Skip to main content

खरेसाहेब…माफ़ करा : ३ : दिवस असे की …

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 07/01/2010 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
ऋण इतुके की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही ...! सावकारांच्या कर्जाखाली बुडतो... आयुष्याला तारण ठेवूनी देतो, या जगण्याचे कारण उमगत नाही.., या जगणे म्हणवत नाही... व्याजाचे हे एकसंधसे तुकडे... मम छाताडावर नाचे त्याचे घोडे, या घोड्याला लगाम शोधत आहे, परि मजला गवसत नाही... ऋण इतुके की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही ...! मी गरीब की मी दुर्दैवी कमनशिबी... कर्ज चुकवण्या शोधतो शेकडो सबबी, दुर्दैवाला हजार टाळू बघतो... परि ते पिच्छा सोडत नाही... येतो म्हणताना ओठ कापती थोडे... तू मिटून घे पिल्लांचे माझ्या डोळे, देहाचे अन मम, पदराला तुझीया हे ओझे पेलवत नाही ... ! ऋण इतुके की कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही ...! त्या दुर्दैवी जिवांसाठी काहीही करु न शकणारा एक असहाय सामान्य माणुस ! ईशल्या देणेकरी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3962
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

धंकु बंडोपंत ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

तुमच्या प्रत्येक कवितेचे नाव खरेसाहेब माफ करा असेच का असते हो?

In reply to by विजुभाऊ

कवितेचे नाही... सद्ध्या चालवलेल्या विडंबनसत्राचे. कारण सद्ध्या टार्गेट संदीप खरे आहे. तुम्हाला आवडले नसेल तर " यापुढे इजुभौ माफ करा..." असे नाव देइन.. कस्सं? ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"