अनिरुद्ध अभ्यंकरांची सुंदर गजल'चैन' आम्हाला चांगलीच हलवून गेली आणि आम्ही बेचैन झालो!;)
गजल वाचुन हालतो 'वरचाच मजला'
काय मी आता करु? घरचाच मजला
हालला आहेच तो आता तरीपण
व्यर्थ शब्दांचा तुझ्या का जाच मजला
का विडंबन रोजचे असते कपाळी?
प्रश्न मेले लाविती बघ आच मजला
वायदा सार्या कवींचा ज्ञात मजला
कायदा हा रोजचा झालाच मजला
मी भरवसा त्या कवींचा काय द्यावा?
छळतात जर त्याच त्या गजलाच मजला
संस्थळांची मात्र ह्या झाली दुकाने
सर्व म्हणती माल घ्या हो हाच,मजला
एकदा सोडीन म्हटले मी विडंबन
देती कसे पाताळयंत्री लाच मजला
चैन कवितेची मला करता न आली
आहेर असतो रोज, घरचाच मजला
चतुरंग
वाचने
5018
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म...
कट्टा मानवला वाटतं :)
बैचेनीतील चैन मस्त.
ठीक
चांगला प्रयत्न
ख्या ख्या ख्या
मी भरवसा
सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे आभार!
एकदा सोडीन
चांगलेच
तुम्ही लयलूट सुगंधाची करता
In reply to चांगलेच by पारिजातक
करा करा,
In reply to तुम्ही लयलूट सुगंधाची करता by चतुरंग
वा!!
हा हा हा..