पण शाहरूख खान ने एक चूक केली

देवदत्त's picture
देवदत्त in जनातलं, मनातलं
11 Feb 2010 - 9:22 pm

शाहरूख खानने आय पी एल च्या खेळाडूंच्या लिलावानंतर पाकिस्तानी (म्हणत आहेत त्याप्रमाणे तर सर्वच देशांच्या) खेळाडूंना समर्थन दिले. शिवसेनेने त्याविरोधात दंड थोपटले आणि 'माय नेम इज खान' वर बहिष्कार टाकण्यास सांगितले. शाहरूख खान म्हणतो, " मला भारताबद्दल देशप्रेम आहेच. मी त्याविरोधात काही बोललो नाही." (नेमकी त्याची वाक्ये नाहीत पण आशय तोच).

गेले आठवडाभर हो नाही चालत, पुन्हा 'माय नेम इज खान' चा विरोध समोर आला. काँग्रेस सरकारने दुटप्पीपणा करत लगेच ह्या सिनेमाला सुरक्षा देण्याचे ठरवले. इतर वेळी ' सुरक्षा मागाल तर देऊ' ही भूमिका. शाहरूख खानने काही चर्चा करण्यास नकार दिला. आणि आता सिनेमाच्या प्रिमिअरकरिता थेट दुबईला गेलाय.

सर्व वादात शिवसेना, काँग्रेस, शाहरूख खान ह्यात कोण चूक, कोण बरोबर हे नेमके कोणालाच कळत नाही आहे. पण सध्या तरी शाहरूख खान ने एक चूक केली असे वाटते. त्याने म्हटलेल्या वाक्यावर रण माजले आहे. भले तो बरोबर असेल, पण त्याच्या सिनेमाच्या नावावर इथे सुरक्षेला धोका पोहोचत आहे आणि त्याची पर्वा न करता तो त्याच्या 'चाहत्यांना' अशा स्थितीत टाकून देशाबाहेर जाऊन बसलाय आणि सिनेमाची जाहिरात, प्रदर्शन करत आहे हे मला तरी पटत नाही. तो म्हटला त्याप्रमाणे हे देशप्रेम नाही.

(हेच विचार माझ्या अनुदिनीवरही)

समाजजीवनमानराजकारणचित्रपटप्रकटनबातमीमाध्यमवेध

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

12 Feb 2010 - 12:04 am | विसोबा खेचर

काँग्रेस सरकारने दुटप्पीपणा करत लगेच ह्या सिनेमाला सुरक्षा देण्याचे ठरवले.

एका विदेशी मूळ असणार्‍या स्त्रीचे तळवे चाटणार्‍या काँग्रेसकडून अन्य काय अपेक्षा?

त्याच्या सिनेमाच्या नावावर इथे सुरक्षेला धोका पोहोचत आहे आणि त्याची पर्वा न करता तो त्याच्या 'चाहत्यांना' अशा स्थितीत टाकून देशाबाहेर जाऊन बसलाय आणि सिनेमाची जाहिरात, प्रदर्शन करत आहे हे मला तरी पटत नाही. तो म्हटला त्याप्रमाणे हे देशप्रेम नाही.

शाहरुख भारतप्रेमी कधीही नव्हता. तो किंवा दिलिपकुमार ही मंडळी प्रथमपासून पाकधर्जिणीच आहेत!

तात्या.

शेखर's picture

12 Feb 2010 - 12:05 am | शेखर

शबाना आझमी पण त्याच कॅटॅगरीत आहे...

विसोबा खेचर's picture

12 Feb 2010 - 12:33 am | विसोबा खेचर

शबाना आझमी पण त्याच कॅटॅगरीत आहे...

येस्स!

तात्या.

पाषाणभेद's picture

12 Feb 2010 - 3:21 am | पाषाणभेद

येकदम लंबर एक बोल्ला तात्या . सालं ह्ये पाकप्रेमी हायत तर तथंच जा ना म्हनाव साल्यानो. काहून या देशाचं खाउन र्‍हायलेत. ताटात खायाचं आन तथंच **गायाचं आसलं यांच्यावालं देशप्रेम. उद्याच्याला पद्मपुरस्कार पन द्याल रे काग्रेसांच्या पिलावळींनो. बाझवला तिज्यायला.
आन आता माय नेम इज.. सारखे चित्रपटाचे नावे म्हणजे जातीयतेला खतपानीच नाय काय? माय सरनेम इज... आसलं नाव पायजेल हुत. खान (नाव टाईप कराया बी लय वंगाळ वाटलं पगा. हात दुवून टाकले लगेच.) ह्ये काय नेम नाय त्ये तर सरनेम हाय ना?

