Skip to main content

विडंबन

(गढूळगावचा तिरंदाज)

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 17/05/2010 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
अध्याऋत डांबरट दंगल खाज गढूळगावचा तिरंदाज ----- पोरासोरा पिसाट दंगा शर दिनी-दिनी आभास गंगा ----- घासावारी मिपात्र अंकन संबंधाला बादरायण चर्वण निर्वेसण रसाळ खादन चौदश छेदरी कडकड टाळीधून ----- अक्षयबाला जपीजे माळा ऋषीजटा आणि बिरुदाला वामन उत्तुंग पूज्य चौघडा गढूळगावी शून्य बावडा
काव्यरस

बाभूळगावचा फलंदाज

लेखक अडगळ यांनी सोमवार, 17/05/2010 07:06 या दिवशी प्रकाशित केले.
अवजड जागी बसलो आज, बाभूळगावचा फलंदाज पाटबंधारा पतंगवारा, ग्रामविकासी खोखो काका डान्सबारी प्रदेश नर्तन अर्थाअर्थी तटकन रेचन भोकर स्टेशन गती विलक्षण , रक्त कट्यारी आम्र मालवण उत्तर माता पटेल लाला, राज्य बोलवी , हुरूप आला, अर्थोत्पत्ती बिकट विडा, अडगळ फोडी काव्यचुडा .

नांदी

लेखक सन्जोप राव यांनी शनिवार, 15/05/2010 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबनाचे विडंबन हा नवा खाक्या स्वीकारुन किंवा जुन्या बाटलीत भरलेली नवी दारु म्हणून काही बोल बोलले , अन मौन काही अंतरी (सोलवटली ढोपरे, अन शेकल्या नडग्या तरी) काही लाह्या तडकल्या, अन मूग गिळले भर्भरी बंडझेंडे फडकले अन उग्र वळलेल्या मुठी काही म्हणती लाजुनि 'शोभा झाकलेली बरी' पाठमोर्‍या आकृतीला पाहुनि उद्गारले 'माणूस हा होता बरा' गोष्ट असतसे हीही खरी काय चमचे, किति पळ्या अन डाव कित्येकी येथे मेल्या म्हैशीला पिळुनि दावू दूध मणभरी हरवल्याचे दु:ख नाही, हरवले ते हरवले कोतवाला हाती फसलो, शल्य हे उरले उरी पालखी ती उतरली अन भोई खांदे चोळती
काव्यरस

ती चिडली तेव्हा भीषण

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 15/05/2010 07:21 या दिवशी प्रकाशित केले.
ती चिडली तेव्हा भीषण, भांड्यांचा निनाद होता वेगात फ़िरवले लाटणे, तो नवरा चुकवित होता तरी घावही त्याच्या भाळी, येऊन थबकले होते टरटरून जणु फुगलेला, फ़ुग्गा मग दिसला होता ती बाई होती म्हणुनी, घळघळुनी उलटी रडली त्या वेळी गप्प बसोनी, तो टेंगुळ दाबित होता अन क्षणात गमले त्याला, संपली जेवणे त्याची पोळीवर धुरकट जेव्हा, आंबील घास तो घेता हे अन्न असे चिवडुनी , तो मुळी बिथरला नाही खपलीत टेंगुळाच्याही, स्वातंत्र्य चौघडा होता

कटोरी

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 15/05/2010 07:10 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा : मिपावरची अनेक बुडीत खाती , त्यांना मिळालेले उदंड प्रतिसाद आणि प्रदीप कुलकर्णींची अप्रतिम गझल "फांदी".

फांदी-२

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 15/05/2010 04:28 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा : प्रदीप कुलकर्णींची अप्रतिम गझल "फांदी".

........................................
(फांदी)

........................................

अर्थ शब्दांचा जरा आहे अघोरी!
काव्य आहे आमचे थोडे मुजोरी!

(हावरे)

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 12/05/2010 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
खाद्यप्रेरणा केळीची मांडलेली पाने. अन पानापानावर सांडलेले जिन्नस.. कुठेतरी मधुनच डोकावणारा.. शुध्द तुपातला बेसनलाडु.. द्रोणांचे खोल डोह.. सांबारावर तरंगणारी दगडफुले.. पुन्हा पुन्हा मागणारे.. लग्नावळीतील बेलाज हावरे.. दूर दूर जाणारे वाढपी.. अन त्यांना पुन्हा पुन्हा बोलावणारा मी.. - खुशाल.
काव्यरस

गादीखाली ढेकुणान्ची

लेखक अडगळ यांनी सोमवार, 03/05/2010 01:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजु यांची क्षमा मागुन , मूळ कविता http://www.misalpav.com/node/2111 गादीखाली ढेकुणान्ची , तुरूतुरू हालचाल , कानी कपाळी ढेकूण , झोप पळाली समूळ | चिरडता ढेकूणाला , जळे नाकातील केस, खाज जरा मन्दावते , तोच डसला खवीस| अश्या चपळ ढेकुणा , शोधण्याची धडपड , दडे फटीत जाऊन , झाला नजरेच्या आड| निथळली रांग सारी , शहारला देह सारा , जरा उचलता गादी , कृष्णविश्वाचा पसारा | ओघळले पटापटा , जणु मसुराची डाळ, हलाहलाचे हे थेंब , काळ्या ठिणग्यांचा जाळ | आसमंती फवारला , केरोसिनचा फवारा ओले ढेकुण मरती , क्षण विजयाचा आला | छातिवरी परि एक , जणु ऐकि माझे श्वास