बुश:काल होता होता, `लाल'रात्र झाली...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
बुश:काल होता होता, `लाल'रात्र झाली
(आमची प्रेरणा: उषःकाल होता होता काळरात्र झाली ! )
बुश:काल होता होता, `लाल'रात्र झाली
अरे, चला विश्वासाच्या पेटवा मशाली !
कुण्या चार खासदारांची आस मी धरावी ?
वोट कोण देई; कुणाची वाट मी पहावी ?
कसा मोहनाचा जीव, होई वर-खाली !
कसा घाव करिती `फिरुनी' विळा नि हातोडा
खाई भाव बाजारात, लंगडा ही घोडा
घरावरची साधी कौले, सोनियाची झाली
तिजोर्यात भरले `त्यानी', पंचवीस कोटी
हाती आमुच्या रे `व्हीप'; नशीबेच खोटी
आम्ही ती दुकाने, जी रे, दिवाळ्यात गेली!
अशा कशा ज्याच्या त्याच्या वाढल्या उमेदी?
विकाऊच जो तो; म्हणतो करा मज खरेदी ?
लोकशाही शरमून गेली; माजली दलाली !
`खास-दार' उघडून देती, मते बंदिशाला
तारण्यास सरकाराला गुन्हेगार आला !
म्हणू देश दुर्दैवी की `अणू' भाग्यशाली !
लाचखोर दावूनी दाम; म्हणती मार्ग `वाम'
राष्ट्रपिता नोटांवरचा पुन्हा म्हणे `राम'
संसदेत स्वातंत्र्याची आसवे गळाली
-अविनाश ओगले
वाचने
7598
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
वा!!
दाद कुठल्या शब्दात देउ?
बुश:काल होता होता, `लाल'रात्र झाली
अविनाश...
सुन्दर ..
`खास-दार'
आवडले
सुरेख
मस्त बुशःकाल !
काय अवस्था आहे आपली!
लाचखोर
मस्त
भन्नाट
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अप्रतिम
कोण म्हणते दर्जेदार विडंबने होत नाहीत? ह्या इथे आहेत. या! पहा!!
सरस
हेच..
सुंदर
प्रासंगिक काव्य जाम आवडले!
In reply to प्रासंगिक काव्य जाम आवडले! by चतुरंग
हेच म्हणतो..
बुश्शकाल होता होत.......
संसदेत लावावे
वा..
जबरा...