Skip to main content

<strong>खेळ मांडला.....</strong>

<strong>खेळ मांडला.....</strong>

Published on 13/01/2010 - 10:02 प्रकाशित मुखपृष्ठ
आम्हीच निवडून दिलेले नेते आमच्याच पैशांवर स्थूल होतात आणि मग आमचेच प्रश्न "स्थूल्"मानाने सोडवतात (?????) तेंव्हा ओठी येणारी ही वीराणी ..... अश्या नेत्याला उद्देशून म्हटलेली("नटरंग" फेम गुरू ठाकुर यांचे क्षमा मागून !)..... खेळ मांडला..... तुझ्या पायरीशी कुनी सान पोचत न्हाई, साद फक्त पैशांची तुझ्या कानी जाई तरी तुझा सुटना ह्यो भोग अनाठाई अंधारल्या राती चाले अशी तुझी घाई ववाळून टाकलेला मवाली तू बापा वनवा घराचा पेटला..... खेळ मांडला.....खेळ मांडला.....खेळ मांडला , भाड्या.....खेळ मांडला..... सांडली ग दारू तरी कोरडा घसा तुझा तूच वाट लावलीस खेळ मांडला लावलीस वाट पार पैलतीर संपला घरावरी नांगराचा खेळ मांडला ! बसवलं आमदार सारं , आधार "हाता"चा न्हाई ह्ये , भ्येगाळल्या भुईमंदी मुडदा बघ शेतकर्‍याचा जाई ! बळ दे "इंजिना"ला ओरप्याची "ढाल" दे इनविती सोनियाजी , महाराष्ट्री "चाल" दे करपलं घड्याळ बी , जळलं थ्वाबाड , तरी न्हाई कुनी(च) भांडला..... खेळ मांडला.....
लेखनविषय:

याद्या 1390
प्रतिक्रिया 0