मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पळ

सहज · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा अर्थातच मित्रवर्य नानाजी यांची रुळ व मराठी जालीय खूळ खोडी काढून आम्ही असेच बुंग्गाट सुटायचो तो त्याच्या संस्थळावर अन मी दुसर्‍याच्या संस्थळावर पहारा ठेवायचो अश्याच खोड्या काढताना निस्तारताना, कधी आय्डी शेयर करताना अजुन एक ब्लॉग आपणच काढायचा एकमेकांना सांगून खळाखळा हसायचो लिव्हरेजच्या निसरड्या वाटेवरुन कधीतरी त्याची हवा निघुन गेली मी मात्र वसुलि करत आहे अजुन सोनेरी द्र्व्याच्या अमलेत सोमवार टू रविवार

वाचने 3469 वाचनखूण प्रतिक्रिया 18

गणपा 25/06/2010 - 12:44
हा हा हा, सहजराव जबराच (_)ळ ज्वर उतरलेला दिसत नाही आजही. आजवर एका कवीतेची इतकी (१४) विडंबन पाहिली नाहीत कधी मिपाच्या जिंदादिल सदस्यांना साक्षात दंडवत :) (_)हवा तो शब्द भारा

In reply to by गणपा

छोटा डॉन 25/06/2010 - 13:37
>>आजवर एका कवीतेची इतकी (१४) विडंबन पाहिली नाहीत कधी +१, असेच म्हणतो. सहजराव एकदम फॉर्मात ! मस्त जमले आहे विडंबन ... :) ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

बिपिन कार्यकर्ते 25/06/2010 - 13:49
असेच म्हणतो.. आता एखादे 'Know Your आंतरजाल' असे पुस्तक काढावे का असा विचार करतोय. ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नंदन 25/06/2010 - 13:53
>>> आता एखादे 'Know Your आंतरजाल' असे पुस्तक काढावे का असा विचार करतोय. --- एकंदरीत आं.जा.चे स्वरूप पाहता त्याला 'या!!!' हे शीर्षक अधिक शोभून दिसेल ;) झक्कास विडंबन हो सहजराव. 'वसुलि' हा शब्द कुठेतरी वाचल्यासारखा वाटला :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

३_१४ विक्षिप्त अदिती 25/06/2010 - 13:57
सहजराव पुन्हा एकदा मुख्य पानावर दिसले ... ही तर अवलियांची कृपा!! >>> आता एखादे 'Know Your आंतरजाल' असे पुस्तक काढावे का असा विचार करतोय. किंवा "आंतरजाल for dummies" ... अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रभो 25/06/2010 - 18:29
>>सहजराव पुन्हा एकदा मुख्य पानावर दिसले ... ही तर अवलियांची कृपा!! १०० वेळा बाडिस.....

In reply to by प्रभो

llपुण्याचे पेशवेll 25/06/2010 - 21:30
+१ म्हणजे १०१ सहज सुटलेत हे कसे काय सुटले नजरेतून. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix

आंबोळी 25/06/2010 - 15:45
बाकी सहजरावांचे विडंबन सहज वाचता येत नाही... कांद्यासारखे त्याचे कितीही पदर काढले तरी काहीतरी नविन अर्थ लागतच राहतो... आंबोळी

In reply to by आंबोळी

भडकमकर मास्तर 26/06/2010 - 17:36
अगदी अगदी... काही ओळींचा अर्थ लागत नाही आहे.. आता व्यनिमधून समजावून घेतो

अवलिया 25/06/2010 - 17:17
छान ! --अवलिया

प्रियाली 26/06/2010 - 15:31
सहजरावही सुटले होते वाटते आणि हे विडंबन माझ्या नजरेतून सुटले होते. ;)

रेवती 26/06/2010 - 18:31
सहजकुमार हे खोडकर आहेतच! त्यांनी असे विडंबन करणे अगदी स्वाभाविक आहे असे वाटले. रेवती