कधीतरी

नेहमी आनंदी's picture
नेहमी आनंदी in जे न देखे रवी...
9 Dec 2009 - 12:38 pm

कधीतरी बेधुंद होऊन बघायचयं
कधीतरी बेहोश होऊन बघायचयं
बेधुंद बेहोशीत जगणा~यांना अनुभवायचयं

कधीतरी पंख पसरुन उडायचयं
कधीतरी अंग आक्रसुन पोहायचयं
स्वच्छंद राहुन गुलामी अनुभवायचीयं

कधीतरी गर्दित हरवायचयं
कधीतरी एकांतात स्वतःला शोधायचयं
हरवताना स्वतःलाच सापडायचयं

कधीतरी जगुन बघायचयं
कधीतरी थराराला सामोरं जायचयं
मरताना तुझ्या डोळ्यातले माझ्यावर असलेले प्रेम बघायचयं

प्रसन्ना जीके.

कविता

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

9 Dec 2009 - 1:15 pm | विजुभाऊ

स्वच्छंद राहुन गुलामी अनुभवायचीयं

हे म्हणजे " डबक्यात पोहोताना त्सुनामी अनुभवायचीय " म्हणण्यासारखे आहे .
कविता भावस्पर्षी आहे परंतु शब्दांच्या अनाकलनीय रचनाक्रमामुळे जो हवा तो भाव पोहोचायचा तेथे पोहोचत नाहिय्ये.
कविता लिहिण्या मागे भाव असावाच असा आग्रह नाही. पण जर भावनाविहीन कविता लिहायच्या असतील तर अर्वाचीन मराठीत " माथा शेदूर पाझरे वरीवरे... किंवा "म्हातारी उडली तळ्यात पडली प्रत्यक्ष मी पाहिली " या शार्दुलविक्रीडीत वृत्तातल्या कवितां लिहिल्या गेलेल्या आहेत.
काव्य लिहीताना गेयता आणि सार्थता यांचा तोल राखणे मोठे कठीण असते.
प्रस्तुत कविता ही हिंदी गेय काव्य "मै एक डिस्को तु एक डिस्को दुनिया है एक डिस्को" या आर्या वृत्ततले अर्थवाही काव्याशी जवळीक दाखवते. असे कोणालाही वाटू शकते.

पर्नल नेने मराठे's picture

9 Dec 2009 - 1:22 pm | पर्नल नेने मराठे

कधीतरी बेधुंद होऊन बघायचयं
कधीतरी बेहोश होऊन बघायचयं
बेधुंद बेहोशीत जगणा~यांना अनुभवायचयं

मला पण वाटयेत असे जगुन पहावे.....पण कधी? :(
चुचु

मदनबाण's picture

9 Dec 2009 - 10:38 pm | मदनबाण

छान. एक वेगळीच कविता...
बाकी ही कविता वाचुन का कोणास ठावुक पण जावेद अख्तर यांचे हे शब्द आठवले :--
Zidagi Hai To Khwab Hain,
Khwab Hai To Manzilain Hain,

Manzilain Hai To Faasle Hain,
Faasle Hai To Raaste Hain,

Raaste Hai To Mushkilain Hain,
Mushkilain Hain To Hausla Hain,

Hausla Hai To Vishwas Hai,

Kyonki Fighter Hamesha Jeet-ta Hai.

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia