मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

( फौल ) : स्पॅनिश व्हर्शनसह ...

छोटा डॉन · · जे न देखे रवी...
काव्यरस
काल अवलियांनी त्यांचे 'रुळ' हे काव्य मिपावर टाकुन मॅच सुरु झाल्याची शिट्टी वाजवली आणि त्यानंतर एक से एक महारथी मैदानात उतरले आणि त्यांनी धडाधङ गोल मारुन अगदी बाजार उठवला. पण आम्ही काल जरा 'इंज्युयर्ड' असल्याने बेंचवरुनच हे सामने पाहिले, आज आमच्याअ फिजियोने आम्हाला फिट घोषीत केले अहे व आम्ही मैदानात उतरलो आहोत ... ;) ----------------------------------------- पायात पाय घालुन आम्ही 'टॅकल' करायचो तो एका टीममध्ये स्ट्रायकर असायचा अन मी दुसर्‍या टीममध्ये डिफेंडर असायचो तोल संभाळत 'ड्रिब्लिंग' करताना 'पासिंग' करताना असंच 'पझेशन' संभाळायचो. एकमेकांना हलकेच 'ब्लॉक' करायचो. डिफेंडरच्या भिंतीवरुन कधीतरी तो 'गोल' करुन 'सुपरस्टार' झाला मी मात्र मारत आहे त्याच फिल्डवरुन बॉलसारख्या चकरा... गोलपोस्ट टु गोलपोस्ट. - ( दुर्लक्षित डिफेंडर ) डॉन टेरी

वाचने 4824 वाचनखूण प्रतिक्रिया 27

अमोल केळकर 25/06/2010 - 10:08
जबरा गोल :) सामने आज ही रंगणार वाटतं अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विडंबन छानच... खरंतर हे एखाद्या स्पॅनिश फूटबॉलपटूचं मनोगत आहे असं वाटतंय इतकं वास्तवदर्शी आहे. ;) अवांतरः डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!! डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!! डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!! डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!! डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!! बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन 25/06/2010 - 13:30
>>... खरंतर हे एखाद्या स्पॅनिश फूटबॉलपटूचं मनोगत आहे असं वाटतंय इतकं वास्तवदर्शी आहे. हम्म्, आपला प्रतिसाद 'खोडसाळ' वाटला बॉ. " - ( दुर्लक्षित डिफेंडर ) डॉन टेरी " हे वाचलं नाहीत का, ती इंग्लंडची दास्ताँ आहे ;) अवांतर : च्यायला तुम्ही एवढे म्हणत आहात तर ह्याचे 'स्पॅनिश व्हर्शन' टाकु काय ? ;) ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

अवांतर : च्यायला तुम्ही एवढे म्हणत आहात तर ह्याचे 'स्पॅनिश व्हर्शन' टाकु काय ? estimado señor, yo le desafío a hacer eso Lieber Herr, ich fordern Sie heraus, das zu machen बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन 25/06/2010 - 14:06
स्पर्धेमागुन स्पर्धा मैदानात आम्ही 'खुन्नस'ने भिडायचो आमचा दणकेबाज स्पॅनिश अ‍ॅटॅक असायचा अन त्यांचा पुळचट जर्मन डिफेन्स असायचा. गुण संभाळत ड्रॉ करताना सामना जिंकताना असचं '(नेक्स्ट राउंड) क्वालिफिकेशन' संभाळायचो. तर कधी एकमेकांना हलकेच "नॉक आउट" करायचो प्रतिस्पर्ध्यांना तुडवुन मागच्या वेळचे आम्ही "युरो चॅम्पियन्स' झालो. ते* मात्र मारत आहे त्याच शिल्डसाठी अधाश्यासारख्या चकरा... स्पर्धा टु स्पर्धा. अजुनही त्यांची जिरली नाही म्हणे, अजुनही ते दिवास्वप्न पाहतात म्हणे. काय म्हणता ? कोण ते ? ते* म्हणजे आमच्या बिकांचे जर्मन्स हो ! टीप : संबंधितांनी हलके नाही घतेल तरी चालेल, त्याचे काय आहे की सारखे हलके घेऊन घेऊन सत्यपरिस्थितीशी फारकत झाली आहे त्यांची. सत्य अगदीच अनभिज्ञ झाले आहे त्यांना. ;) ------ ( स्पॅनिश )छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

कल्पनेच्या भरार्‍या हे तर कवि लोकांचं मुख्य भांडवल. ते इथे पुरेपूर वापरलेलं दिसतंय. त्याबद्दल कवीला पूर्ण मार्क. पण ही कविता काहीशी साठोत्तरीच्या आधीची आहे असे वाटते. कारण साठोत्तरी कवितेत दाहक वास्तवाचा भेदक हुंकार दिसतो तो मात्र या कवितेत दिसत नाही. कविता काहीशी पसरट होतहोत टोकदार होऊ पाहते पण पुरेसे टोक न आल्याने स्वतःच्याच जगात अडकून पडते. तरीही कवीमधे खूपच दम असल्याने तो यापुढे तरी लागायच्या ऐवजी दिसेल असे म्हणावेसे वाटते. बिपिन कार्यकर्ते

In reply to by छोटा डॉन

मेघवेडा 25/06/2010 - 14:30
योग्य त्या ठिकाणी मारण्यात आले आहे! पहिले विडंबन उत्कृष्ट होते. पण दुसर्‍याची गत 'अतिपरिचयादवज्ञा' म्हणतात तशी झाली! ;)

In reply to by छोटा डॉन

ऋषिकेश 25/06/2010 - 15:14
वा! डान राव वा! दोन्ही वर्जन विषेशतः स्पेनचं वर्शन आवडलं :) ऋषिकेश ------------------ कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे. या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन

In reply to by केशवसुमार

छोटा डॉन 25/06/2010 - 16:24
गुर्जींची पावती आली आणि आम्ही खुष झालो. बाकी विरोधी प्रतिक्रियांना आणि जळजळीला फाट्यावर मारण्यात आले आहे ... ;) प्रतिक्रिया देणार्‍या आणि न देणार्‍या अशा सर्वांचे आभार ... ------ (आनंदित ) छोटा डॉन

मस्त कलंदर 25/06/2010 - 15:43
मस्त गोल!!!!! बिकांचा प्रतिसाद दवणीय (की दयनीय?) आहे.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

शुचि 25/06/2010 - 17:39
झक्कास!!!फिफा ष्टायल!! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मस्तं रे.. बाकी फुटबॉलचा संदर्भ सोडला तर व्यक्त होणारा दुसरा अर्थही भारीच. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix