बायको बरोबर भाजीला गेलो, पिशवी तिच्या हातात होती
खरेदीला घेतलेल्या पैशाची, माझ्या खांद्यावर जड पोती
आलं, कडीपत्ता, भाजीवाल्यानं सहज पिशवीत सारला
दोन किलो वांगी दे म्हटल्यावर, पॅन नंबर विचारला
तो म्हणाला, शंभर रुपयाच्या भाजीवर, फुकटच आहे कडीपत्ता
पण आयकर विभागाला कळवावा लागतो तुमचं नाव आणि पत्ता.
कडधान्याच्या दुकानात बॅंकांचे प्रतिनिधी वाटत होते अर्ज
तूरडाळ खरेदीसाठी सवलतीच्या दरात मिळत होते कर्ज
डाळीचा मग नाद सोडला, चिकन आणलं भाराभर
त्यादिवशी मला पटलं, `घर की मुर्गी दाल बराबर'
दाल मे कुछ काला है, मोठा कठीण आलाय काळ
महागाईसमोर कुणाचीच शिजेनाशी झालीय डाळ
आमच्या संसाराचं चाक असं महागाईत फसल