Skip to main content

विडंबन

(बस्स नकोस आता...)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 31/03/2010 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
हा दिसला मुक्त हाफव्हॉली आणि लगेच मला "साहित्य सेवा" करण्याचा उमाळा आला. तुझ्यामागे धावणं पुरे आजपासून कारण तू येत नाही समोरासमोर मुळी यदाकदाचित धर्मकर्मसंयोगाने आलास तरी माझी गरज नाही तुला मग माझी धावपळ कशासाठी? मला इतकं पळवून, डिवचून दमवून, दमवून मिळालास तर कसा मिळालास? किती आणि कसं सांगू कालपर्यंत हवा होतास जितका नकोस आता बस्स!!! झुरळामागे धावणं थांबलं आजपासून (बेगॉन वापरा, झुरळं मारा)

पांढरी

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 29/03/2010 05:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मिल्याची सुंदर गझल पंढरी वदंता वाटते आता.. कहाणी जी खरी होती त्वचा ही आमची काळी कधी ती पांढरी होती तिच्या बद्दल मते माझी जराशी वेगळी होती जवळ जाता मला कळले..दरी होती बरी होती तशी नव्हती भिती मजला जरा ही सासर्‍याची पण घरामधली तिच्या कुत्री.. जराशी चावरी होती तिला भेटायला जाईन का मी रिक्त हातांनी? चिलखताच्या बरोबर ढाल ही माझ्या करी होती तिच्या हातातले डाव्या लाटणे वाटले साधे बुडावर अदळता कळले अरे ती डावरी होती घरी यावे नि समजावे, कुणी मुक्काम ठोकावा शयनकक्षी निजे सासू..

सांगू काय, सांगू काय?

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 22/03/2010 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
( "एका माणसाची दाढी केवढी लांब सांगू काय ...." या एका बालगीताच्या चालीवर खालील विडंबनात्मक कवीता वाचावी. वरील बालगीत फाउंटेन कंपनीच्या च्या एका बालगीतांच्या व्हि‌. सी. डी. मध्ये आहे. ते 'यु ट्युब' वर शोधले तरी मिळू शकेल. दैनंदिन जीवनातील, राजकारणातील विविध ठिकाणी विरोधाभास दिसतो, त्यावर उपहासात्मक कविता मी लिहीली आहे.) एका मॉडेलची वस्त्रे केवढी छोटी, सांगू काय ? सांगू काय, सांगू काय, सांगू काय ? एवढी छोटी, एवढी छोटी की, रॅंपवर चालतांना गळून जाय.... सांगू काय, सांगू काय, सांगू काय ?
काव्यरस

खरडवाद...

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 20/03/2010 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या अनुभवावरून ठरवलं होते, आता पुन्हा नाही... वाचन मात्र आहे हे असच राहायचं... पण हा काथ्याकूट! हे धागे! हा खरडवाद!! करतात निश्चयाला दुबळे कदाचित आता सगळे नीट होईल... पुन्हा एकदा बडवला कळफलक खरडून टाकल्या एक दोन खरडी एक नवी सुरवात... एक नवा खरडवाद... केशवसुमार आमची प्रेरणा

(आज अचानक गाठ पडे)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 15/03/2010 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
सक्काळी सक्काळी ग्रासस्टांझाजचे अफलातून इडंबन, त्यावरच्या मुसुंच्या एक्सपर्ट कमेंट्स आणि मग मिभोकाकांचे नाडी शब्द न आणता करायच्या विडंबनाचे आव्हान असा तीनकलमी मसुदा पुढे असल्यावर देरी किस बात की?
काव्यरस

नाडि वाचुनी अति मी दमले, थकले रे शशिकांता!

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 15/03/2010 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
करुण रस म्हटलं आहे, पण तो फारच पाणचट तर्रीसारखा वाटतो. हे काव्य बरोबर साधण्यासाठी उद्विग्नता, विमनस्कता, थकवा, हातबल्य असे अनेक रस मला माझ्या आत्म्यातून पिळून काढून त्यात घालावे लागले. (गदिमांच्या प्रतिभेला वंदन करून. त्यांच्या ताजमहालाला वीट लावण्याचं धार्ष्ट्य केवळ नाडीकथांचा वीट आल्यामुळेच झालं. मूळ कविता खाली दिलेली आहे) नाडि वाचुनी अति मी दमले, थकले रे शशिकांता!
काव्यरस

))तुझ्या रेशमी केसांनी((

लेखक तुका म्हणे यांनी रविवार, 14/03/2010 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भ: विजूभाऊचा हा मूळ धागा: http://www.misalpav.com/node/11426#comment-182034 रेशमी केसात तुझ्या जीव माझा गुंतला धुंद या काळ्या बटा, अन प्राण घेई मोगरा का आता गमजा करी? तारका नभातल्या भेटीत पहिल्याच तुझ्या, चंद्रमाही लाजला सोडू कसा हा नाद मी, सांग तू माझ्या फुला, प्रेमात तुझ्या भारावलो, सूर ऐसा लागला होतो खुळा, आहे खुळा, भान न त्याचे मला जादू भरले नैन तुझे हे, ठेवती न माझा मला, कळले मला ग प्रेम ते, उमजले का सांग तुला, जेव्हा तुझ्या हातास अलगद, हात माझा स्पर्शला
काव्यरस

(....पुन्हा पुन्हा!)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 11/03/2010 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी प्रेरणा एखादीच कविता असते पण काहीवेळा कवितेसोबतच इतरही धाग्यांचा दंगा एवढा भरपूर असतो की समजत नाही नेमकी प्रेरणा कोणती...जाऊ दे प्रेरणेची काळजी 'मंगेशाला'!
काव्यरस

जातो म्हणतोस.....

लेखक Dhananjay Borgaonkar यांनी गुरुवार, 11/03/2010 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
जातो म्हणतोस..हरकत नाही एक पेग पेऊन जा चपला घालतोस..हरकत नाही एक जोडा खाऊन जा नियम मोडतोस..हरकत नाही एक फटका खाऊन जा रडतो आहेस..हरकत नाही एक रुमाल घेऊन जा पुन्हा येतोस..हरकत नाही एक डायपर घेऊन ये पुन्हा लिहितोस??..हरकत नाही कोणी मारल्यावर रडु नकोस मिसळचाट पाहिजे..हरकत नाही खायला घातल्यावर ओकु नकोस काय्..लाल झाली..हरकत नाही पुन्हा मी काय करतोस विचारु नकोस एक चोरलेली कविता.
काव्यरस

(मिपादिन?: नवेच आहे शत्रू नव्यांचे!! प्रस्थापित नाहीत.)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 09/03/2010 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर्सः १. कृपया ह. घेणे नाहितर जोडे तयार आहेत. १.अ. कुणाचे जोडे तयार आहेत हे विचारू नये, अपमान होईल. २. सदर विडंबन हे विरंगुळा म्हणून लिहीले आहे. वरचे दोन शब्द काही लोकांच्या नजरेआड जाण्याची शक्यता आहे म्हणून हे ही लिहीले आहे. २.अ. प्रेरणा ... लिहायलाच हवी का? बरं, वाङ्मयचौर्याचा आळ नको, ही घ्या. ३. नीरजाकडून एक कल्पना (न विचारता) उधारीवर आणली आहे, तिचे आभार. ४. सदर विडंबन आम्हाला आव्हान देणार्‍या श्री.श्री.