Skip to main content

विनोद

शिवाम्बूचिकित्सा मित्र मंडळ

लेखक दत्ता काळे यांनी सोमवार, 02/11/2009 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
(हे लेखन संपूर्णपणे काल्पनिक आहे)
शिवाम्बूचिकित्सा मित्रमंडळ ( पुरुषांसाठी ) वार्षिक सभा आणि नूतन सभासद नोदणीचा कार्यक्रम
सदाशिव पेठेतल्या रा.ब. कुमठेकर मार्गावरच्या जुन्या वाड्याच्या भिंतीवरची हि पाटी पाहून मला फार आनंद झाला. "चला .. संस्थेबद्दलची उत्सुकता आता फार काळ ताणली जाणार नाही " असे मनातल्या मनात म्हणत मी पाटी परत एकदा वाचून बघितली. खाली सभेची तारीख आणि वेळ ठळकपणे लिहिलेली होती.

(बलुतं)

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 30/10/2009 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
कौतुक शिरोडकरांची बलुतं वाचुन एक हि & ही प्रयत्न टारझन रावांस अर्पण ;) तसा अनेकांनी प्रयत्न केला त्याच्या बालिशपणाला आवर घालण्याचा, फसलेल्या स्थळांचा पराक्रम करणार्‍या दादाला सरळ करण्याचा, षडरिपूंनी चढवलेल्या कल्पनांना विडंबनरुपी विरजण घालण्याचा, पण किडे वळवळणारा आणि हो उद्योग जन्मसिद्ध अधिकार्‍यासारखाच... या प्रवृत्तीचे मूळ शोधण्यासाठी ग्रंथसंपदा चाळण्याची गरज नाही.... दहावीला असंख्य कल्पना पुजुनच जन्माला आलाय तो... गटण्यासारखाच... म्हणून तर .... किडे वळवळणारा आणि हो उद्योग जन्मसिद्ध अधिकार्‍यासारखाच... जसा पहिल्यांदा तसाच आताही.......
काव्यरस

ताईचा सल्ला

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 28/10/2009 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्न :- ताई, मी मिसळपाव वरील एक स्त्री सभासद आहे, माझे खुप मित्र आणी खुप फॅन्स पण आहेत. मी सगळ्या धाग्यांवर भरभरुन प्रतिसाद देते पण सभासद मला 'उगाच पुढे पुढे करणारी, अतिशहाणी आणी बालिश' म्हणतात. आजकाल तर काही सभासद मला तुझे खाते 'फेक' आहे म्हणतात. काहि स्त्री सभासद तर मला मुद्दामुन "काय रे कसा आहेस?" असे विचारतात. पुरुष सभासद "मला फोन कर म्हणजे तुझ्या आवाजावरुन तु मुलगी आहेस का नाही ते कळेल" म्हणतात. सगळेच माझ्या ज्ञानावर व रुपावर जळतात. ताई मी काय करु ?

निवडणुका आणि मानोसपचार तज्ज्ञ ...

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 26/10/2009 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या घराच्या विस्तिर्ण अशा बाल्कनीवर फ़ेर्‍या मारुन ( वे समोर तेच तेच "पडलेले" चेहरे पाहुन ) दादुमहाराजांना प्रचंड वैताग आला आहे, काय करावे काही सुचत नाही. जरा कुठे बाहेर जावे म्हटले तर मिडीयाच्या आग्यामोहळाचा टेरर आहे म्हणुन तो ही उपाय कटाप. मधुनच मिलिंद त्याच्या ब्लॆकबेरीमध्ये डोकावुन काही तरी युसलेस डेटा देत असतो, कार्यकारी संपादक व खासदार ही उगाच काहीतरी बोलायचे म्हणुन उसने अवसान आणुन बोलत असतात पण आता त्याला काहीच अर्थ नाही हे दादुमहाराजांना उमजले आहे म्हणुन ते “जाऊ दे आता, काय करणार ?” अशा अर्थाचे हातवारे करत असतात.

आयटीवर बोलू काही..!

