Skip to main content

विनोद

Sense of Humour

लेखक kurlekaar यांनी गुरुवार, 13/03/2014 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
‘विनोद’ सगळ्यांनाच आवडतो. मलादेखील तो माझ्या लहानपणापासून आवडत आलाय. सुरुवातीस चिं वि जोशी(चिमणराव आणि गुंड्याभाऊ), नंतर पु. ल. व त्यानंतर गंगाधर गाडगीळ (बंडू आणि स्नेहलता), वि. आ. बुवा(मालन मोहिले), द. मा. मिरासदारांहवाच्या ग्रामिण पार्श्वभूमीवरच्या कथा, व इंग्रजी वाचायला सुरुवात केल्यानंतर P G Wodehouse. मोठेपणी वाटायला लागलं की आवडणं वगैरे ठीक आहे पण विनोद मला का आवडतो याचं विश्लेषण करावयास हवं. विनोदासाठी बुद्धी व शब्दकौशल्य आवश्यक आहे; एक पारदर्शक, स्वच्छ स्वभाव देखिल लागतो नाहीं तर विनोदाचा दर्जा व पातळी घसरायला लागते.

सोनाक्षी म्हणे मिपाकरां - महाकट्टा त्वरें करा - नाचू टरारा टरारा... अत्यानंदे .

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 03/03/2014 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकर हो, सज्ज व्हा ‘पेन्थिसीलिया’ सोनाक्षी सह आपल्या ‘महाकट्टया’ साठी. हा महाकट्टा लवकरच होऊ घातला आहे, तोही खुद्द सोनाक्षीच्या संगनमताने. सल्लूच्या खर्चाने. हे कसे बुवा? तर त्याचीच ही कहाणी : बॅटमॅनच्या या धाग्यात इरसाल यांनी “जर मी ह्यावर पिच्चर काढला तर पेन्थेसिलिआ चे काम फकस्त आनी फकस्त सोनाक्षी सिन्हालाच.” हे वाचून आम्ही अक्षरश: भारून गेलो, आणि आमच्या मन:चक्षु समोर सोनाक्षीबाला आणि तिचे पेन्थेसिलिआच्या वेषातील रुपडे साकार झाले. मग काय, लगेचच आम्ही तिला फोनून ही कल्पना सांगितली.

मेन्स टॉक

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 26/02/2014 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
(शुक्रवारी संध्याकाळी जुन्या मित्रांची ओली-सुकी पार्टी करायचा बेत एका गार्डन रेस्टारंन्ट मध्ये ठरला. सगळ्यांना कधीनव्हे ते बायकांकडुन परमिशन पण मिळाली) कारे जानव्या! उरफाट्या न्हाई आला अजुन? … बन्ट्या (ठुश्या वैतगलेल्या सुरात) तुले लै आठोन येउन र्‍हायली त्याची? असन भहिनमाय कुठ्तरी फकाल्या तानत! ...ठुश्या तु काहुन अंगार मुतुन र्‍हायला बे? ...बन्ट्या अंगार? भाडखाव परवा घरी आला अन भांड्न लाउन गेला आम्च्यात. हीले सायचा हा वहीनी नाय म्हन्नार तं, काय, " ताई! कश्या आहात? बरं चाल्लये ना? आजकाल काम जरा वाढलयं वाटतं साहेबांच? फीरायला नाही गेले एव्हाना कुठं?

सही रे सही....

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 25/02/2014 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
खालील लेख तद्दन फालतू आणि विनोदी आहे.जास्त विचार न करता लिहीलेला आहे.तस्मात ज्यांना खूप विचार करून लेख लिहायला आणि अति विचार असलेलेच लेख आवडतात, त्यांनी हा लेख वाचू नये. =============================================================== गेली ३/४ वर्षे मिपावर वाचनमात्र होतो आणि मग एक दिवस मिपाचे सदस्यत्व घ्यावे असे वाटले.अर्ज केला आणि तो पास पण झाला.बाकी सगळी माहिती भरली पण ही "सही"ची भानगड काही सुटत न्हवती.इतरांच्या सह्या बघून झाल्या.पण सहीचे कोडे काही सुटत न्हवते.३/४ दिवस असेच गेले.आमची ही अवस्था, आमच्या बायकोच्या लक्षांत आली, आणि तिने सरळ आम्हाला घेवून बाबांचा आश्रम गाठला. त

