मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सरपटणारे विनोद (२)

निमिष सोनार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
( भाग दोन मध्ये थोडा बदल. म्हणजे टि. व्ही. वर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचा, किंवा जाहिरातीचा संबध, खाली सरपटणाऱ्या बातम्यांशी लावला तर काय धमाल येईल...) •ग्रामीण भागात दोन मामे बहिणी विवाह करणार - अब्बास टायरवाला ची तीन तास कसून चौकशी. •आज राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता - उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य! •अमेरिका इराक युद्ध भडकले - इंग्लंड चार धावांनी पराभूत. तेंडुलकर सामनावीर! •"काय? तु काल रात्री कसलीच खबरदारी घेतली नाही? " - डेंगूची साथ. योग्य ती खवरदारी घ्या! •शेअर बाजाराची उसळी! - "अशा प्रकारच्या उसळींचा आपण आहारात नेहेमी सामावेश करावा! " •राज्यभर दुष्काळी परिस्थिती - "मला माझ्या मुलीला वाचवायला हवं. मी साबणाचं नाव सांगायला विसरले! " •-च्या निधनाने एक उमदा खेळाडू हरपला - " उंची सहा फुट, रंग गोरा - सापडल्यास या क्रमांकाअर संपर्क साधा! " •इंग्लंडमध्ये मॅडम टुसाडस मध्ये शहारुखचा पुतळा बसवला - सलमान घोड्यावरून पडला.

वाचने 3280 वाचनखूण प्रतिक्रिया 7

mamuvinod 14/07/2009 - 12:21
इंग्लंडमध्ये मॅडम टुसाडस मध्ये शहारुखचा पुतळा बसवला - सलमान घोड्यावरून पडला. लय भारी

घाशीराम कोतवाल १.२ 14/07/2009 - 14:21
"काय? तु काल रात्री कसलीच खबरदारी घेतली नाही? " - डेंगूची साथ. योग्य ती खवरदारी घ्या!
हे लयच भारी राव =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

मसक्कली 14/07/2009 - 15:43
•-च्या निधनाने एक उमदा खेळाडू हरपला - " उंची सहा फुट, रंग गोरा - सापडल्यास या क्रमांकाअर संपर्क साधा! " :? आपन नम्बर कुठे दिलाय..........???आणी खेळाडु कोन??????????? :W बाकि विनोद जमलेत थोडे फार...... ;)

प्राजु 14/07/2009 - 22:53
इंग्लंडमध्ये मॅडम टुसाडस मध्ये शहारुखचा पुतळा बसवला - सलमान घोड्यावरून पडला. =)) =)) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चिखलू 15/07/2009 - 00:01
अश्याच काही गमती TV channels झटपट बदलतांनाही होतात. सुरुवातीला जेव्हा Zee & DD हेच channels होते तेव्हा...... दुशा:सन, तुम्हे द्रौपदी का वस्रहरन करना ही होगा.... आज शाम को 5:00 बजे भारत में और 6:30 बजे U.A.E. में..........

आशिष सुर्वे 15/07/2009 - 10:32
* ओबामांची 'घाणा' देशाला धावती भेट ... सतत पडणार्‍या पावसाने सखल प्रदेशात घाणीचे साम्राज्य * शाहरुख खानचा सलमानबरोबर एकत्र काम करण्यास नकार ... न्यायालयाची 'कलम-३७७' ला संमती * राहुल द्रविड ची एकदिवसीय सामन्यांकरता फेरनिवड ... विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांत बेबनावाच्या अफवा *कोरियाच्या एकामागून एक 'अणु-शेपणास्त्र' चाचण्या, अमेरिका हतबल ... अपचन आणि 'अ‍ॅसिडीटी' वर रामबाण उपाय- रामसे बंधूंचा 'आम्लपित्तनाशक' काडा ## आता हापिसात थोडे काम करतो.. (हा ईनोद नाही... पोटापाण्याकरिता काहीतरी करायला हवेच ना!) - कोकणी फणस

३_१४ विक्षिप्त अदिती 15/07/2009 - 10:51
इंग्लंडमध्ये मॅडम टुसाडस मध्ये शहारुखचा पुतळा बसवला - सलमान घोड्यावरून पडला.
=)) =)) (कालच आणखी काही पाहिले) नवी मुंबईत मुलीची आत्महत्या - सचिन आणि विनोदमधे फूट पोलिसांची अक्षम्य दिरंगाई - विनोदने केला बातमीचा इन्कार