विडंबन
दिसू लागले स्पष्ट जसे हे
आमची प्रेरणा चित्त यांची नित्तांत सुंदर गझल दिसू लागले स्पष्ट जेवढे आणि मिपावरच्या गेल्या काही दिवसातील घटना
दिसू लागले स्पष्ट जसे हे पैसे सगळे धूसर झाले
सर्व निवासी परदेशी मग एक एक दृग्गोचर झाले
चुकली त्याची वाट म्हणूनच कमावलेले नाव गमवले
तोवर होता उशीर झाला आणिक मग हस्तांतर झाले
संपादक झाल्यावर शिकला विनायास प्रतिसाद खरडणे
अधी बरा तो लेखक होता, त्याचे माकड नंतर झाले
वाचन करता-करता इतका लख्ख देखणा प्रकाश फुटला
शरदिनितैंची पाटी फुटली अन् त्यांचे भडकमकर झाले
पवार थत्ते धाग्यामध्ये इतिहासाचा चोथा कुटला
जितके जितके वादळ उठले शांत कुठे सावरक
कषाय-दान
(संत ज्ञानेश्वरांची क्षमा मागून, मागितलेले दान)
आता खाद्यात्मके देवे, येणे खाद-यज्ञे तोषावे
तोषोनि मज द्यावे, कषाय-दान हे|
जें पळीभर शर्करा सांडो, तया इंसुलीनची गती वाढो
पात्रात परस्परे पडो, दूध म्हशीचे|
मधुमेह्यांचा मेद जावो, विश्व सदुग्ध-कषाये पिवो
जो जें वांछील तो ते लाहो, मानव-जात|
वर्षत सकळ मंगळी, चहाबाजांची मांदियाळी
भरभरून पात्रान्तरी, देत तू चहा|
चला चहापत्तींचे आरव, आसामातले जणू ते गाव
बोलते जें अर्णव, कषायांचे|
वेलची आल्याचे चूरण, मिसळून करी जें प्राशन
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु|
किं बहुना सर्वसुखी, लाईम टी करुनी पिती
अथवा कोरा चहा पिती, अखंडित|
आणि कषायोपजीविये, विशेषी
तुझ्या रूपातले राग
क्रांती यांची क्षमा मागुन...
काही दारात बारात, थोडे वेळात चुकले,
माझ्या मनात होते, का तु झोपुन घेतले?..
रात्री जागवल्या साधु, राज-हरणाला पीत
आर्त विनवण्या केल्या जोगियाच्या प्रहरात
भल्या पहाटेला मस्तक तुझ्या चरणी झुकले
काळजात कोमेजले मुक्या मागण्यांचे नि:श्वास
तरि नकाराचा तुझ्या नाही केला ग दुस्वास
घोरण्याच्या सुरांत तुझ्या, माझ्या मागणीला जपले
मल्हाराच्या लडिवाळ, सरी आळवल्या कानात,
आळविले दाराचे सूर, ठेवुन आशा ग मनात
तुझ्या भुपाळाच्या ताना, वाटे निमीत्त हुकले.
काव्यरस
मॅकमामा मॅकमामा गेलास का ?
महावस्त्राला आम्ही पण एक चिंधी जोडावी म्हणतो.
मॅकमामा मॅकमामा गेलास का ?
"म्हातारा साधु" इतका प्यालास का ?
गावाला मामी बघ काय सांगी ,
मामाचा भाचा आत्रंगी
मामाच्या वाड्यात येऊन जा
उरलेली चपटी घेऊन जा
चपटीत पडली माशी ,
अडगळ घाली काशी
काव्यरस
(किनारा )
प्रेरणा (जरा सुधरा)
प्रसवलेले काव्य
विरलेली शब्द्झोळी
अगम्य कल्पना
आणि काहीशा फिरवलेल्या ओळी
शब्दांचा खेळ
यमकासाठी रुची ला गच्ची
मुक्तछंदातला कवी
कल्पनांचा थर लावी
शब्दांच्या पुड्या
सोडा- कुठेही कशाही जोडा
अर्थ लावुन फिरवुन डोकं
आक्रंदतोय वाचक बिचारा ..
आजच backward रुपवेडं जग...
इ.पवार ह्यांचा "....तुझे देख के मेरी मधुबाला.....!!!!" हा धागा वाचला आणि मग प्रतिक्रिया दील्याशिवाय राहवल नाही...........ती प्रतिक्रीया जशीच्या तशी ईथे टाकतो(?) आहे.
राग मानु नका व मनावरही घेउ नका(प्रतिक्रियेचा नी आपला संबधच नाही अस म्हणा हव तर).................पण जरा ह्या प्रतिक्रियेतुन थोड मनातल लिहतोय......
एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यामुळे त्याची/तीची प्रशंसा करणे ,त्याला/तिला ईतरांपेक्षा वेगळी वागणुक देणे म्हणजे शुद्र विचार होय........असे माझे मत.
अहो शारीरीक सुंदरता कोणी स्वबळावर,मेहनतीवर कमवत का??मग एखाद्या व्यक्तीची त्यासाठी प्रशंसा का??
बुद्धीमता,चांगला स्वभाव्,बोलण्,चातुर्य,मानुस
<>आपलं कसं जमणार<>
तुला नेहमीच अवांतर आवडणार,
आणि मी वांझोट्या चर्चांचा दिवाणा …
माझ्या मनात सविताभाभीचे वेड..,
तुझ्या मॉनिटरवर मुर्च्छा उघडणार,
......... आपलं कसं जमणार?
तु कायम परदेशी अनिवासी
माझे जगणे सदैव निवासी
तु सारखा फोन करणार…
मी मात्र नंबर बदलणार…
.......... आपलं कसं जमणार?
आज ना उद्या जमेल मला
तुझ्या प्रतिसादावर संपादन आणण…
तोपर्यंत मात्र मी असाच असणार…
तुझ्याशी बोलताना "+१" स्मरणार…
.......... आपलं कसं जमणार?
चल, आपण एक करार करू या?
तू माझ्या खोड्या काढायच्या नाहीस आणि मी तुझ्या!
मी काही शांततेत रमणार नाही…
बघू…! हा करार कितपत निभावणार…?
............आपलं कसं जमणार?
काव्यरस
मिसळपाव