Skip to main content

विडंबन

(निवृत्ती)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 21/07/2008 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
चार दिवस गावाला गेलो होतो येऊन बघतो तो काय निवृत्ती? गुरुवर्य केशवसुमारांच्या ह्या'निवृत्ती'ने आमच्या भावना उचंबळून आल्या. घेतला वसा टाकणे ही तर विडंबनाशी प्रतारणाच, शिवाय गुरुवर्यांना काय वाटेल?

भानगड

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 21/07/2008 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा आमच्या गुरुंची निवृत्ती --------------------------------------------------------------------- छळले मी त्या सर्व मुलींना स्मरतो आहे शेवटची मी आज भानगड करितो आहे जाड चपला खूप मिळाल्या मज रसिकेच्या आत तरीपण एक प्रेमी धुसफुसतो आहे कसा अडकलो प्रतिभेच्या जाळ्यात कळेना सुटण्यासाठी माशासम तड्फडतो आहे चित्राने ही सावज केले होते मजला आठवणींनी त्या पोरींच्या गलबलतो आहे डोळ्यांन मध्ये प्रितीच्या ना पाहू शकतो भावालाही बघण्यास तिच्या घाबरतो आहे प्रेमाच्या मी या कोलांट्या खूप मारल्या लफड्यांचा सोस आज मज कळतो आहे करा मोकळा कॉलेजच

( हे चिकन मस्त आहे )

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 21/07/2008 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
इथे दिलेली चिकनची पा.कृ. पाहिली आणि हे गाणे सुचले. चालः 'चौकर राजा" मधील गाणे "हे जीवन सुंदर आहे." ----------------------------------------------------------------------- हे चिकन सुंदर आहे !! धृ !! निसर्ग धाबा हायवेवरचा अन् मित्रांची पार्टी ! रसात बुडल्या तंगड्यांना चापायाची घाई !! (अहो विसरा हे सगळ. एथं सगळेच विचित्र. वर कोंबड्या चिकनगुनियाने त्रस्त. सोबतीला ही प्रचंड महागाई !!!) पापलेट, बोंबील , वडे , खिमा हेही मस्त आहे ! हे चिकन सुंदर आहे !!
Taxonomy upgrade extras

निवॄती

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 21/07/2008 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
छळले मी त्या सर्व कवींना स्मरतो आहे शेवटचे मी आज विडंबन लिहितो आहे वा व्वा टाळ्या खूप मिळाल्या मज रसिकांच्या आत तरीपण एक कवी घुसमटतो आहे कसा अडकलो प्रतिमेच्या जाळ्यात कळेना सुटण्यासाठी माशासम धडपडतो आहे मित्रांनी ही सावध केले होते मजला आठवणींनी त्या सार्‍या गलबलतो आहे डोळ्यांन मध्ये स्वप्नांच्या ना पाहू शकतो आरसाही बघण्यास मी घाबरतो आहे शब्दांच्या मी या कोलांट्या खूप मारल्या विदूषकाचा भोग आज मज कळतो आहे करा मोकळा प्रतिमेच्या पिंजर्‍यातून आता हेच मागणे, हीच विनवणी करतो आहे साद घालते मला खुले आभाळ कधीचे आज नवी सुरुवात पुन्हा मी करतो आहे

उघडी पाठ

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 19/07/2008 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाती ताईंची हिरवी जिद्द बघून आमच्या वस्तिगृहातील काही आठवणी हिरव्या झाल्या रद्दीच्या साठलेल्या थरात.... मासिकाचा बोटभर तुकडा शोधून, टंच टंच दिसणार्‍या जाहिराती मधल्या वितभराच्या कपड्यात.... किती ग सुंदर दिसतेस! तुझ्या एका उघड्या पाठीनं ''जीव शिंपडलाय या देखाव्यात'' शरीराला घट्ट धरून ठेवणारी तुझी वसनं... आणि पांढर्‍या शुभ्र 'पार्श्व'भूमीवरच.. तो टोकाचा हसरा काळा तीळ, म्हणजे सौंर्दयाचा कळस! आहा...! डोळे अगदी तृप्त झाले तुला पाहून. बर आहे..., तू चित्रात आहेस!, अशीच राहशील कायम... अशीच राहील तुझी कमनीय काया, तुझ कोवळे पण.. तुझी उघडी पाठ! न जरा

(मोरपिशी साडी)

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 19/07/2008 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
मेक-अप् च्या अडगळलेल्या डब्यात.... लिप् स्टिक् चा बोटभर तुकडा शोधून, ओठांशी मस्ती करणार्‍या आरशामधल्या पाचफुटी फुला.... उगीच का अत्तर लावतोस? तुझ्या या मोरपिशी साडीनंच "अत्तर शिंपडलंय या देखाव्यात'' निर्‍या घट्ट धरून ठेवणारी तुझी बोटं... आणि तांबूसकाळ्या बटांमागचं.. कानावरचं हसरं पिवळं फुल, म्हणजे सुगंधाचा कळस! आहा... ! डोळे कधीच बंद झाले तुला हुंगून. बर आहे..., तू घरात आहेस!, असाच राहशील कायम... असंच राहील तुझं चैतन्यमयी हास्य, तुझं कोवळे पण.. तुझी मोरपिशी साडी! न विस्कटता , न कोमेजता! प्रेरणा: स्वातीताई फडणीसांची हिरवी जिद्द

(लाडू सांगे...)

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 19/07/2008 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
पुरे आता, बास । कवितांची रास । किती किती त्रास । कवींचा या । । पाहवेना नेत्री । रात्री अपरात्री । कवितांना कात्री । लागलेली । । पुरे दादागिरी । आता माझी बारी । वदतो अंतरी । विडंबक । । इरसाल स्वारी । बसे खाटेवरी । पुंगी वेळेवरी । वाजवाया । । 'काळा' की 'कावळा' । 'प्रेम' की 'पाचोळा' । भरल्या मी चुळा । कल्पनांच्या । । कवितेचा घास । करुनिया खास । सोडला उपास । लेखनाचा । । ओळींना वळण । शब्दांचे दळण । करितो कांडण । कवितांचे । । शिव्यांचाही भार । घेई शिरावर । खरा गुन्हेगार । कवितेचा । । काय त्या म्हणावं ? देव की मानव । कोणाला कळावं ?

( कंदील )

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 19/07/2008 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा श्री. अंबोळी यांचा कंदील चाल :मंदिरात अंतरात तोच नांदताहे नाना देही नाना रुपी तुझा देव आहे ---------------------------------------------------------------------- अंगणात कंदीलात तोच काळ आहे. नाना वाती नाना ज्योती उभा तोच आहे. तीच कंदीलाची मुर्ती, तीच काळजात भीती तीच कडी, तीच खुंटी, मुकतधाम आहे.
Taxonomy upgrade extras

बिग बी

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 19/07/2008 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
(डिस्क्लेमरः सदर मुक्तकात कुठल्याही श्रद्धास्थानाची खिल्ली उडवण्याचा हेतू नाही. सर्किटकाकांचे "बप्पा"वाचल्यावर एक कल्पना मनात खेळत होती. त्याचे हे प्रकटन. दुसरे काहीही नाही. मिसळपावावरील वाचकांना, अर्थातच, खुले आमंत्रण आहे. सदर "विडंबन" अद्याप रॉ आहे, ह्याची जाणीव आहे.