मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

))तुझ्या रेशमी केसांनी((

तुका म्हणे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
संदर्भ: विजूभाऊचा हा मूळ धागा: http://www.misalpav.com/node/11426#comment-182034 रेशमी केसात तुझ्या जीव माझा गुंतला धुंद या काळ्या बटा, अन प्राण घेई मोगरा का आता गमजा करी? तारका नभातल्या भेटीत पहिल्याच तुझ्या, चंद्रमाही लाजला सोडू कसा हा नाद मी, सांग तू माझ्या फुला, प्रेमात तुझ्या भारावलो, सूर ऐसा लागला होतो खुळा, आहे खुळा, भान न त्याचे मला जादू भरले नैन तुझे हे, ठेवती न माझा मला, कळले मला ग प्रेम ते, उमजले का सांग तुला, जेव्हा तुझ्या हातास अलगद, हात माझा स्पर्शला

वाचने 1272 वाचनखूण प्रतिक्रिया 0