आप्ल्या शारूक ला पन नाव बदलून घ्ये म्हनाव. लय वंगाळ नाव वाटतया.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)

शाहरुख's picture

12 Feb 2010 - 11:58 am | शाहरुख

जर शाहरुख खानच्या या बोलण्यावरुन वाद झाला असेल तर मला तरी यात काही गैर वाटले नाही.

काँग्रेस सरकारने दुटप्पीपणा करत लगेच ह्या सिनेमाला सुरक्षा देण्याचे ठरवले.

जर 'अ' व्यक्तिच्या चित्रपटाला नियामक मंडळाचे प्रमाणपत्र मिळाले असताना 'ब' व्यक्तीने "तुझा पिच्चर थेटरात कसा लागतो ते बघतोच मी" म्हटले असता सरकारने काय करणे अपेक्षित आहे ?

बरखा दत्तने घेतलेल्या शाहरुखच्या मुलाखतीचे काही भाग..

My Indianness shouldn't be questioned: SRK

As a movie star, I'm vulnerable: SRK

Nobody is a coward in Bollywood: SRK

~शाहरुख
मी शाहरुख खानचा फॅन नाही

विकास's picture

13 Feb 2010 - 8:54 am | विकास

हे शहारूखचे स्वगत तर नाही? :?

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

पारंबीचा भापू's picture

12 Feb 2010 - 8:57 am | पारंबीचा भापू

अहो मालक,
कोण त्या कॅटेगरीत आहेत याची यादी देण्यापेक्षा कोण नाहींत याची (आखूडतम) यादी देणे सोपे नाहीं का?
भापू

सुधीर काळे's picture

12 Feb 2010 - 9:08 am | सुधीर काळे

पूर्वी एका परिसंवादात शबाना आझमीने बाबरी मशीदीच्या वादात मंदिर उभारण्याच्या बाजूनं मत व्यक्त केलं होतं असं आठवतंय् (चूभूद्याघ्या). तिचे शोहर जावेदही नेहमी पाकिस्तानी धोरणांच्याविरुद्ध जाहीरपणे व ठामपणे बोलण्याची एकही संधी वाया घालवत नाहीत. दिलीपकुमार उर्फ यूसुफमियाँ यांचेही असले वक्तव्य मी ऐकलेले नाहीं.
असे असताना या तीघांवर असा चिखल कां उडवायचा? असे केल्याने चांगल्या देशभक्त असलेल्या या मुस्लिम भारतियांना आपण दुसर्‍या बाजूला नाहीं का ढकलत आहोत? मग ते दुसर्‍या बाजूला कां नाहीं जाऊन मिळणार?
तो, हुज़ूर, ज़रा आहिस्ते कदम!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

शिंगाड्या's picture

12 Feb 2010 - 10:59 am | शिंगाड्या

१००% तात्यांशी सहमत

अप्पा जोगळेकर's picture

28 Mar 2010 - 12:15 pm | अप्पा जोगळेकर

जी व्यक्ती पंधरा वर्षांपेक्षाही जास्त काळ भारतात आहे ती विदेशी कशी असेल?

शाहरुख भारतप्रेमी कधीही नव्हता. तो किंवा दिलिपकुमार ही मंडळी प्रथमपासून पाकधर्जिणीच आहेत!

कोणत्या माणसाला भारतप्रेमी म्हणावे हे एकदा स्पष्ट करावे.

चिरोटा's picture

12 Feb 2010 - 12:25 am | चिरोटा

शबाना आझमी पण त्याच कॅटॅगरीत आहे...

हे लोक काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची री ओढत नाहीत म्हणून त्यांना पाकधार्जिणे म्हणणे अयोग्य वाटते.

सर्व वादात शिवसेना, काँग्रेस, शाहरूख खान ह्यात कोण चूक, कोण बरोबर हे नेमके कोणालाच कळत नाही आहे

सेना आणि मनसे ह्यांतली ही 'देशप्रेमाची'स्पर्धा आहे.आणि काँग्रेस त्यांना झुंजवत आहे.
भेंडी
P = NP

शेखर's picture

12 Feb 2010 - 12:29 am | शेखर

>> हे लोक काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची री ओढत नाहीत

हे जरी खरे असले तरी हे लोक फक्त विशिष्ट विचारसरणीच्या लोकांची री ओढतात हे ही खरे आहे.

