मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

((माउस))

अमोल केळकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आमचा ही एक प्रयत्न माउस हाताळण्याचा अर्थात प्रेरणा श्री. बेसनलाडू यांचा माउस ---------------------------------------------------------------------- टेबलावरती माझ्या रोज बघ लुकलुकतो माउस..! एक दिवस असा नाही मी हाताळतो माउस..! मला न जमले लिहायाला तेंव्हा मिश्किल हसला, गमभन मग लिहुन आता संधी शोधु लागला..! कधी उगाचच रुसला, आणिक हँगहोउनी बसला वायर लेसच्या युक्तीने मग पळुलागला माउस..! अवचित नव्या लहान कळांचा शोध समजला तेंव्हा सिडींसोबत ड्रॉवरमधुनी तळमळला माउस..! नव्यानव्या व्हायरसची लागण, नेटवर्कची बाधा उजव्याडाव्या टिचकीने मग हताशला माउस..! घराघरांतुन आरुढ होई संगणकाची स्वारी दमुन गेले डोळे हात, दाबता यंत्राचा प्राणी !! ------------------------------------------

वाचने 1315 वाचनखूण प्रतिक्रिया 0