Skip to main content

विनोद

अप्रेझल

लेखक शब्देय यांनी बुधवार, 30/12/2009 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिस मधील अप्रेझलच्या मोसमात आपल्यासारखाच मार खाल्लेला दुष्काळग्रस्त मित्र लाभणे यापेक्षा दुसरे भाग्य नाही. संध्याकाळी घरी आल्यावर मी माझ्या अशाच एका मित्राला फोन लावला. "हॅलो. काय रे, काय सुरु आहे?" मी. "काही नाही रे. तू बोल." तो. सिक्स्थ सेन्स म्हणा किंवा काहीही म्हणा पण अशावेळी दोघांनाही बरोबर माहित असते की आता कोणता विषय निघणार आहे ते. "आज रेटिंग समजले आणि डिसकशनपण झाले." मी सांगून मोकळा झालो. "मला 'गुड' दिलयं आणि डिसकशन उद्या होईल." त्याने आपली पाने टेबलावर टाकली. "सेम हिअर. मला पण तेच. आऊटस्ट्यांडींग, एक्सलंट, गुड, आणि अ‍ॅव्हरेज या क्रमाने गेलो तर 'गुड' म्हणजे 'बॅड' आहे.

एक उनाड दिवस .....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 29/12/2009 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार : दिनांक १९/१२/२००९ सौभाग्यवती गुरूवारीच सोलापूरी, माहेरी गेलेल्या होत्या. त्यामुळे यावेळच्या विकांताचे आमचे प्लानिंग सॉलीड ठरवले होते. म्हणजे शनिवारी पहाटे १० वाजता उठायचे. मग चहा करुन घ्यायचा. त्याप्रमाणे उठलो. चहाचा (करायचा) कंटाळा आल्याने नुसतेच थंडगार दुध घशाखाली उतरवले. नाष्ट्याला काय बनवावे बरे? :/ पोहे, उप्पीटाचा कंटाळा आलाय. मॅगी नावाच्या शेवया मला आवडत नाहीत. घरातली पास्त्याची पाकीटे संपलेली. आधी विचार आला की पनीर पकोडे वगैरे काहीतरी मस्त चमचमीत करुन खावे. पण फ्रीज उचकला तेव्हा लक्षात आले की फ्रीज मध्ये पनीरच काय, साध्या हिरव्या मिरच्याही नाहीत. :T .

होतं असं कधी कधी...

लेखक अनामिक यांनी शुक्रवार, 18/12/2009 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
मी अगदी लहान होतो तेव्हा बाबांबरोबर घडलेली गोष्टं (मी ऐकलेली). माझ्या दादाचं शाळेत नाव घालायचं होतं म्हणून बाबा गावातल्याच शाळेत गेले. तिथले कर्मचारी, शिक्षक तसे ओळखीचेच होते, त्यामुळे आधी गप्पा झाल्या आणि नंतर दादाच्या नाव नोंदणीचा फॉर्म भरायला घेतला. त्यात मुलांचं नाव काय असं विचारलं आणि बाबा गोंधळात पडले... घरी दादाला 'दादा'च म्हणत होते सगळे आणि त्यामुळे बाबा त्याचं नावंच विसरले होते... झाली का पंचाईत! सगळे कर्मचारी हसायला लागले.... नाव काही केल्या आठवेना... तेव्हा लोकांसमोर हशा तर झालाच, पण घरी नाव विचारायला आल्यावर काय झालं ते विचारू नका.

आमची `शोध'(?)पत्रकारिता!

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 09/12/2009 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाचं बोलणं चोरून ऐकण्याची आणि ते दुसर्‍यापर्यंत विनाविलंब पोहोचवायची आमची सवय तशी फार जुनीच. म्हणजे इतकी जुनी, की, आम्ही बातमीदार होणार असं भविष्य आमच्या पिताश्रींनी खूप लहानपणीच- म्हणजे `आमच्या' लहानपणी- वर्तवलं होतं. आज आम्हाला हे सांगण्यास आनंद होतो, याचं कारण, पाळण्यातले पाय पाहून भविष्य वर्तवण्याचे शास्त्र अलीकडे लोप पावत असताना, असे शास्त्र खरोखरच अस्तित्वात होते, याचा ठोस पुरावा आमच्या रूपानेच आमच्या हाती आहे. बातमीदाराने (पक्षी- रिपोर्टराने) पुरावा हाती असल्याखेरीज बातमी `डिस्क्लोज' करू नये, असं पत्रकारितेच्या वर्गात शिकवलं जातं असं म्हणतात.

