आधीच्या नाडीग्रंथांवरील अदभूत कथनाच्या धाग्यावरील माझा प्रतिसाद इतका खोल गेला की त्या मुळे दुर्लक्ष होऊन मी प्रतिसादाला उत्तर दिले नाही असा संशय येऊ नये. म्हणून येथे नवा धागा टाकत आहे. राग नसावा.
ओकसाहेब, मी आणि मिपावरील अजून एक सदस्या, हे नाडी प्रकरण काय आहे हे पडताळून बघण्यासाठी उत्सुक आहोत. तरी त्यासाठी काय करावे लागेल ते सांगावे. पुण्यात कुठे जावे लागेल? किती खर्च येईल? नाडी बघण्याआधी स्वतःची काय आणि किती वैयक्तिक माहिती द्यावी लागेल? नाडी वाचनाला किती दिवस लागतील? फक्त भूतकाळच सांगितला जातो की भविष्यकाळही सांगितला जाईल? किती तपशीलात जाऊन सांगितले जाईल? नाडीवाचन खरे ठरले नाही तर पैसे परत मिळतील का? कृपया, कळवणे. वाट बघत आहोत.बिपिन आणि अन्य नाडी उत्सुक मित्र हो, आपणाला नाडी केंद्रांचे पत्ते द्यायला मला शक्य आहे पण ते या ठिकाणी दिले तर जाहिरात बाजीचा आरोप होईल असे वाटून मी असे सुचवतो की आपण नाडी ग्रंथ भविष्य पुस्तक वाचावे. नितीन प्रकाशन, अप्पा बळवंत चौक, पुणे. किं ५०. त्यात पुण्याच्या केंद्रांचे पत्ते व अन्य माहिती आहे. आपण पुण्यात आहात तर आपण प्रत्यक्ष जाऊन पाहिले तर बरे. मी आपणांला किंवा कोणाला अमुक केंद्रात जा असे सुचवत नाही. आपणाला सोईचे वाटेल तसे पहावे. फीज ३०ते ६२५ च्या मधे विविध केंद्रांत आहे. ती तशी का वा अन्य आपल्या विचारणा आपण त्यांच्या कडून समजून घेतलेल्या बऱ्या. तमिळजाणकाराला बरोबर न्यावे. म्हणजे नाडी पट्टीतील नावे शोधायला मदत होईल. केंद्राला फोटो काढून देण्यास विनंती करावी. त्याची कॉपी नंतर उपयोगाला येईल.वही देणार का विचारावे. काही कारणांनी ते देत नसतील तर देणाऱ्या केंद्रात जावे. काही कारणानी पट्टी सापडत नसेल तर दुसऱ्या केंद्रात जाऊन सापडेपर्यंत शोध घ्यावा. आपणांस आणखी एक विनंती आहे की नाडी केंद्रात पट्टीचा शोध होण्या आधी महर्षींना प्रार्थना करावी आम्ही आपली परीक्षा घ्यायला आलेलो नाही. आपले आशीर्वाद मिळावेत यासाठी व पुढील आयुष्यासाठी काही मार्गदर्शन मिळावे म्हणून आलो आहे. कृपा करावी. हार व फुले घालता आली व दीप दर्शवता आला तर चांगले. आपला अनुभव कळवावा. आपण केंद्रात असताना प्रत्यक्ष भेटता आले तर आवडेल.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
2355
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपणाला
शेवटी
In reply to आपणाला by बिपिन कार्यकर्ते
आग्रह करात आहात म्हणून...
अनवधानाने पुरावृत्ती झाली.
हे काय नवीनच
नवीन कुठे?
In reply to हे काय नवीनच by नितिन थत्ते
नाडी इतिहास मोठा आहे बरका एक झलक
http://www.misalpav.com/node/9218
http://www.misalpav.com/node/9219
http://www.misalpav.com/node/9231
http://www.misalpav.com/node/3607 प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
ह्म्म्म...
नाडी
माडी उत्सुक!
In reply to नाडी by विसोबा खेचर