योगी९००'s picture

12 Feb 2010 - 12:39 am | योगी९००

शेखरभाऊ एकदम बरोबर उत्तर...

खादाडमाऊ

शिवसेनेच्या अशा वागण्याने या चित्रपटाची फुकट जाहिरात झाली नाहीतर फ्लॉप होणारा चित्रपट होता.( ट्रेलर पाहून असे वाटले).

शाहरूख आणि करण जोहर यांना हेच हवे आहे. फु़कट जगभर जाहीरात. मागे एकदा शाहरूखची अमेरिकेत विमानतळावर security checking झाली होती आणि बर्‍याच पेपर मध्ये पहिल्यापानावर ही बातमी होती. हा सुद्धा या चित्रपटाच्या प्रसिद्धीचाच भाग असावा असे मला वाटते. कारण ह्या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये असाच एक सिन आहे.

शबाना आझमी पण त्याच कॅटॅगरीत आहे...

शबाना, जावेद अख्तर, महेश भट,तिस्ता सेटलवाडयासारखे बरेचसे धर्मनिरपेक्ष(?) लोक आपल्या भारतात आहेत.

खादाडमाऊ

विसोबा खेचर's picture

12 Feb 2010 - 12:41 am | विसोबा खेचर

म्हश्या भट तर साला एक लंबरचा भिकारचोट माणूस आहे.. पोरीला अगदीच वार्‍यावर सोडलनीत. साला हा तात्या काय तिच्याकरता वाईट होता? :)

टारझन's picture

12 Feb 2010 - 1:13 am | टारझन

पोरीला अगदीच वार्‍यावर सोडलनीत.

च्यायला .. अर्ध्या सेकंदासाठी "टार्‍यावर" असं चा वाचलन् उचकी लागली ना =))

बाकी ते बकर्‍याचं बेनं आधीपासूनंच डोक्यात जातं .. हाकलायला हवा त्याच्या आवडत्या देशात .. सुवरूक खान आहे साला ..

विसोबा खेचर's picture

12 Feb 2010 - 9:21 am | विसोबा खेचर

च्यायला .. अर्ध्या सेकंदासाठी "टार्‍यावर" असं चा वाचलन् उचकी लागली ना

=))

विकास's picture

12 Feb 2010 - 9:34 am | विकास

मला शहारूखखान हा दिलीपकुमार, शबानाच्या लाईनीतला वाटत तरी नाही. पण मी यात ज्ञानी आहे असे समजत नाही. ;)

तरी देखील यात (आयपीएल) त्याची नक्की चूक काय झाली याचा विचार करायला हवा...

शिवसेनेने जेंव्हा आधीपण आयपीएल लिलावात खेळाडू घेत होते तेंव्हा त्यांच्या नागरीकत्वावरून ओरड करत होती का? तर नाही. कारण तो त्यांचा (आयपीएलचा) बिझनेस डिसिजन होता. आता त्याच आयपीएल ने बिझनेस डिसिजन म्हणून पाकीस्तानी खेळाडूंना टाळले असताना, निव्वळ ते पाकीस्तानी म्हणून घेयला हवेत असे म्हणणे हे नक्कीच चुकीचे आहे. त्या अर्थाने शहारूखखान चुकलाच.

त्याला तेव्हढ्यापुरता विरोध करून सोडले असते तर काहीच बिघडले नसते. पण आक्रस्ताळे पणा करावा लागत आहे कारण पायाखालची जमीन सरकत आहे. असे वाटते.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सुधीर काळे's picture

12 Feb 2010 - 10:42 am | सुधीर काळे

वाssssव! अगदी खरे!! पूर्णपणे सहमत!!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

देवदत्त's picture

12 Feb 2010 - 12:35 pm | देवदत्त

सहमत :)

कानडाऊ योगेशु's picture

12 Feb 2010 - 11:10 am | कानडाऊ योगेशु

माझ्या मते हा सगळा शिवसेनेचा फंटलाईनवर येण्यासाठीचा खटाटोप आहे.
मराठी माणुसचा मुद्दा इतका शिजत नाही (वा मनसेने हिसकावुन घेतला हे दिसताच ) शिवसेने पुन्हा आपल्या मूळ ट्रंपकार्डकडे वळली आहे.माय नेम इज खान ला विरोध करुन समस्त हिंदुंना पुन्हा आपल्या प्रभावाखाली आणणे (ह्यात परप्रांतीयही आलेच )आणि जर का तसे झाले तर मराठी मुद्द्याला शिवसेना व्यवस्थित फाट्यावर मारेल.

