Skip to main content

ती -२

ती -२

Published on 06/01/2010 - 10:23 प्रकाशित मुखपृष्ठ
क्रांतीताईंची सुरेख कविता ती आणि रंग्याची (ती) वाचुन आम्हाला आमची झालेली फजि'ती' आठवली ती समीप माझ्या येते, खुणवुन जाते ती चक्क, गुलाबी रुमाल टाकुन जाते ती शिकवुन जाते अर्थ नवे नजरांना जागवते हृदयी भलत्या अन स्वप्नांना मग स्वारी अमुची तिच्या मागुन जाते ती गालांवर ओठांनी काढत रेषा तनमनी जागवी अशी अनामिक भाषा अन स्वारी अमुची पुरी मोहरुन जाते या गालांवरती पडले काहीबाही ते मणा सारखे मला भासते काही ती खडबडून मज जागे करुन जाते ती कुणी,कल्पना वा ना कविता माझी ती कजाग, फुगरी असे बायको माझी जी गोड गुलाबी स्वप्ना उधळुन जाते
लेखनविषय:

याद्या 2578
प्रतिक्रिया 14

In reply to by सहज

सहमत. बिपिन कार्यकर्ते

In reply to by sneharani

सहमत. मी टोळ. :) (मला खरडण्याचा /व्यनीचा अधिकार नाही, त्यासाठी काय करावे लागते ? )

बढकर एक . वा वा वा !!!!!!! केसु जी मजा आणलीत *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

आपली बरीच विडंबणं वाचली ! पण सारखा सारखा तोच विषय असतो .. नाविन्याची कमी जाणवते. त्यामुळे "काही खास" असं वाटत नाही. असो ! - खाजवकुमार

:yawn:

"ती"नं भलतंच वेड लावलेलं दिसतंय! "ती"ची ही आवृत्ती पण खासच! =D> =D> =D> =D> क्रान्ति अग्निसखा

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार. (आभारी)केशवसुमार