मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<घोगरा>

नाटक्या · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
ह्या विडंबनाचा कच्चा माल इथे आहे: हा घोगरा नक्की चोंबडा आहे माझी पक्की खात्री आहे तू जेव्हा कधी कॅफेत येतोस माझ्याशी गुजगोष्टी करतोस हा घोगरा पचकतो नक्की हा आपल्या गोष्टी ऐकतो चोरून ऐकतो वरून बोंबलतो लक्षलक्ष चिकण्याकळ्या निरखतो अंगोपांगी आरस्पानी निरखतो टप्पोर्‍या पोरी 'बरोब्बर' घुमवतो सुगंधाच्या आठवणींचे उसासे टाकतो नक्कीच!! नक्कीच!! कारण आजकाल हा रोज बहकतो आजकाल घोगरा रोज पचकतो ....!!!

वाचने 2259 वाचनखूण प्रतिक्रिया 8

मदनबाण 01/09/2010 - 10:29
लक्षलक्ष चिकण्याकळ्या निरखतो अंगोपांगी आरस्पानी निरखतो टप्पोर्‍या पोरी 'बरोब्बर' घुमवतो सुगंधाच्या आठवणींचे उसासे टाकतो >>> झकास्स्स्स... :) (निरिक्षक...) ;)

३_१४ विक्षिप्त अदिती 01/09/2010 - 10:34
दु:खाची आठवण झालेली दिसत्ये!! ;-)

परिकथेतील राजकुमार 01/09/2010 - 11:40
हा हा हा लै भारी हो गुरुदेव. बाकी एक कॉकटेल टाका म्हणले तर ते नाही, विडंबन टाकायला बरा वेळ मिळाला हो ? ;) कॅफेवाला