झुठ का सामना

लेखनविषय:
लेखनप्रकार
मन्या हा साधासरळ गृहस्थ व निर्व्यसनी म्हणून सर्वांना परीचित वयाच्या एकविसाव्या वर्षीच वडिलांनी त्याचे लग्न लावून दिले.कामाला जाणे तिथून घरी येणे हे त्याचे नित्याचेच. पण या मन्याला घरच्यांना न सांगता अचानक सच का सामना मध्ये जायची दुर्बुध्दी होते आणि टिवी वर त्याचे दृश्य झळकू लागतात १) डान्स बार मे जाते थे क्या ? २) आपने कभी वेश्या के साथ शारीरीक संबंध बनाये है क्या?

डुक्करताप, मी अन घबराट

गेल्या महिन्यातल्या एका सुरम्य पहाटे (असे आपले म्हणायचे असते बरं का!) मी छान झोपलो होतो अन सगळे जग गदागदा हलत असावे तशी जाणीव झाली. आयला! काय भुकंप झालाय का? असा विचार अर्धवट झोपेत करेतो मोठमोठे आवाज कानात घुमायला सुरुवात झाली. काही सेकंदातच आवाजाची ओळख पटली अन तिकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडु शकेल हे ही कळले. आवाज होता बायकोचा. अरे उठ! असा गजर करत ती मला गदागदा हलवत होती. डोळे उघडुन भिंतीवरच्या घड्याळात पाहिले तर फक्त साडेसहा वाजले होते. "काय आहे! जरा झोपु दे की," मी कुरकुरलो अन धडाम-धुडुम तोफखाना सुरु झाला. "इकडे मुलाच्या शाळेत स्वाईन फ्ल्यु आलाय अन म्हणे झोपु दे.

बायको बरोबर भाजीला गेलो...

लेखनविषय:
काव्यरस
बायको बरोबर भाजीला गेलो, पिशवी तिच्या हातात होती खरेदीला घेतलेल्या पैशाची, माझ्या खांद्यावर जड पोती आलं, कडीपत्ता, भाजीवाल्यानं सहज पिशवीत सारला दोन किलो वांगी दे म्हटल्यावर, पॅन नंबर विचारला तो म्हणाला, शंभर रुपयाच्या भाजीवर, फुकटच आहे कडीपत्ता पण आयकर विभागाला कळवावा लागतो तुमचं नाव आणि पत्ता. कडधान्याच्या दुकानात बॅंकांचे प्रतिनिधी वाटत होते अर्ज तूरडाळ खरेदीसाठी सवलतीच्या दरात मिळत होते कर्ज डाळीचा मग नाद सोडला, चिकन आणलं भाराभर त्यादिवशी मला पटलं, `घर की मुर्गी दाल बराबर' दाल मे कुछ काला है, मोठा कठीण आलाय काळ महागाईसमोर कुणाचीच शिजेनाशी झालीय डाळ आमच्या संसाराचं चाक असं महागाईत फसल

आणि कॉमन मॅन बोलला!

हं, कॉमन मॅन हे नाव थोडंसं आठवतंय ना (हल्ली कॉमनमॅनच्या जागी 'कॉनमेन' हाच शब्द एवढ्या वेळा आपण वाचतो की विचारावंसं वाटलं!) काल पद्मविभूषण आर. के. लक्ष्मण यांचा मानसपुत्र, 'कॉमन मॅन'वर आधारित एकपात्री कार्यक्रम पाहिला. लेखक: अनिल जोगळेकर, भाषांतरकारः गौतम जोगळेकर, संगीत: बंकिम आणि बाकी सर्व श्रेय प्रा. अजित केळकर यांचं; पण केळकर म्हणतात सर्व श्रेय आपल्या सगळ्यांमधे असणार्‍या असामान्य सामान्यांचं आणि हे असामान्यत्व चितारणार्‍या कार्टूनीस्ट आर. के. लक्ष्मण यांचं! एकविनोदाच्या अंगाने जाणारा तरीही अंतर्मुख करणारा कार्यक्रम असं याचं वर्णन एका वाक्यात करता येईल.

