picture

13 Mar 2010 - 3:15 pm | आनंदयात्री

=)) =)) =))