धर्मक्षेत्रे भिक्षाक्षेत्रे........ ३

प्रशु's picture
प्रशु in काथ्याकूट
24 Nov 2009 - 5:05 pm
गाभा: 

श्री क्षेत्र पंढरपुर...

दुपारी चारच्या आसपास पंढरपुरत पोहोचलो. सुरुवातीलाच चंद्रभागेचे अतिशय मनोहर दर्शन झाले. चंद्रभागेत हात पाय धूऊन थेट देवळात गेलो. देवाचा पोषाख चालु होता. त्यामुळे दर्शन बंद होत. आजुन दोन तास तरी लागणार होते. त्यामुळे मुख दर्शन घेण्याचे ठरले. जवळ्च्या ब्यागा, भ्रमण ध्वनी आणी डीजी क्यम ठेवण्याची चांगली सोय होती तिकडे. देऊळ अतिशय सुंदर पण येथे पण नामदेव पायरी वर प्ल्यास्टीक चा मोठा पडदा लाऊन सगळी पास रयाच घालवली होती.

मुख दर्शनासाठी पांडुरंगाच्या समोर ऊभा राहिलो आणि समजले कि का गेली ७ शतके माणसं ईत्की वेडी होऊन ह्या सावळ्या च्या भेटी साठी वेडी होतात. त्यावेळी जे काहि वाटलं ते शब्द्दात मांडणं माझ्या साठी तरी अशक्य आहे. हार पुजार्यांच्या हातात दिला आणी पाडुंरंगाच्या चरणी वाहण्याची विनंती केली. हार हातात घेऊन ते बडवे तसेस आमच्या पुढे हात पसरत ऊभे राहिले, अभिषेक करायचाय का काहि? पुजा सांगायची आहे का? विचारत....

रुक्मिणीच्या दर्शनानंतर पुंडलीकाच्या दर्शना साठी पुन्हा चंद्रभागेच्या पात्रात आलो. पुंडलीकाचे देऊळ ते किती छोटे, पण तिथे ५ पुजारी ठाण मांडून बसले होते, प्रवेशाला दोन, पुंडलीकाकडे एक आणी बाहेर पडण्याच्या दारावर दोन. पुन्हा तसेच लाचारीने हाथ पसरणे... सगळ्याचा अक्षरक्षः वीट आला. सगळी कडे असेच का? तोच लोचट पणा, तीच लाचारी, तोच ग्ल्लीच्छपणा, सुंदर देवळांचे केलेले विद्रुपी करण. देव कसा रहात असेल या ठीकाणी? पवित्र वास्तु म्हनुन या सर्व ठीकाणी जे काय चालले आहे त्यामुळे त्यांचे पावित्र्य खरेच राखले जात आहे का? आपल्या धर्माला शिस्त लागणार तरी कधी? हा बाजार थांबणर आहे का? गोर गरीबांची देवाच्या नावावर होणारी फसवणुक अजुन किती दिवस चालु रहाणार? मुळ्च्या मालकालाच विक्रीला लाऊन मालक बनलेले सेवेकर्याना कधी स्वतःची खरी पायरी समजणार?

खिन्न मनाने बस थांब्या कडे निघालो आणि एक आठवण झाली. शेगावच्या गजानन महाराजांच्या चरित्रात पंढरपुरात एक प्रसंग आहे ज्यात त्यांनी वारकर्याला विठ्ठ्ल दर्शन घडवले होते आणी म्हनुण पंढरपुरात गजानन महाराजांचा मठ बांधला आहे. त्या मठाबद्द्ल विचारपुस केली असता, अगदी जवळ्च असल्याचे समजले आणी पाऊले आपोआप तिकडे वळली.
मुख्यद्वारा जवळ गेलो आणी थक्क झालो.

अप्रतिम प्रवेशद्वार, सुंदर परिसर, मोठा भक्त निवास, निशुल्क सेवा, आणि मुख्य म्हणजे सेवा व्रुत्तीने काम करणारे विनम्र सेवेकरी. मन प्रसन्न झाले. मनातल्या सगळ्या प्रश्नांची ऊत्तरे मिळाली....

महाराजांच्या चरणी मस्तक टेकऊन शांत मनाने परतीच्या प्रवासाला लागलो...

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

24 Nov 2009 - 5:25 pm | मदनबाण

अजुन पंढरपुराला जाण्याचा योग आला नाही... एकदा तरी जायला मिळावी ही इच्छा.
पंढरपुरात गजानन महाराजांचा मठ बांधला आहे.
प्रतिम प्रवेशद्वार, सुंदर परिसर, मोठा भक्त निवास, निशुल्क सेवा, आणि मुख्य म्हणजे सेवा व्रुत्तीने काम करणारे विनम्र सेवेकरी

व्वा,म्हणजे शेगाव प्रमाणेच सर्व आहे वाटतं... :)

मदनबाण.....

"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo

झकासराव's picture

24 Nov 2009 - 5:28 pm | झकासराव

मनातल्या सगळ्या प्रश्नांची ऊत्तरे मिळाली...>>>>>>>
हम्म.
तिथल्या ध्यान मंदीरात थोडस डोळे मिटुन बसल की मन कस अगदि प्रसन्न प्रसन्न होत ना. :)

स्वानन्द's picture

25 Nov 2009 - 2:39 pm | स्वानन्द

गजानन महारा़ज देवस्थान ट्र्स्ट ने खरच या बाबतीत एक आदर्श निर्माण केला आहे.
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!