(चैन)
आमचे प्रेरणास्थान आमच्या सदगुरु अनिरुद्ध अभ्यंकर उर्फ केशवसुमारांची चैन
कविता हल्ली सारख्या छळतात मजला
आणि ओळी चार मग सुचतात मजला
टंकले नाही मी काही तरीपण
अर्थ कडव्यांचे सलतात मजला
कवीलोकांची का खुलली कळी ?
प्रश्न हे आता असे पडतात मजला
कायदेही काही निवृत्तीचे असू द्या
फायदे पुनरागमनात हे दिसतात मजला
मी भरवसा कवितांचा काय द्यावा?
प्रतिसादही जर असे गिळतात मजला
प्रतिसादांचे सर्व रिकामे रकाने
खरडीही आजकाल ते विकतात मजला
एकदा टाकिन म्हटले मी विडंबन
ट्रॅकर छद्मीपणे हसला मजला
चैन विडंबनाची मला करता न आली
एवढी
मिसळपाव