Skip to main content

विनोद

तद्दनबाई गेली...................................!

लेखक प्रदीप यांनी शनिवार, 12/07/2014 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षकांत शेवटी पूर्णविरामांची लांबलचक गाडी असल्याशिवाय वाचकांना लेख उघडून पहावासा वाटणार नाही, अशी भीती इथे अनेक लेखकांच्या मनात आहे असे अलिकडे दिसून येते. ह्याच भीतीचा कासरा धरून, मीही तसेच केले आहे. तर तद्दनबाई गेली. कधी ना कधीतरी ती, आपल्या सर्वांप्रमाणे जाणार होतीच. पण तरीही तिचे जाणे मात्र माझ्या मनाला लागले. कारण एक जमाना तिने काय गाजवलाय म्हणता! तो मूकपटांचा जमाना होता. मुंबईत इनमिन चार- पाच सिनेमा हॉल तेव्हा होते. त्यातील ऑपेरा हाऊस व स्वस्तिक आम्हा मध्यमवर्गीय गिरगावकरांच्या सोयीचे!

शॉपिंग

लेखक वाचनपिपासु यांनी सोमवार, 30/06/2014 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारची दुपार मस्त ताणून द्याईचा प्लान होता ,तितक्यात कानात काहीतरी कुजबुज होते थोडा समान आणैईचा होता मार्केट मधून .....!! अलॉखे ,पिलॉखे घेत का - कु करत हो म्हणत तयार झालो . थोड्या फार अनुभवा वरुन एक गोष्टा शिकलो , ती मणजे बाहेर कोणतेही आणि कितीही समान आणैचे असल्यास , एक लिस्ट करून घ्यावी सामानाची . लिस्ट करण्याचे 2 फ़ाइदे , एक तर तुमाला स्मरण शक्तीचे खेळ खेलाईची गरझ नाही , आणि दुसर आणि महत्वाचा ,उद्या जौन तुमच्या वर आरोप होऊ शकतो की ही गोष्टा सांगितली होती आणि ती नई आणली , ही लिस्ट प्रूफ म्हणुन दाखवू शकता. आणि जमले तर रिजिस्टर्ड पोस्ट प्रमाणे घरी आल्या वर त्या वर सगळे समान आले अशी साही न शिक

मॅनेजमेंटचा गोडाचा शिरा

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 24/06/2014 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी काहीजण व्यवसाय करतात, काही जण नोकरी करतात, तर काही जणांनी या पैकी एक केलेलं आहे. पैसे मिळवायला तुम्हाला ते करणं भाग असतं. आणि यात विशेषत: ज्यांनी नोकरी केलेली आहे, म्हणजे जे ऐलतीरावर राहिलेले आहेत त्यांना पैलतीरावरच्या माणसांचा नेहमीच (अपवाद असतीलच) त्रास झालेला आहे. सांगायचंच झालं तर ज्या प्राण्याला बॉस म्हणतात त्या प्राण्याचे लाड करण्यात, नखरे सहन करण्यात, एम्प्लॉयी किंवा कर्मचारी नामक व्यक्तीची काय तारांबळ होते, किती त्रास होतो, किती मनस्ताप होतो, राग येतो, हे ज्याचं त्याला ठाऊक आहे.

सोबत ..... एक किस्सा

लेखक मित्रहो यांनी शुक्रवार, 13/06/2014 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
एक फार जुना किस्सा आठवला. कंपनीतल्या साऱ्यांनी देवदास बघायचे ठरविले. मला बघण्यात फारसा रस नव्हता पण सारे तयार झाले म्हणून मी पण तयार झालो. मला मुळात देवदास हा प्रकारच आवडत नाही. अरे पिण्यासाठी ब्रेक अपच व्हायची काय गरज आहे? पारो गेली तर चंद्रमुखी मिळाली या खुषीत पण पिता आले असते. बर त्यावेळ पर्यंत स्वदेस किंवा चक दे इंडीया बघण्यात आले नव्हते. तेंव्हा शाहरुखला चांगले म्हणून त्याच्यासाठी पिक्चर बघावा असे काही नव्हते. संजय लीला भनसाळी म्हणजे मला तरी दहा रुपयाचे आमलेट आणि शंभर रुपयाचे केच अप असा प्रकार वाटतो. तरी साऱ्या मित्रांसाठी मी तयार झालो पण आमची एक मैत्रीण मात्र शेवटपर्यत तयार झाली नाही.

