(पुरावा)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
17 Dec 2009 - 5:06 pm

जयवीताईंची सुंदर कविता दुरावा हीच आमच्या पुराव्यामागील प्रेरणा! ;)

"देतोस ना उजाळा
त्या कुंद कापडांना?
होतोस काय अडवा
ओढून चादरींना?"

अवरुन घे दुपारी
तो ढीग ताटल्यांचा
ती खूपशी तपेली,
किटली न कपबशांचा

"फक्कड चहासवे दे
सांजा करून भरभर!"
उच्चारवात होती
मज सूचना निरंतर

"देईन 'चंद्र अर्धा'
लग्नात जोडलेला
त्या गोधडीत अजूनी
तू मुक्त सांडलेला?"

"आहे तसा शहाणा!"
अर्धांग बोलले? वा!
संपूर्ण काम झाले
"रंग्यास" रे पुरावा!!

चतुरंग

हास्यकविताविडंबन

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

17 Dec 2009 - 5:21 pm | श्रावण मोडक

हे चतुरंगांचे बोल आहेत की रेवतीताईंचे? बाकी बोल उत्तमच. प्रश्नच नाही.

धमाल मुलगा's picture

17 Dec 2009 - 5:27 pm | धमाल मुलगा

अगदी अगदी! ;)

"देईन 'चंद्र अर्धा'
लग्नात जोडलेला
त्या गोधडीत अजूनी
तू मुक्त सांडलेला?"

"आहे तसा शहाणा!"
अर्धांग बोलले? वा!
संपूर्ण काम झाले
"रंग्यास" रे पुरावा!!

व्वा! व्व्वा व्व्व्वा!!!
वाचुनच काळजात कळ उठली! शेवटी काय, तर घरोघरी एल.पी.जी.!

अवलिया's picture

17 Dec 2009 - 5:35 pm | अवलिया

श्री रा रा चतुरंगजीसाहेब

विडंबन चांगले झाले आहे असे म्हणण्यास वाव आहे.

धन्यवाद !

--अवलिया

पर्नल नेने मराठे's picture

17 Dec 2009 - 5:39 pm | पर्नल नेने मराठे

=))
चुचु

आकडा's picture

17 Dec 2009 - 10:09 pm | आकडा

हाहाहा, चतुरंग विडंबन तुमच्या कीर्तीला जागणारं, मस्तच!

मस्त कलंदर ताई लग्नाळू मुलांना भांडी घासण्याचं ट्रेनिंग देत होत्या, त्याचं पुढे काय झालं?

विशाल कुलकर्णी's picture

18 Dec 2009 - 1:52 pm | विशाल कुलकर्णी

=)) =)) =)) =)) =)) <:P

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

jaypal's picture

18 Dec 2009 - 2:17 pm | jaypal

खो खो खो , गडाबडा लोळण , वळली मुरकुंडी ,

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

विनायक प्रभू's picture

19 Dec 2009 - 12:10 pm | विनायक प्रभू

आयला उच्चारवात मंजे काय हो?