लेखक उपटसुंभ यांनी गुरुवार, 22/10/2009 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
(संदीप - सलिल आणि त्यांच्या तमाम चाहत्यांची क्षमा मागून) जरा मजेने, जरा खरोखर बोलू काही चला दोस्तहो, या आयटीवर बोलू काही उगाच गाजर ऑनसाईटचे दाखवित रहा तू गळले नाही प्रोजेक्ट तोवर बोलू काही पी एम. पाहून चॅटींगवर कुजबुजली पोरे पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही हवेहवेसे फ्लर्ट तुला जर हवेच आहे स्मार्ट देखण्या ट्रेनीबरोबर बोलू काही किती काळजी अप्रेजलची बघ रांगेतुन एप्रिल नाही तर ऑक्टोबर बोलू काही स्किल्स असू दे सीवीमध्ये काठी म्हणुनी रिसेशनचा प्रवास खडतर बोलू काही मूळ गीत - आयुष्यावर बोलू काही कवी - संदीप खरे
काव्यरस

पावरफुल्ल तोडी

लेखक अन्वय यांनी बुधवार, 21/10/2009 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
दुसरे महायुद्ध सुरू होण्याआधी (1933) प्रख्यात शास्त्रीय गायक ओंकारनाथ ठाकूर एकदा युरोपमध्ये संगीत दौऱ्यावर गेले होते. याच दौऱ्यात त्यांना इटलीत जाण्याचा योग आला. मुसोलिनी त्यावेळी इटलीचा सर्वेसर्वा होता. त्याला भारतीय शास्त्रीय संगीत ऐकविण्याची ओंकारनाथांची इच्छा झाली. मुसोलिनीच्या सचिवामार्फत त्यांनी मुसोलिनीला गाणं ऐकविण्याची परवानगी मिळविली. पाच मिनिटात गाणं संपवायचे ही अट होती. पंडितजींनी ती मान्य करून मुसोलिनीसमोर तोडी राग गाण्यास सुरवात केली. वेळ संपत आली; पण मुसोलिनीला गायनाने भारावून गेला होता. त्यानं पंडितजींना खुणेने गात राहायला सांगितलं. तोडी सुरूच होता.

दिल्लीची रखुमाई......सोनिया.....माझी माऊली.....

लेखक पिवळा डांबिस यांनी सोमवार, 19/10/2009 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल एक स्पष्टीकरण.... प्रथम माझ्या मिपाच्या वाचकांना, लेखकांना, प्रशासकांना, (आणि अवांतर मिपाकरांना) दिवाळीच्या शुभेच्छा! आणि काकांच्या लाडक्या तात्याला तर खास दिवाळीनिमित्त गोड गोड पापा!!!! :) आम्ही हे लिहित आहो हे याचं कारण आमचा सटकलेला मेंदू आणि दिवाळीच्या सुट्टी यामुळे हाताशी असलेला वेळ.... सोनिया विषयी आम्हाला खास पुळका आहे अशातला भाग नाही. आम्ही कॉन्ग्रेस किंवा भाजप पार्टीचे नाही, किंबहुना अंमळ भांडवलशाहीच आहोत!!!! उद्या सोनियाचं आमच्या दृष्टीने चुकलं तर तसंच लिहिणार.

पुलं, निळा कोल्हा आणि.....

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शनिवार, 17/10/2009 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
पिपात पडलेल्या निळ्या कोल्ह्याचे पितळ अखेर उघडे पडले आणि सगळ्या कोल्ह्यांनी त्याला राज्यपदावरून पदच्युत करून हाकलून दिले. निळा कोल्हा रानोमाळ भटकत निघाला आणि अखेर तो एका आमराईत आला. आमराईत जरा विश्रान्ती घ्यावी म्हणून तो एका डेरेदार झाडाच्या दिशेने निघाला. झाडाजवळ गेला आणि बघतो तर काय.. ! तिथे मध्यम वयाचा, चश्मा घातलेला आणि मिश्किल हसणारा एक माणूस एका चिमुरड्या मुलीबरोबर गाणे म्हणत होता.