(अनावर)
शुचि यांची क्षमा मागून
http://www.misalpav.com/node/12985
एखाद्या मन्द पहाटे ,पाठ सामानाने वाकली असताना
कंडक्टर माणकासारख्या गर्द लाल डोळ्यांसहीत तारवटलेला असताना,
एका पायाने दुसरा पाय खाजवत, तो लाल डबा
डेपोतून येताना पहायचाय.
एखाद्या तेलकट , कळकट कढईत,
कालचा पिवळट वडा आपले पोट उघडून,
नव्यानेच वर्तुळे गिरवीत असेल , त्याला ताजा समजून खायचाय.
जमलं तर कधी केबिनीत
रात्री बदली डायवरच्या जागेवर झोपयचय.
सुसाट हायवेवर वाजवून घ्यायचं आहे हाड न् हाड
खरं सांगायचं तर जिवंत पोहोचू असं वाटतच नाही ,
एवढ्याश्या केबिनीत माण्सं , फण्सं, पोती , डायवर मावतच नाही.
तू दिसतेस , भासतेस , मृतवत , भंगार
पण पळतेस तराट चौखूर बेफाम
अन माझी स्थिती नेहमी "वाट पाहीन पण एष्टीनेच जाईन"
लेखनविषय:
याद्या
1847
प्रतिक्रिया
7
काव्यरस
मिसळपाव
वा!
+१
In reply to वा! by क्रेमर
:-)
क्या बात है!
भयंकर
झ का स!
हा हा हा हे