'नांदा सौख्यभरे' (राखी तू मांडले। तुझे स्वयंवर)

लेखनविषय:
काव्यरस
राखी तू मांडले। तुझे स्वयंवर 'वर' अनावर। देशोदेशी 'टीआरपी'साठीच। मिडियाचा स्टंट प्रसिद्धी इंस्टंट। मिळे तुला आपुल्या देहाचा। मांडसी बाजार कैसा हा आजार। राखी तुझा भारतीय नार। आहेस तू राखी संस्कृतीची 'राखी'। लाज थोडी देतो आशीर्वाद। लग्नगाठ बांधा एकाशीच 'नांदा। सौख्यभरे' -अविनाश ओगले

( अजून एक विडंबन केलं आहे)

लेखनविषय:
काव्यरस
.. सर्वत्र दरवळणारा हा मस्त सुगंध... कोणी हाकलले तरी मी जाणार नाही... खारावलेल्या बर्फातले थंडगार शरीर तुझे.. बघताच मन पाघळुन गेले माझे... 'तीच्या' प्रसन्न हास्यानेच दिला होता इशारा तुझ्या अस्तित्वाचा.. पण 'ती' नेहमीच तुझ्यावर बारीक लक्ष ठेवते ... आणि मला झुरवते झालय आता नेहमीचच मला पण मी देखिल दबा धरुन बसलोय... कधी कळणार रे माझ्या मनातील भावना तुला ? .. तु ताजा पापलेट टोपलीतला .. अन मी बोका टपलेला ----------- 'ती' हे कोळीणीला उद्देशून आहे..

भाकरी फिरवणे... साहेबांच्या पक्षाची , टीम इंडियाची व युवराजांच्या लग्नाची...

लेखनविषय:
लेखनप्रकार
तिन्ही मिटींगचा विषय :- भाकरी फिरवणे .. फक्त संर्दभ वेगवेगळा आहे.. ;) --------- १) ठिकाण:- प. महाराष्ट्रातला साखर कारखाना... निमंत्रित:- पक्षाचे सर्व सन्माननीय सदस्य.. उगाच वाद नको म्हणून साहेबांची एकट्यांची जागा स्टेजवर .. बाकी सगळे समोर .. साहेबांनी एक उस खाली आपटून दोन तुकडे केले..अन म्हणाले " ह्म.. करा सुरवात.. " सगळ्यानी एकदम कल्ला सुरु केला. " आरक्षणाच्या आंदोलना मुळे २-३ जागा हातच्या गेल्या.. एव्ह्ढ ताणून धरायची काय गरज होती.. " " काय म्हणालात .. समाजाने गठ्ठा मतदान केल. म्हणून ८ तरी जागा आल्या.. आरक्षणाच्या नावाने बोलायच काम नाही.

माय, मावशी नि माझी लेक!

जैसी हरळामाजी रत्नकिळा की रत्नांमजी हिरा निळा तैसी भाषांमाजी चोखळा भाषा मराठी फादर स्टिफन्स या आंग्ल माणसाने लिहिलेले मराठी भाषेचे वर्णन वाचून छाती अभिमानाने फुगली. तोच आमची साडेतीन वर्षाची लेक आली. तिच्या हातात बाहूली होती. तिला तिचे कपडे बदलायचे होते. तिने 'ऑर्डर' सोडली, बाबा, मला जरा बाहूलीचे कपडे 'निकलून' द्या ना ! क्षण दोन क्षण काय बोलली ते कळलंच नाही. मग मेंदूपर्यंत झण्णकन गेल्यासारखं काही तरी झालं. 'कपडे निकालके दे ना' या हिंदी वाक्यातल्या 'निकलके'चा लचका तोडून तिने मराठी वाक्याला जोडून माझ्यासमोर आदळला होता.

चांदन्या!!!

लेखनविषय:
"निवेदन - "अमूक अमूक प्रतिसाद हा पूर्णत: अवांतर असून मूळ विषय भरकटवणारा आहे" असे दुव्यानिशी सर्वप्रथम दाखवून देणार्‍या कुणाही सभासदाला (मिपा संपादकांव्यतिरिक्त!) एक चांदणी (स्टार) बक्षिस देण्यात येईल. दर आठवड्याला कुणी किती चांदण्या मिळवल्या याचा हिशोब होऊन सर्वाधिक चांदण्या मिळवणार्‍या सभासदाला एक वेगळा धागा काढून त्याचा/तिचा "आठवड्याचा/ची मानद संपादक/संपदिका!"अशी पदवी देऊन गौरवण्यात येईल." ******** आँ!!! ह्यी म्हनजे पंचाईतच हाये!!! काय हो? कसली पंचाईत? आरंच्चा!! कोन हो तुमी? काय वळख नाय देख नाय आनी लागले सवाल-जबाब कराया!!! काय रामराम वगैरे करायला येतं का न्हाय? हो, हो, चुकलं!
Subscribe to विनोद