सल्ला – एक अगत्याचे घेणेदेणे

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 22/02/2014 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
मला याची जाणीव नव्हती, पण माझ्या आसपासचा आसमंत अतिशय कनवाळू, विद्वत्तापूर्ण, अभ्यासपूर्ण अन सदैव पर-मदतीस तत्पर अशा सज्जन सल्लागारांनी प्रथमपासून परिपूर्ण असत आला आहे. ‘पर-मदत’ अशासाठी, की यांना स्वत:ला अनादी अनंत काळापासून कोणत्याच मदतीची कधी गरज पडली नसावी, अशी शंका येण्याइतपत स्वयंसिद्ध स्वयंपूर्ण असे हे महाभाग होत. पुन्हा, हे विद्वान लोक सर्वव्यापी होत. याचा पुरावा म्हणजे वर्तमानपत्रे अन मासिके यातून झालेला ‘ताईचा सल्ला ’, ‘माईचा सल्ला’, ‘काकांचा सल्ला’, इत्यादिंचा झालेला बोलबाला ! तसे तर आयुष्यात असंख्य प्रसंगी या सल्लावंतांनी मला तारून नेले आहे.

'वचने,प्रतिज्ञा, डार्विन आणि आपण '

लेखक drsunilahirrao यांनी बुधवार, 12/02/2014 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
'वचने, शपथा, डार्विन आणि आपण' संपुर्ण मानवजमातीत वचन या प्रकाराला प्रचंड महत्व आहे. आपण स्वत: आजवर एकाही वाईल्ड किंवा डोमेस्टिक अॅनीमलला दुसर्या तत्सम प्राण्यास वचन देताना पाहिले नाही.यावरुन हेच सिद्ध होते की प्राणिजातीत वचन देणे घेणे ही प्रथा अजुन सुरु झालेली नाही. कदाचित त्यांच्या नैसर्गिक प्रेरणा त्यांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी पुरेशा असतात. मनुष्य हा मुळातच स्खलनशील असतो, त्यामुळे त्याने स्वत:च्या स्खलनशील प्रव्रुत्तीस आळा घालण्यासाठी वचन हा प्रकार शोधून काढला! कालांतराने वचन देण्याचे तोटे लक्षात आल्यावर ते बळजबरीने घेण्याकडे कल निर्माण झाला.

विचित्रवीर्याची चित्र-विचित्र कहाणी (महाभारत भाग-३)

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 08/02/2014 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
विचित्रवीर्याची विचित्र कहाणी . चित्र १: विचित्रवीर्याची विचित्र मिरवणूक (चित्रकार: जेम्स गुर्ने) यापूर्वीची कथा: कुणी घडवून आणले 'महाभारत'? (भाग १) मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २) मदनकेतु उवाच: मुनिवर, तुम्ही शांतनुच्या मुलांची नावे ‘चित्रांगद’ आणि ‘ चित्रवीर्य’ होती म्हणून सांगितलेत, परंतु मी तर ‘विचित्रवीर्य’ असे नाव ऐकत आलेलो आहे? नारदमुनी उवाच: अरे, ती तर एक मोठी कथाच आहे.

क्ष-गफ ला पत्र... २

लेखक वडापाव यांनी बुधवार, 22/01/2014 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
क्ष-गफ ला पत्र _____________________________/\_____________________________________ मी ते पत्र ठेवलं. समोर हाताची घडी घालून मस्त पोझ देण्यात आली होती. मला घाम फुटला होता. मी थरथरत्या हातांनी दुसरं पत्र उघडलं. तशी हाताची घडी सुटली. 'एक मिनीट' 'काय झालं?' 'तू हे लेटर वाचलंस ना?' मी 'हो' म्हटल्यावर तिने ते हातात उचलून घेतलं, आणि माझ्याकडे रोखून बघायला लागली. 'त्यातल्या कंटेंट बद्दल, म्हणजे मेसेजबद्दल आपण नंतर बोलूया.. आधी माझे काही डाऊट्स क्लिअर कर.' मी आवंढा गिळला.. 'क-क-कोणते डाऊट्स?' 'शिसानविवि म्हणजे काय?' मी निश्वास सोडला.