<फालतू धागे आणि विडंबने>

लंबूटांग's picture
लंबूटांग in जनातलं, मनातलं
16 Feb 2010 - 10:14 pm

ती - तुला हे २-४ ओळींचे धागे, लोणची/थालिपीठांचे कौल, काथ्याकूट आवडतात?
तो - नाही
ती - अरसिक कुठचा!
तो - मी अरसिक म्हणून तर मिपा आवडते. ;)
ती - चूप्प . एकदम चूप्प!!
तो - तुला कुठे विडंबने आवडतात?
ती - त्यात काय असतं आवडण्यासारखं?
तो - तेच जे तुमच्या २ ओळींच्या धाग्यांत, लोणची/थालिपीठांच्या कौलांत, काथ्याकूटांत असतं
ती - तुझी विडंबने लई खवट आहेत.
तो - असल्या धाग्यांवरूनच तर ती सुचतात. मग ते धागे फालतू की विडंबने ? :P
ती - मी नाही ज्जा!! विडंबनेच का नाही लिहीत?
तो - कारण ती तुझ्या धाग्यांसारखी मनात आले की पाडता येत नाहीत, आणि फार काळ मालक/ संपादकांपासून सुरक्षित राहातही नाहीत. :)
ती - अजून काही? :)
तो - उगाचच्या उगाच बॅण्डविड्थ खात नाहीत, अन कुणाच्या** डोस्क्याला तापही देत नाहीत :).
ती - :) :) :) ...... राजा कोण म्हणतं रे तुला मिपा आवडत नाही? :)

**conditions apply(मालक, संपादक आणि प्रेरणादायी धागेलेखक सोडून)

विडंबनविचारप्रश्नोत्तरेविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रभो's picture

16 Feb 2010 - 10:26 pm | प्रभो

हॅहॅहॅ......
रसमलाई + कढीचा विरजणाचा असर चालू झाला वाटते... :)

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

चिरोटा's picture

16 Feb 2010 - 10:40 pm | चिरोटा

हॅ हॅ हॅ. त्याला आणि तिला कोठेतरी दूरवर जंगलात नेऊन सोडा आता. डोकी फिराया लागलेनी.
भेंडी

खान्देशी's picture

16 Feb 2010 - 11:01 pm | खान्देशी

सहमत!!!!

शुचि's picture

16 Feb 2010 - 11:48 pm | शुचि

पॉइंट हॅज बीन नोटेड फायनली!!!!!!!!!! परत कोणाचं डोकं दुखणार नाही ....... ना बँडविड्थ खाल्ली जाइल.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

लंबूटांग's picture

17 Feb 2010 - 5:49 am | लंबूटांग

ह. घ्या. हे लिहायचेच विसरलो.:)

शुचिताई, भावना दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्व.

शुचि's picture

17 Feb 2010 - 12:06 pm | शुचि

भावना दुखावायचा काही प्रश्नच येत नाही. हे "विडंबन" आहे. 'विडंबन" हा एक साहित्यप्रकार आहे. :)

सो प्लीझ डोंट वरी. :)
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

प्रकाश घाटपांडे's picture

17 Feb 2010 - 9:44 am | प्रकाश घाटपांडे

हॅहॅहॅ
धागे नी विडंबने यकदम हल्की घ्यायची असत्यात ब्वॉ! ती गंमत असतीया. मिपावरील पहिले वर्ष पहा
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Feb 2010 - 10:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हॅ हॅ हॅ ... तू पण का रे लंबू!! फिस्सकन हसायला आलं, नावच वाचून .... बास आता, मी जाते थालीपीठाबरोबर लोणचं खायला!

अदिती

विसोबा खेचर's picture

16 Feb 2010 - 11:05 pm | विसोबा खेचर

आहे हे असं आहे...
....................!

पुढचं बोलत नाही! :)

तात्या.

टारझन's picture

16 Feb 2010 - 11:57 pm | टारझन

सरळ चपल्या घालून आत ये .. जिमीन घाण झाली तरीबी चालंल :)
असं म्हणायचं असावं बहुदा मालकांना =)) =)) =))

असो !! जबर्‍या लिखाण रे लंबुटांगेश :)
इथे प्रतिसादित होण्याआधीच वाचलेला .. णै का ? ;)

- बाटा

चतुरंग's picture

16 Feb 2010 - 11:15 pm | चतुरंग

साक्षात मालक हजर असताना थालीपिठाला नावे ठेवतोस!?
(पुरे)!
(संदर्भ - अशी ही बनवाबनवी - अशोक सराफ आणि सुधीर जोशी)

चतुरंग

Nile's picture

17 Feb 2010 - 4:42 am | Nile

हॅ हॅ हॅ! चला एक प्रकार बंद (अन दुसरा सुरु?) होतोय बहुतेक!