कॉलेज कट्टा भाग-२

मराठमोळा's picture
मराठमोळा in जनातलं, मनातलं
8 Jan 2010 - 6:46 am

-------भाग १----------

>>आज माझा वाढदिवस आहे, चला पार्टीला. हॉटेल सह्याद्री मधे." - एक सिनियर साहेब म्हणाले.
हॉटेल सह्याद्री म्हणजे अट्टल बेवड्यांचा अड्डा. नको नको म्हणत आम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार झालो

जावं तर लागणारचं. पण का? कसं ? काही प्रश्नांची उत्तरं नसतात ना?
बघु तरी काय असतो एंजॉय?
आज तुषार वेगळाच होता ना? का तो नेहमी असाच होता आणी मला माहित नव्हतं? चमचम लाईट्स हाहा हिहि हुहु करणारे लोकं आणी आम्ही. मनात भिती दडपण आणी किळस,,,,,,? नक्कि? काही कळत नाहिये आज. पण असं वाटतय कि आपण मोठे झालोय ना? प्रश्नांचा भडिमार.. काय करावं? काहीच सम्जत नाहिये,
तेवढ्यात तुषार आला आणी म्हणाला की काही टेंशन घेऊ नका मित्रांनो.... मजा करा,,,, हातात दारुचा ग्लास घेऊन तो निघुन गेला. मला वाटलं की ह्या गोष्टीमधे काहीतरी मजा असणार, आज करुयात का ट्राय? मी परत तुषारला गाठलं आणी म्हणालो "मजा येते का रे दारु पिउन?"

त्याने त्याचा ग्लास माझ्या हातात दिला आणी म्हणाला "जमी तो तेरी बनी नही तो अब्दुल गनी"

वा काय काँफिडंस होता ना त्याच्या डोळ्यात... आता अब्दुल गनी कोन बनणार? ग्लास तोंडाला लावला आणी संपवला.. उलटी करावीशी वाटली.. पण आज अब्दुल गनी नाही व्हयचं म्हणुन कसंबसं गिळलं, १५ मिनिटे गेली... आता खरचं मजा वाटत होती. चायला.. दुनिया गेली भोस..त.

सकाळ झाली............दुपारी.....
"चायला शेखर्‍या सॉलिड स्टॅमिना आहे रे तुझा"... मी तुषार कडे पहात होतो..
पुन्हा सकाळ झाली.... संध्याकाळी.... " अरे काहीतरी खा आता.. मरशील. बरं त्या वेटरला मारुन नाही टाकलास.. सिनिअर साहेब म्हणाले. टेंशन घेउ नको..
समोरची खिडकी नविन होती. मी बालाच्या (सगळ्यात सिनिअर) रूमवर होतो. तुषार ने काहीतरी खायला आणले होते.. खाउन पुन्हा सकाळ झाली... दुसर्‍या दिवशी सकाळी. आयुष्यातला एक दिवस हरवला होता कुठेतरी. आईची खुपच आठवण आली ना आज?

"चल रे आज पार्टी करू" तुषार म्हणाला. मी सरळ नकार दिला.
"ऐश करने का टेंशन नही लेने का बॉस" सचिन म्हणाला.. मी चक्रावलो. हे काय होतय माझ्याबरोबर.. आणी का? पण वाघाच्या तोंडाला रक्ताची चटक लागलीच होती ना...

सेफ साईड म्हणुन मी रुपेश ला फोन लावला.. पण तो पणं घरी काहीतरी कारण सांगुन लगेच रूमवर हजर..
वैभव देवपुजा करत होता.. "अरे असं करु नका अजुन आपलं वयं नाही ह्या सगळ्याचं" म्हणत दुसर्‍या बेडरुम मधे निघुन गेला.
"माद**द.. आभाळातुन टपकला आहे का रे हा? भे*द.. बघाव तेव्हा बाबाग्यान" : रुपेश.

२ क्वार्टर आल्या.. दारुचा हिशिब समजायला सुरुवात झाली. काचेचे ग्लास आले. सिगारेट पण आली हळु हळु..
रात्री रुमच्या बाहेर फिरायची डेरिंग पण आली.. एकदुसर्‍याला (सिनिअरला सुद्धा) शिव्यांशिवाय हाक मारताच येत नव्हती आजकाल. पैसे कसे मॅनेज करायचे ते पण शिकवले बालाने. सगळे बारवाले साहेब म्हणायचे.. मजा वाटत होती. लेक्चर काय असतं ते तर कधीच विसरलो होतो.

एक-दोन महिन्यात असं काय बदललं होतं? आणी का? काहीतरी चुकतय. आई वडील कष्ट करुन पैसे पाठवतात. त्याच चीज करायला नको?
"अरे कोणी सांगितलं? की हे सगळं करुन तु त्यांना सुख देशील? आणी नाही दिलं तरी बिघड्ल काय? तु सांगितल होत का तुला जन्माल घालायला? मग? सोड रे चु**गिरि. ऐश कर.." बाला किती सरळ बोलायचा ना? त्याचे फंडे एकदम साफ होते. मला पटायला लागले होते. (का कुणास ठाऊक)

एक दिवस पुन्हा वेगळाच आला आज....

आवडल्यास क्रमश: अथवा भ्रमशः

आपला मराठमोळा

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

अमृतांजन's picture

8 Jan 2010 - 7:16 am | अमृतांजन

"काय करु नये" हे सांगण्यापेक्षा "का करु नये" हे सांगणे का महत्वाचे असते हे अशा वर्तनबदला वरुन कळते.

माणसाची सैतानिक छटा संस्कारांच्या माध्यमातून दाबली जाते- ती उसळी मारत असते- प्रशिक्षित मनच त्या उसळीला काबूत ठेवू शकते. - त्यावेळेस मनाला "का" चे उत्तर द्यायला लागते. ते त्याला पटतेही पण वळत नसते- त्यासाठी मनोनिग्रहा ची गरज असते- मनोनिग्रह ध्येयातून येतो- त्यासाठी आयुष्यात आपल्याला काय घडवायचे आहे त्या ध्येयांना ठरवावे लागते.

(तरीही सैतानिक छटा कायमची उसळी मारणे थांबवणे कोणालाही शक्य होत असेल असे वाटत नाही). मग त्यातून जे हाती लागतं त्याला भोग म्हणतात- कारण जे हाती लागतं त्याचा परिणाम परिस्थितीनुसार बदलतो.

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Jan 2010 - 10:25 am | बिपिन कार्यकर्ते

पर्फेक्ट चाललंय... अपेक्षाभंग अजिबात झाला नाही... पुढचे भाग पटापट येऊ द्या. उशिर नको.

बिपिन कार्यकर्ते

विजुभाऊ's picture

8 Jan 2010 - 10:35 am | विजुभाऊ

बहुतेक भ्रमशः

स्वाती२'s picture

8 Jan 2010 - 3:31 pm | स्वाती२

आवडले. पुढला भाग टाका लवकर.

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jan 2010 - 4:44 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या मराठमोळ्याला धरुन मारा. कधितरी उगवतो, चार ओळी खरडतो आणी परत अंतर्धान पावतो.

कुठे फेडशील मेल्या हि पाप ?? 'अपाचे' मध्ये का ??

बाकी लिखाण उत्तम. पुलेशु !

©º°¨¨°º© चोळामोळा ©º°¨¨°º©
आमचे राज्य