<नंदनला पत्रे>

लेखक पिवळा डांबिस यांनी बुधवार, 25/11/2009 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल "स्त्रीसौंदर्य, रुचकर खाणंपिणं, आणि संगीत बजावणं या तिन्ही वाबतीत भारतासारखी महासत्ता कोणाकडेच नाही रे!!!!" व्वा!! क्या बात है!!!
काव्यरस

तुझे निरंतर चित्र काढतो...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 20/11/2009 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
....महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी रंगविलेले पाच वर्षांनंतरच्या महाराष्ट्राचे एक रम्य चित्र- गरीबांसाठी दहा लाख घरे, गावागावाला डांबरी रस्ते, मुलामुलींना मोफत शिक्षण, जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे एफडी करून स्त्री भृणह्त्या रोखणार (?), ६५ वर्षावरील गरजू वृद्धाना आजीवन ६०० रुपये पेन्शन, गरीबांना ३ रुपय किलो दराने धान्य = सुजल महाराष्ट्र, सुफल महाराष्ट्र!!! (या स्वप्नाचे कात्रण काढून ते जपून ठेवावे काय?

नवीन वसाहत

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 16/11/2009 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
ताजी खबर, ताजी खबर भुतीण पारावरून ओरडली लगबगीने सरसर सरसर पारंबी धरून खाली आली - रात्र काळी, सळसळ झावळी समंध भारी, मुंजे किरकीरी जखिणी, हडळी आणि भुतावळी झाडांवर जमली सारी बिरादरी - कशाला उगाच मारतेस बोंबा उलटे झुलते वेताळ विचारते जरा थांबा, खाली घ्या टांगा सांगते सारे, भुतीण फिस्कारते - आपला सगळा मोहल्ला चालला येथून दुसरीकडे जागा देतील संपला जुना सहवास इथला कबरीतून काढून भांड्यात ठेवतील - बिरादरी भुमीवर वसाहत बांधून जागा भरणार, माणसे रहाणार हाडे खोदून, थोडीशी निवडून, एकावर एका बॉक्समधे ठेवणार ***१ - मज्जा ने मज्जा, केकाटला मुंजा नवीन घर, हायराईज रिसॉर्टवर ए तुला नाही भेजा, म्हणाला कुब्जा तूच म
काव्यरस

यांच असं का होतं ते कळतं नाही ... विचारवंताना समर्पित !

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 13/11/2009 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : त्या दिवशीच्या विधानसभेतल्या अभुतपुर्व प्रसंगानंतर संकेतस्थळांवर "विचारवंतांच" एकदम पेव फुटलं.
काव्यरस

अबू आझमीची लावणी..!

लेखक उपटसुंभ यांनी मंगळवार, 10/11/2009 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
(शांता शेळके, आशा भोसले आणि लता मंगेशकर यांची क्षमा मागून) (कालच्या विधानसभेतील प्रसंगानंतर अबू आझमी असंच काही म्हणत असावेत) मनसेच्या कदमांनी, आणि शिशिर शिंद्यांनी, कानाखाली आवाज ऐसा काढीला... हात नका लावू माझ्या दाढीला... पर्वा केली नाही मी विनंतीची, मतं मोठी माझ्यासाठी हिंदीची.. हिंदीची बाई हिंदीची धावला वसंता पुढे, वांजळेही जोडीला... हात नका लावू माझ्या दाढीला... निलंबन झालं मोठ्या थाटात जी थाटात. चार डबे चार वर्ष यार्डात जी यार्डात. नऊ डबे अजुन बाकी "इंजिनाच्या" गाडीला... हात नका लावू माझ्या दाढीला... मने जिकली मराठी माणसाची, मती गुंग झाली सेना भाजपाची...
काव्यरस

फोलपटरावांची मुलाखत

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी सोमवार, 02/11/2009 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
वर्तमानपत्राच्या रामरगाड्यातील वेळ काढुन मराठी ब्लॉगविश्वात स्वत:चे एक स्थान बनवणार्‍या देवीदास देशपांडे तथा डीडी यांच्या दुनियेत फोलपटराव भेटले. चित्रपट निर्माते दिग्दर्शक फोलपटराव यांची मुलाखत आहे तशी राजकारणी फोलपटराव यांची देखील मुलाखत दोन भागात आहे आपण जरुर डीडीच्या दुनियेत फेरफटका मारा.