बेसनलाडू समवेत मुंबई कट्टा

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी शुक्रवार, 23/05/2014 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी जालावरील जुने व्यक्तिमत्त्व, मिसळपावचे पहिल्या दिवसापासुनचे सदस्य, बे एरियातील मुरलेले कट्टेकरी आणि माझे परममित्र श्री बेसनलाडू सद्ध्या मुंबईत आले आहेत. येथील गँगचा आणि त्यांचा परिचय व्हावा म्हणून शनिवार दि. 24 रोजी दादर पुर्व स्थानकासमोरील ऋषी हॅाटेल येथे सायंकाळी ६ वाजता भेटण्याचे ठरवले आहे. तुर्तास मी, रामदास काका, प्रास, सुड, किसन आणि कस्तुरी इतके मेंबर इन्न आहेत. इतरांना कळावे म्हणून हा धागा. समन्वयासाठी मोबाईल क्रमांक हवा असल्यास व्यनी करावा.

कलगीतुरा- भाग ५

लेखक बबन ताम्बे यांनी सोमवार, 19/05/2014 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीच्या भागांची लिंक खाली देत आहे. कलगीतुरा- भाग १ कलगीतुरा- भाग २ कलगीतुरा- भाग ३ कलगीतुरा- भाग ४ "त्यादिवशी तू तुझ्या दोस्ताला माझ्याकडे घेऊन आला. त्याचे कमिशन ठरल्यानंतर त्यानी तुला लगेच कटवला. मला म्हटला दिग्याला मी लगेच कटवला कारण तीन तिघाडा काम बिघाडा नको.

<<< हा मिपाचा विजय >>>

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 16/05/2014 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही काही काळापूर्वी http://misalpav.com/node/27418 ह्या काकू द्वारे गणपा खरंच मिपाशेफ बनतील का असा एक सर्व्हे घेतला होता. तेव्हा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात 'गणपा' चा प्रचार काही जणांनी केला. त्यांच्या विरुद्ध देखील काही लोक बोलले. आज ह्या ठिकाणी निकालाच्या प्रसंगी गणपा जिंकून आलेला आहे. सगळ्या मिपाकरांनी गणपा लहरी आहे- आपलं- गणपा लहर आहे हे मान्य केलं आहे. तरी देखील गणपा जिंकला म्हणजे सगळं साध्य झालं असं होत नाही. त्याला बर्‍याच पा कृ शिकायच्या आहेत, बनवून दाखवायच्या आहेत, सुगरणींच्या सल्ल्यांमधून नेमकेपणा आणायचा आहे.

लिखाण

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 15/05/2014 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
“आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.” पुलंची ही वाक्ये वाचनात आली आणि मी भारावून गेलो. ठरवले आपण सुद्धा कुठल्या तरी कलेशी मैत्री जोडावी. कुठलीतरी कला आत्मसात करावी पण कुठली कला हा फार मोठा प्रश्न होता. गाणे शिकावे म्हटले तर मला माझ्या गाण्याची पट्टी चांगली ठाउक होती.

सिनेमा आणि प्रेम

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 14/05/2014 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमा का कोण जाणे उगीचच बदनाम झालेला आहे. सर्वच उच्चभ्रू लोकांची त्याला येनकेनप्रकारेण नावं ठेवण्याची अहमहमिका लागलेली असते. सर्वसामान्यांना आवडतं त्याला नाकं मुरडल्याशिवाय स्वतःला विचारवंत आणि उच्चभ्रू म्हणवूनच घेता येत नाही. 'सिनेमे बघून मुलं बिघडतात' हा त्यांचा सगळ्यात नवीन शोध. मुलं हे देशाचे भावी आधारस्तंभ असल्यामुळे मुलं बिघडली की समाज बिघडतो, आणि त्यातूनच कॉंग्रेससारख्या पक्षाचं राज्य दशकानुदशकं टिकून राहतं. अर्थात लवकरच हे बदलणार आहे, त्यामुळे मला तर समाज बिघडलेला आहे याची चिंता वाटत नाही. पण तरीही या उच्चभ्रूंचा सिनेमांना नावं ठेवण्याचा उद्योग चालूच असतो.

आलिया निवडणूक असावे सादर !!

लेखक चिनार यांनी मंगळवार, 13/05/2014 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
गेले कित्येक दिवस ज्याची वाट बघत होतो तो मतदानाचा दिवस आता चोवीस तासांवर आला होता. " उद्या मतदान करायचं " एवढा एकच विचार मनात घोळत होता . याआधी दोन -तीन वेळा मतदान केलं असलं तरी यावेळचा मतदानाचा उत्साह काही संपता संपत नव्हता. जणू काही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही माझ्या एका मतानेच हादरणार होती. मला आज सकाळपासूनच माझ्या लहानपणीचं निवडणुकीच्या वेळेस चं वातावरण आठवत होत. कोणत्यातरी एका निवडणुकीच्या वेळी गल्लीतल्या आम्हा सगळ्या मुलांमध्ये प्रचारपत्रकं गोळा करण्याची स्पर्धा लागली होती. म्हणजे अक्षरश: भोंगा लावून प्रचार करत फिरणाऱ्या ऑटो किंवा टांग्याच्या मागे धावत जाऊन आम्ही पत्रकं गोळा करायचो.