(हा धागा उडवलेला दिसला. कारण समजले नाही परंतु कदाचित काही शब्द आक्षेपार्ह असावेत असे समजून ते वगळून पुन्हा धागा पोस्ट करत आहे. धागा आक्षेपार्ह वाटल्यास जरूर उडवावा परंतु त्यामागचे कारणही कळवावे ही प्रशासनास विनंती)
रात्रीची जेवायची वेळ. बंड्या, आई, आणि बा जेवायला बसलेत. बंड्या एकदम खोल विचारात.
बंड्या(बांना): बा देवाला नाव कुणी ठेवलं?
(बा बंड्याच्या प्रश्नांनी एकदम चक्रावून जातात)
बा: आरं बंड्या, काय बी काय इचारतो.
बंड्या: आज की नई शाळेमंधी आमच्या वर्गात एक नवीन गुर्जी आलं व्हतं शहरातून. लै हुश्श्यार हाय म्हणं. आल्याआल्याच गुर्जीनं विचारलं देवाचं नाव कुणी ठेवलं सांगा पोरांनो.