गोष्ट

अरभाट आणि चिल्लर's picture
अरभाट आणि चिल्लर in जनातलं, मनातलं
12 Nov 2009 - 2:02 am

आपल्याला प्रत्येकाला लहानपणी २ गोष्टी सान्गितल्या होत्या. त्यातली एक छोटी आणि दुसरी न सम्पणारी. छोटी गोष्ट म्हणजे एक होत गाव, त्या गावात होत एक पोस्ट, सम्पली आमची गोष्ट. दुसरी न सम्पणारी गोष्ट म्हणजे एक धान्याच कोठार होत, तिथे एक चिमणी आली, एक दाणा घेतला आणि उडून गेली. दुसरी चिमणी आली एक दाणा घेतला आणि उडून गेली. तिसरी चिमणी आली.........

या गोष्टीचा आपल्याला लहानपणी खूप राग यायचा पण आता अस नाही का वाटत की आयुष्यात बर्‍याच गोष्टी रिपीट होत असतात, मग ते रोजच जीवन असो, पिक्चर असो किन्वा इतर काही. माझ्या मनात आता ही न सम्पणारी गोष्ट आणि त्याच्या अनुषन्गाने काही विचार आले.

१) चिमण्या समोर धान्याच भरलेल कोठार असताना ही फक्त एकच दाणा घेउन जात होत्या. माणसाने त्यान्च्याकडुन हा शिकण्यासारखा गुण आहे.
२) कथा लेखकाला त्या सर्व चिमण्याच आहेत हे कस कळल? त्यात एकही चिमणा कसा नव्हता? का साधारणपणे पुरुष (इथे चिमणा) फुकटच्या वस्तुमागे धावत नाहीत. का ही गोष्ट एका लेखकाने लिहिली असल्याने त्याला हा पुरुषान्चा गुण दाखवायचा होता?
३) काही लोक उडत्या पाखराची पिसे मोजतात, काही त्यापुढे जाऊन आणखी काही मोजतात. (आणि हे मोजुन काय साधतात कोण जाणे) तर हा आपला कथालेखक ह्या लोकापेकी असावा काय? त्याला उडत्या चिमण्यान्च लिन्ग कळत होत काय?

ह्यातला थोडा गमतीचा भाग सोडला तर आपण नेहमी बोलताना बहुसन्ख्य पक्षी, प्राणी, कीटक यान्चा उल्लेख एकाच लिन्गाने करतो. उदा. तो बघ मासा, कावळा आला, पाल भिन्तीवर सरपटतेय वगेरे. आणि मला आजपर्यन्त तरी पाण्यात पोहणारा मासा असतो त्याच्या बायकोला (किन्वा पार्टनरला) काय म्हणायच ते माहीत नाही. उलटपक्षी आपल्या घरात उडणार्‍या माशीच्या नवर्‍याला काय म्हणतात? अशी अनेक उदाहरणे तुम्हाला पण माहीत असतील.

हे ठिकाणविचार

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

12 Nov 2009 - 6:43 am | पाषाणभेद

लय भारी
जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

अमोल नागपूरकर's picture

12 Nov 2009 - 3:53 pm | अमोल नागपूरकर

सशाचे स्त्री लिंग काय आहे?