मिसळपाव करता करता
लेखनविषय:
काव्यरस
मिसळपाव करता करता सांडलवंड झाली
अरे पुन्हा चायनीज खाण्या बायको ही निघाली.
आम्ही चार पावांचीही आस का धरावी
जी मिसळ सांडे त्याची वाट का पहावी?
कसा गॅस उसळकटाच्या सांडतो पखाली..
कपाटात केले कुणी बंद घुशी साती
मीठतिखट सांडून झाले पहा धूळमाती
उरे चायनीज, उडपी एकमेव वाली
उभे स्वयंपाकघर हे झाले एक कार्यशाळा
इथे फरसाण्याचा चुरा पायाने लवंडला
कशी प्लेट दुर्दैवी अन घूस भाग्यशाली
धुमसतात अजुनी विझल्या जिर्याचे धुपारे
नवे खाद्य मागत उठते 'अर्धांग' हे सारे
हॉटेलची बिले ही आता पहा खिसा जाळी
वाचने
2563
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
भाऊ एकदम मस्त...
मी या कवितेचे विडंबन पाडणार होतो.. "मिसळपाव खाता खाता" असे.. पण आपले विडंबन इतके खास आहे की मी माझा प्लॅन रद्द करतो..
In reply to +१ by शक्तिमान
तुम्हीही विडंबन टाका. प्लॅन रद्द करु नका.
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
खिखिखि! मस्त विडंबन!
:D
विडंबन म्हणजे काय याची व्याख्या करण्याची वेळ आली आहे. एक गाणे घेऊन दुसर्या अगदी वेगळ्या विषयावर गीत तयार करायचे याला विडंबन कसे म्हणायचे ? तोच विषय घेउन त्याला पिळायचे याला खरे विडंबन म्हणावे. माझ्या मते हे विडंबन नाहीच ! तेंव्हा शक्तिमान तुम्ही तुमच्या विडंबनाची जिलबी पाडाच पण त्यात मिसळ उसळ फरसाण याना सोडून रात्र, चांदणे, धुंदी, स्वप्न वगैरे आणू नका .
In reply to असे असले तरी by चौकटराजा
त्या कवितेची तारीख बघा हो! शक्तीमान हल्ली दिसत पण नाहीत कुठे!
डॉ. मूळ स्त्रोत कुठे आहे?
छाण् ! ;-)
हा हा हा ... लैच :) :)
+१