शनिवारचं उत्तर: प्रतिसाद

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जे न देखे रवी...
8 Nov 2009 - 2:13 pm

पुण्याच्या पेशव्यांचं बुधवारचं सदर पाहून आमची मळमळ अंमळ वाढत जाते. ना इनोचा इलाज चालला ना आलेपाचकाचा! मग ही मळमळ आम्ही अशा प्रकारे बाहेर काढली. प्रेरणा अशीच एक कविता(?) आमचे मित्रवर्य खोबारसेठ यांना समर्पित केलेली.

शोधतोय
मी माझ्या
एका फेवरीट कल्पनेला

इथेच
या मिपावर
साक्षात्कार झाला मला

रोज
या बोर्डावर
प्रतिसाद व्यनीतून कळवायची

प्रशंसा
स्वतःचीच अन
मज्जा मज्जा यायची

अचानक
एके दिवशी
प्रतिसाद ओघ आटला

आता
वाचने शेकडो
पण प्रतिसाद थांबला

क्वचित
नाममात्र उत्तर
वाचकांचा थंडपणा टोचला

अशात
आठवण झाली
'जाणत्यां'च्या कल्पनेची

आणि
प्रतिसादांचा
बोळा निघण्याची

लिहीला
भावनाभरताड
प्रतिसाद एकच मात्र

मोद
जाहला
कल्पना ठरे सक्सेससूत्र

असे का
हाकारता
लिहा लांब ओळी

इमोसनल
अत्याचाराची
नाहीतर बसेल गोळी

*हे विडंबन, कविता जे काही हे आहे, ते आमचे मित्रवर्य, अंहनं, पेशवे आणि नाईलशेठ यांना समर्पित!

हास्यकरुणविडंबन

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

8 Nov 2009 - 2:16 pm | विनायक प्रभू

आहे ते आवडले.

विसोबा खेचर's picture

8 Nov 2009 - 2:19 pm | विसोबा खेचर

छ्या! मिपावर अतिप्रतिभावान, अतिबुद्धीवान लोकंच फार आहेत बॉ! :)

ही अदिती त्यातलीच! :)

चालू द्या...

तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Nov 2009 - 2:23 pm | llपुण्याचे पेशवेll

वरील प्रतिसाद आमच्यासारख्या मंदबुद्धी लोकाना कळणे केवळ अशक्य झाले आहे. कोणी या प्रतिसादाचे विडंबन करुन तो आम्हाल कळेल अशा भाषेत सांगेल का?
डिसकेलमरः हा प्रतिसाद कोणाचाही अपमान करणेसाठी लिहीणेत आलेला नाही.

अवांतरः
अदिती,
जियो.
अवांतराचे डिस्क्लेमरः जियो हा शब्द आम्ही मालकांच्या जमादारखान्यातून उधार घेतला आहे.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

नंदन's picture

8 Nov 2009 - 2:29 pm | नंदन

विडंबनासाठी विडंबन केल्यासारखे वाटले :)
बाकी भावनाभरताड, सक्सेससूत्र इ. प्रासात्मक शब्द खासच.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

श्रावण मोडक's picture

8 Nov 2009 - 6:36 pm | श्रावण मोडक

+

Nile's picture

8 Nov 2009 - 2:39 pm | Nile

अहो काय हे, आता आम्हाला आमच्या कल्पनेबद्द्ल, ही आमची कल्पना, हिच्यावर आमचा भारी जीव असं जाहीरपणे म्हणावं लागणार! ;)

'कल्पने'त-रम्य ;)

कवितेतल 'सार' आवडलं! ;)
संक्षिप्त,वाचक. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Nov 2009 - 2:46 pm | बिपिन कार्यकर्ते

भावनेचा (ही आमची भावना! हिच्यावर आमचा लैच जीव!!) भर ओसरला की प्रतिसाद देईन म्हणतो. अंमळ गदगदून गेलो आहे. आधीच मला समर्पित केलेली कविता आणि त्यावर त्या कवितेचे विडंबन!!! मंडळी मी कृतकृत्य आहे.

बिपिन कार्यकर्ते

विनायक प्रभू's picture

8 Nov 2009 - 2:48 pm | विनायक प्रभू

असे गदगदुन आल्यावर.

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Nov 2009 - 3:20 pm | बिपिन कार्यकर्ते

लवकरात लवकर मोकळा होतो.

बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश's picture

8 Nov 2009 - 3:28 pm | ऋषिकेश

हा हा हा!
छान
मात्र सक्सेससूत्र हा शब्द वाचताना आधी जरा अडखळलो, मग चकित झालो, मग नीट वाचला आणि मग शांत होऊन पुढचं कडवं वाचलं ;)

ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Nov 2009 - 4:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>सक्सेससूत्र हा शब्द वाचताना आधी जरा अडखळलो,
आम्हीही अडखळलो. वेगळ्याच शब्दाचा भास झालेला तो शब्द नाहीच असे खात्री पटल्यावर पुढीळ कडवी शांतपणे वाचली. सुंदर कविता..

-दिलीप बिरुटे

छोटा डॉन's picture

8 Nov 2009 - 4:20 pm | छोटा डॉन

जोरदार विडंबन रा.को.
तुमच्या आणि पेशव्यांच्या जुगलबंदीची मजा येते आहे ....

चालु द्यात.

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

निखिल देशपांडे's picture

9 Nov 2009 - 12:43 pm | निखिल देशपांडे

जोरदार विडंबन अदिती
चालु द्या....

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

सादर केलेला नवा डेटा बघितल्यावर सगळं कसं सूर्यप्रकाशात दिसावं असं स्वच्छ दिसू लागलंय! तू तुझ्या डेटा सफाईकरणाच्या कामात अगदी प्रवीण आहेस तर. ;)
(वाचक अडखळावेत अशी जाणीवपूर्वक शब्दरचना करण्याचे कौशल्य वादातीत ;) )

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Nov 2009 - 1:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्यावर भलसलते आरोप करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या ऋषिकेश, प्रा.डॉ आणि चतुरंग यांचा निषेध! ;-)

बाकी मी जन्मजात आगाऊ आणि खाष्ट असल्यामुळे प्रतिसाद देणार्‍यांचे आणि वाचकांचे आभार मानत नाही.

अदिती

सूहास's picture

9 Nov 2009 - 2:53 pm | सूहास (not verified)

चालायचच...

काही जित्यांची खोड मेल्याशिवात जाणार नाही ...

बाकी अदितीला +१

सू हा स...

परिकथेतील राजकुमार's picture

9 Nov 2009 - 7:32 pm | परिकथेतील राजकुमार

वा वा वा !

चांगलाच शब्दफुफाटा चालु आहे की.

३_१४ संक्षीप्त उदबत्ती
आमचे राज्य