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

विसोबा खेचर's picture

12 Feb 2010 - 11:26 am | विसोबा खेचर

हम्म! सगळंच राजकारण तिच्यायला!

तात्या.

वेताळ's picture

12 Feb 2010 - 11:36 am | वेताळ

शबाना पाक प्रेमी वाटत नाही. त्यापेक्षा दुबई पार्टीत नाचलेले गोंध्या,अनिल कपूर इ. पाकप्रेमी वाटतात.

वेताळ

देवदत्त's picture

12 Feb 2010 - 12:33 pm | देवदत्त

एवढे प्रतिसाद? धन्यवाद

शिवसेनेचा, शाहरूख खान आणि मंडळी, तसेच काँग्रेस सर्वांचाच प्रसिद्धीचा खटाटोप आहे हेच दिसते. शिवसेनेला महत्व मिळतेय ते घेणारच, सिनेमाचा चमू ही फुकटातली प्रसिद्धी घेतोय. आणिकॉंग्रेस ह्याचा फायदा घेतेय.

जर 'अ' व्यक्तिच्या चित्रपटाला नियामक मंडळाचे प्रमाणपत्र मिळाले असताना 'ब' व्यक्तीने "तुझा पिच्चर थेटरात कसा लागतो ते बघतोच मी" म्हटले असता सरकारने काय करणे अपेक्षित आहे ?
हाच प्रकार सरकार सर्व चित्रपटांकरीता का नाही करत? 'झेंडा' आणि 'शिक्षणाच्या आयचा घो' ह्यांना का नाही लगेच सुरक्षा देण्याचे सांगितले? तेव्हा तर मागाल तर सुरक्षा देऊ असे म्हणाले. नितेश राणेने टीव्ही वर उघड धमकी दिली त्याचे काय झाले?

विशाल कुलकर्णी's picture

12 Feb 2010 - 12:51 pm | विशाल कुलकर्णी

हाच प्रकार सरकार सर्व चित्रपटांकरीता का नाही करत? 'झेंडा' आणि 'शिक्षणाच्या आयचा घो' ह्यांना का नाही लगेच सुरक्षा देण्याचे सांगितले? तेव्हा तर मागाल तर सुरक्षा देऊ असे म्हणाले. नितेश राणेने टीव्ही वर उघड धमकी दिली त्याचे काय झाले?>>>>

देवदत्तभौ अहो 'झेंडा' किंवा 'शिक्षणाच्या......' बाबतीत कुठेही तथाकथीत अल्पसंख्यांकांवर अन्याय होत नाहीये. मग सरकार कशाला त्यांना सुरक्षा पुरवेल. एक लक्षात घ्या हे जे काही चाललेय ते शाहरुखची बाजु घेणे किंवा पाकची बाजु घेणे किंवा केवळ शिवसेनेला विरोध करणे यासाठी नसुन यातुन मिळणारी / वाढणारी अल्पसंख्यांकाची मते लाटण्यासाठी आहे.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

देवदत्त's picture

12 Feb 2010 - 1:08 pm | देवदत्त

ते दिसतेय हो. मी फक्त वरील प्रश्नावर उत्तर लिहिले. :)

अनामिका's picture

12 Feb 2010 - 7:29 pm | अनामिका

'झेंडा' किंवा 'शिक्षणाच्या......' बाबतीत कुठेही तथाकथीत अल्पसंख्यांकांवर अन्याय होत नाहीये. मग सरकार कशाला त्यांना सुरक्षा पुरवेल. एक लक्षात घ्या हे जे काही चाललेय ते शाहरुखची बाजु घेणे किंवा पाकची बाजु घेणे किंवा केवळ शिवसेनेला विरोध करणे यासाठी नसुन यातुन मिळणारी / वाढणारी अल्पसंख्यांकाची मते लाटण्यासाठी आहे.

