शैलेंद्र यांची क्षमा मागून,(
http://www.misalpav.com/node/12362)
ढिनच्याक ढिनच्याक नाचू निरन्तर , हलवू कंबर आपुली आज,
जवळ येऊनी , दूर जाऊनी , घेऊ गिरकी झिंग खलास
हाडे वाकवुनि विशालकोनी , जनामनाची सोडुन लाज,
व्युत्क्रमकोनी बोंबा ठोकू , चरसी सारे त्रिभुवन आज
कशी बंधने हलकी झाली , वार्यावरती कपडे फिरती,
नजरेला ज्या टोचत होत्या , सर्व अचानक गाठी सुटती,
नसता गुंता ओढाताण , स्कर्ट पांढरा कृष्ण तुमान ,
तुला दिसावे मला दिसावे , आज मोकळे सारे रान.
नांगर फिरला सार्यावरती , अनाम लाठी पार्श्वप्रहार,
अस्फुट टाहो कंठी फुटला , खाकी दिसती भुवने चार.
तुला कळ