मॉडर्न अभंगवाणी
काव्यरस
असावा शेजा-याचा आंग्ल पेपर । वाचावा तोचि न खर्चिता स्वधन ॥
पेपरसंगे ग्राह्य दूध वाटि एक । साखरेजोडि तेहि मागावे ॥
संगणक अभियंता होशिल तू । विठुमाझा करिल चमत्कार ॥
फक्त परीक्षेअंती निकाल । केटि न लागु द्यावी ॥
महाविद्यालये टि-शर्ट आणि जीन्स । जेतुके फाटके तेतुके स्टायलिश ॥
ओळखावे कन्यकांचे जमाव । पाहावे प्रत्येकीस सांगोपांग ॥
किकेटी असावी भल्यांची भरती । करावे कसे बुकी-फिक्सिंगचे उच्चाटन? ॥
किंतु तयांच्याच चरणी मिळे धन । ऑस्ट्रेलिया मागे मीही लावतो ॥
स्टेशनी होता बळाबळी । करावी सुंदोपसुन्दी जरूर ॥
किंतु दिसता पोलिस अस्वस्थ । व्हावे मूक मार्गस्थ, विन्या म्हणे ॥
जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपले ॥
तोचि राजकारणी ओळखावा । मतदान उपरांति विसरावा ॥
लहानपण देगा देवा । हाति लॉलिपॉपच हवा ॥
चिप्स, चॉकोलेट अन कार्टून्स । जीव सत्कारणी रमावा ॥
व्हावा सख्यासोबतींचा संग । सोमरस सुषवी मिळे ब्रह्मानंद ॥
ऎकावे विन्याचे अभंग । आनंदाचे डोही आनंद तरंग ॥
साक्षात्कार - विन्याबुवा
वाचने
3884
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
युद्ध माझा राम करणार | समर्थ
In reply to युद्ध माझा राम करणार | समर्थ by प्रसाद गोडबोले
रामायणात दत्तगुरु कुठून आले?
In reply to रामायणात दत्तगुरु कुठून आले? by प्रचेतस
समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
सही !
In reply to सही ! by बबन ताम्बे
धन्यवाद बबनराव
@ लहानपण देगा देवा । हाति
छान लिहिले आहे..
In reply to छान लिहिले आहे.. by गणेशा
धन्यवाद गणेशा ... हो खुप
संध्याकाळी घ्यावा पेग l
मस्तच!
जे का रंजले गांजले । त्यांसी
अप्रतिम