एकदम चोक्कस.........१६ आणे खरा बोल्लला विशाल भाय!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

वाहीदा's picture

13 Feb 2010 - 11:05 am | वाहीदा

एवी वात करेच जारू शिवसेना , बिजेपी अने घणा बधा so called Political Parties मत मिळावा मागे काय करेश नये ?? वा रे वा :-(
केटलू झूठ्ठू बोलेछ !!बाप्पा रे बाप्पा !! :-(

Political Parties, मत मिळावा माटे काय पण करेछ ! केटलू पण निचू जायेच .. एमनू लेवले छेच नई .. सावी गंधगी छे बद्धी . गंदू करी नाखयो अवे बद्धू atmosphere :-(
~ वाहीदा

एकलव्य's picture

12 Feb 2010 - 6:11 pm | एकलव्य

ठाकरेंना भेटायला गेला तर ती शाहरूखची चूक असेल (जी पवारांनीही नुकतीच केली) पाकिस्तानी खेळाडूंना घ्यायला हवे की नको यावर -- मला पटणारे असो वा नसो -- मत मांडणे म्हणजे देशद्रोह असे बिलकुल नाही.

शाहरूखच्या निमित्त्याने "खानां"वर हल्लाबोल करण्याचा सेनेचा आक्रस्ताळेपणा दिसतो. अर्थात अशोक चव्हाण आणि आबा यांनी संरक्षण काढून घेणे हा त्यापलिकडील मूर्खपणा आणि देशद्रोह. पण सदर प्रकरणात शाहरूखला अजून तरी आम्ही दोष देणार नाही.

शाहरूखचे चित्रपट न आवडणारा - एकलव्य

त्याच्या टिम् मधे त्याने का घेतले नाहि पाक खेलाडू
लोका सांगे ब्रम्ह..
स्वतः बकरी ध्यान

अप्पा जोगळेकर's picture

28 Mar 2010 - 12:21 pm | अप्पा जोगळेकर

देशप्रेमाचं आंदण शिवसेनेला कोणी दिलं आणि कधी दिलं ? बाकी शिवसेनेची फाटली आहे यात वाद नाही,

II विकास II's picture

28 Mar 2010 - 12:27 pm | II विकास II

>>देशप्रेमाचं आंदण शिवसेनेला कोणी दिलं आणि कधी दिलं ?
देशप्रेमाचे असे आंदण मिळते का? कोणी देते का? कृपया तुम्हाला माहीती असेल तर येथे द्यावी.
मला वाटते कि देशात राहणार्‍या(नागरीक असलेल्या) प्रत्येकाला ते नागरीक होताच(म्हणजे बहुतेक लोकांना जन्मतः) मिळते.
प्रत्येकांने आपल्या परीने देशासाठी काम करत राहावे.
असो.

--
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

चिरोटा's picture

28 Mar 2010 - 1:13 pm | चिरोटा

बाकी शिवसेनेची फाटली आहे यात वाद नाही,

www.saamna.com पहा."ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे' ते दैनिक राहिलेले नसून "मराठी माणसाचे स्वतःचे वृत्तपत्र" झाले आहे. धर्म कुठलाही असो मराठी माणसाला आता तेजीचे दिवस येणार हे नक्की.!
भेंडी
P = NP

अप्पा जोगळेकर's picture

28 Mar 2010 - 1:26 pm | अप्पा जोगळेकर

"ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे' ते दैनिक राहिलेले नसून "मराठी माणसाचे स्वतःचे वृत्तपत्र" झाले आहे.

याची नोंद आधीच घेतली आहे. मी सामनाचा नियमित वाचक आहे. तरी धन्यवाद सगळ्यांना माहीत होईल.

अप्पा जोगळेकर's picture

28 Mar 2010 - 12:55 pm | अप्पा जोगळेकर

देशप्रेमाचे असे आंदण मिळते का? कोणी देते का?

असं आंदण कोणी देत नाही तरीदेखील शिवसेना तसं ते मिळालं असल्याच्या थाटात वावरत असते. हीच तर तक्रार आहे. मी माझ्या याआधीच्या प्रतिसादाखाली Circastic remark असं लिहायला हवं होतं का ?

II विकास II's picture

28 Mar 2010 - 1:02 pm | II विकास II

काही लोकांचे देशप्रेम जहाल असते तर काही लोकांचे मवाळ
असो.
--
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.