Skip to main content

हा दारूच्या 'फुल'पात्रांचा दोष असावा

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 07/08/2010 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा पुन्हा एकदा हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा हा दारूच्या 'फुल'पात्रांचा दोष असावा पेगलिपीचा अर्थ कसा कोणा समजावा कधीतरी दारूची भाषा तिला कळावी कधीतरी मज पेग तिने ही मग मागावा ग्लास-क्वार्टर ह्या दोन्हीही मापामध्ये पीण्याचा सारांश कसा सांगा बसवावा किती पेग मी पिऊन झाले तरी न मजला कधीच हा तळ या पिंपाचा ना लागावा उगाच चर्चा पील्यावर केली माझ्याशी चुकले माझे अखेर हा निष्कर्ष निघावा उद्या सकाळी उतार्‍यास ही घ्यावी थोडी मेंदूमधला मुंग्यांचा दंगा थांबावा आज गटारी मुहुर्त उत्तम आहे "केश्या" एक आयडीया, घरीच गुत्ता उघडावा
लेखनविषय:

वाचने 1187
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

कधीतरी दारूची भाषा तिला कळावी कधीतरी मज पेग तिने ही मग मागावा 'पेग' पेक्षा 'मग' मोठा असतो ना? मग कशाला? आधीच मागू दे!