Skip to main content

विडंबन

(ऐक माझ्या मुला)

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 30/04/2010 06:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा, अर्थातच ही कविता. ऐक माझ्या मुला, तू जरा, तू जरा गोंधळी, या घरी, शांतता दे जरा उच्च वाणी तुझी रे पिपाण्यापरी बोंबलूनी तु घेशी शिरी या घरा पीरपीऱ्या म्हणू, की म्हणू कट्कट्या त्रास देशी असा उठ्विशी मत्शिरा!! तू हि शाई कशा भिंतिला लावली बर्बटूनी निघे, रंग हा पांढरा टाकुनी फेकुनी वस्तु सर्वाघरी फोडशी आरसा मारुनी पत्थरा कोडगा हासतो निर्लजा कारट्या दांडगा, उंडगा.. तू कसा माजरा झोप की क्षण्भरी श्वास घेतो जरा ऐक माझ्या मुला, ऐक ना तू जरा काय साहू पुता, अंत आला अता दे दया तू मला, जोडतो मी करा -राजेश वाचवा वाचवा वाचवा वाचवा

ऐक माझ्या मुला

लेखक सन्जोप राव यांनी शुक्रवार, 30/04/2010 05:27 या दिवशी प्रकाशित केले.
माझी प्रेरणा - पण एक सांगा, सतत दुसर्‍या कुणाच्या तरी प्रकाशात राहाण्याचा आरोप मी सहन का करावा? (अशा वेळी साधारणतः 'आम्ही' हे सर्वनाम वापरण्याची प्रथा आहे.

हे रोज कविता करणारे !!!

लेखक निल्या१ यांनी बुधवार, 28/04/2010 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
हे रोज कविता करणारे (प्रेरणा: हे गंधित वारे फिरणारे ) मिपाकरहो, सादर आहे नवे विडंबन "हे रोज कविता करणारे" ! गाणं संदीप खरे सलील कुलकर्णी यांचं असलं तरी विडंबनाचा रोख त्यांच्यावर नसून मराठी ब्लॉगविश्व मिम, मिपा सारख्या उपक्रमांवर घडणा-या घटनांवर आहे ! सदर विडंबन कोणासही उद्देशून नसून करमणूक म्हणून बनवले आहे. आता विडंबनाचा आस्वाद कसा लुटावा? मागच्या वेळी प्रमाणे व्हिडो बनवला आहे.
काव्यरस

xxवी झाली तेंव्हा

लेखक सन्जोप राव यांनी रविवार, 25/04/2010 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
तात्विक युद्धांचा इतिहास कितीही रंजक असला तरी शेवटी शरीरधर्म कुणाला चुकला आहे?
काव्यरस

यादवी किंवा (ती झाली तेव्हा...)

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 25/04/2010 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
मनुष्याचा इतिहास यादवी-युद्धांनी भरलेला आहे. जे मुद्दे तडजोडीने, सहमतीने, गुण्यागोविंदाने सुटू शकतात अशाविषयी हट्टाग्रही भूमिका घेऊन शस्त्रं उपसायची परंपरा आहे. यात भावाविरुद्ध भाऊ उभा राहातो, मित्राविरुद्ध मित्र पवित्रा घेतो आणि प्रेम विसरून एकमेकांचा गळा घोटायला ते तयार होतात. कित्येक राज्यं, देश अशा आंतर्गत बंडाळ्यांमुळे कमकुवत होऊन परकीय आक्रमणांना बळी पडलेली आहेत. मिपावर मी बऱ्याच लोकांपेक्षा खूप कमी वेळ वावरलो आहे. कोणाला अजून भेटलेलोही नाही. असं असतानाही माझे मिपाशी, तिथल्या लोकांशी ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत. मिपाने मला खूप काही दिलेलं आहे.
काव्यरस

(फसलेला लेख)

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 23/04/2010 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रॅक्चर बंड्याची सुंदर कविता दमलेले ढग वाचली आणि मिपावर चाललेल्या मनोरंजक चर्चा वाचल्या अन असच सुचलं हं.
काव्यरस

!! चोराळ्या!!

लेखक आंबोळी यांनी शुक्रवार, 23/04/2010 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : !!चारोळ्या!! तुझी आठवण येते तेव्हा तु पाठवलेल्या खरडी वाचत बसतो तु येणार नाहीस माहित असतं मिरे खिश्यात टाकून मग स्वतःवरच हसतो.. ******************* मागणार्‍याची चंची कुठेतरी हरविली मागणारा व्याकुळतेने तडफड्ला चंची मागूनही नाही मिळाली मग मागणार्‍याने तंबाखू सोडली.. आपला आंबोळी

(भक्ता! तू सुद्धा ???)

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 22/04/2010 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा ही कविता. खाली दिलेल्यांसारख्या घटना प्रत्यक्षात घडलेल्या असतानाही आपण असे लोक मुळात स्वामी कसे झाले याचा विचार करत नाही, व नंतर आपणच पुजलेले त्यांचे पाय शेणाचे आहेत हे कळलं की आश्चर्याने चकचकीत होतो. माणसाला देवत्व द्यायचं आणि त्याने माणसासारखं वागलं की अचंबा व्यक्त करायचा... हे नाटक का खेळलं जातं, हे मला नेहेमी पडलेलं कोडं आहे. टी व्ही वर ब्रेकिंग न्यूज, खबर नाही आली, भक्ताला बिलकुल अटक नाही झाली. मूर्खपणा म्हणजे काही, गुन्हा नाही केला. पोलिसांनी गजाआड त्याला नाही केला!
काव्यरस

लादेन म्हणतो चेपेन चेपेन..

लेखक उपटसुंभ यांनी मंगळवार, 20/04/2010 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
(संदिप-सलिल आणि त्यांच्या तमाम चाहत्यांची माफी मागून) लादेन म्हणतो चेपेन चेपेन, दाऊद म्हणतो चेपेन चेपेन. न्याय खोटा, कोर्टं खोटी, कायदाच म्हणतो चेपेन चेपेन..! हल्ला होतो अतिरेक्यांचा मंत्री बदलत बसतो सूट. दिल्लीवरुनी येता कोणी उचलत बसतो त्याचे बूट. बूट म्हणाले मंत्र्याला आणिक त्याच्या संत्र्याला, सुटला नाही 'बुश'सुद्धा डावा, उजवा फेकेन फेकेन..! 'कमळा' नाही सुगंध उरला, 'पंजा' देतो नुसतीच थाप 'इंजिन' पळते मारित शिट्ट्या, घोळामध्ये 'घड्याळ' - 'चाप' महाराष्ट्राची धरती रे परप्रांताची भरती रे अबू चालवे सायकल सायकल, लालू धरतो लालटेन लालटेन..! मी बापूंना मारुन डोळा, भरतो माझा पेला रे जो प्याला तो
काव्यरस