Skip to main content

( अजून एक विडंबन केलं आहे)

लेखक बामनाचं पोर यांनी बुधवार, 29/07/2009 06:13 या दिवशी प्रकाशित केले.
.. सर्वत्र दरवळणारा हा मस्त सुगंध... कोणी हाकलले तरी मी जाणार नाही... खारावलेल्या बर्फातले थंडगार शरीर तुझे.. बघताच मन पाघळुन गेले माझे... 'तीच्या' प्रसन्न हास्यानेच दिला होता इशारा तुझ्या अस्तित्वाचा.. पण 'ती' नेहमीच तुझ्यावर बारीक लक्ष ठेवते ... आणि मला झुरवते झालय आता नेहमीचच मला पण मी देखिल दबा धरुन बसलोय... कधी कळणार रे माझ्या मनातील भावना तुला ? .. तु ताजा पापलेट टोपलीतला .. अन मी बोका टपलेला ----------- 'ती' हे कोळीणीला उद्देशून आहे..
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1201
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया