'गाणं' या गोष्टीशी सर्वांचाच आयुष्यात कधी ना कधी संबध आलेला असतो. पण ‘गायन’ करण्याचा प्रसंग मात्र सर्वांवरच आलेला नसावा. म्हणजे शाळकरी वय किंवा कॉलेजचं ग्यादरिंग वगैरे सोडून. तरीसुद्धा, ‘गायनी गळा’ असो अथवा नसो, ‘गायनी कळा’ मात्र सर्वांनाच आयष्यात केव्हा ना केव्हा हमखास येऊन गेलेल्या असतात. आणि प्रत्येक घराच्या बाथरूमच्या भिंतींना, घरातल्या सर्वांच्या या ‘गायनी कळा’ चांगल्याच परिचित असतात. (आणि काही घरांच्या टॉयलेटच्या भिंतींनासुद्धा ! )
या गायनी कळांनी आणलेल्या गमतीदार प्रसंगांचे काही किस्से.
मंगल कार्याला पार्श्वभूमीवर गाणी वाजत ठेवण्याची पद्धत आहे.