विडंबक
काव्यरस
संदीप खरेची 'नास्तिक' ही कविता बरेच दिवस मनात ठाण मांडून होती, आणि आज अचानक अनेक दिवसांनी .......
एक खरा खुरा विडंबक जेव्हा कवींच्या टांकसाळीबाहेर थांबतो
तेव्हा खरं तर साहित्यात भरच पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरता सट्ट्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्याईची !
एक खरा खुरा विडंबक जेव्हा कवींच्या टांकसाळीबाहेर थांबतो
तेव्हा होते निर्माण गरज
कवींनी आपले काव्य पाडणे थांबवून टांकसाळीबाहेर येण्याची !
एक खरा खुरा विडंबक जेव्हा कवींच्या टांकसाळीबाहेर थांबतो
तेव्हा शोधक नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या कविता, कंपूबाज प्रतिसादकांची जत्रा...
कोणीतरी आपल्या कविता विडंबल्यामुळे(च)
वाचल्या जात असल्याचे समाधान लाभते कवींनाच!
म्हणून तर एक खरा खुरा विडंबक जेव्हा कवींच्या टांकसाळीबाहेर थांबतो
तेव्हा खर्या वाचकांना एक कवी कमी मिळत असेल कदाचित!
पण मिळते आकंठ समाधान उगाच 'प्राचीला-गच्ची' न वाचायला लागल्याचे!
टांकसाळ बंद झाल्यावर लगबगीने बाहेर येऊन
तिथे विसावलेल्या विडंबकाशी गप्पा मारता मारता
कवी म्हणतो, "विडंबनं करत जा अधून मधून........
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,
पण आमचा तर आहे ना!"
टांकसाळीबाहेर थांबलेला एक खरा खुरा विडंबक
त्याला टांकसाळीत बोलावणार्या कवीला मोठ्या मिन्नतवारीने थोपवतो
तेव्हा कुठे वाचायला मिळतात
वक्रोक्तीच्या भरजरी शालजोडीत लपेटलेली विडंबनं....
एक खरा खुरा विडंबक जेव्हा कवींच्या टांकसाळीबाहेर थांबतो..............
-चतुरंग
वाचने
2901
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
अफलातुन
ये बात है...
मजा नाय आली
कोणीतरी
सह्ही! एकदम
छान आहे
In reply to छान आहे by चित्रा
+१
मस्त हो
मस्त
हा हा हा
जबरदस्त ,
तुम्ही
विडंबक